Author Topic: पथ व पथीक....  (Read 849 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पथ व पथीक....
« on: May 19, 2015, 07:07:04 PM »
पथ व पथीक....

पंथी हू मै उस पथ का, अंत नही जिसका,
आँख मेरी है जिसकी दिशा, आधार मेरे मन का।

होय, प्रत्येक जण आपल्या मनोबलाच्या आधारावर स्वतःच इच्छीत ध्येय गाठायचा प्रयत्न करीत असतो, आणि वाटचाल करीत असतो अशा वाटेवर, जीचा अंत त्याला माहित नाही, खरं तर कुणालाच माहित नाही. परंतु आमच्या सारख्या नोकरीपेशा लोकांची गोष्ट काही वेगळीच आहे, आम्हाला आमच्या नोकरीच्या वाटेचा अंत माहित असतो, “वयाची पूर्ण साठ वर्षे”... खरच आम्ही आमच्या नोकरी जीवनाचा शेवट पाहतो?   

वयाची पूर्ण साठ वर्षे... काही प्रमाणात अर्घ आयुष्य आम्ही नोकरीत व्यतीत करीत असतो, कुणी पंचवीस, अठ्ठावीस, तीस व कुणी त्याहिपेक्षा जास्त काळ नोकरीत व्यतीत करून वयाच्या साठी नंतर सेवानिवृत्त होतो. काय काय पाहिलं, अनुभवलं असत त्या गत आयुष्यात? आपल्या पेक्षा वरिष्ठांना सेवानिवृत, कनिष्ठांना कार्यालयात रुजू होताना पाहिलं असेल, हे सार होतं कस? एका प्रक्रिये नुसार? हो, हे ओपचारिक उत्तर होऊ शकते, पण नाही. जर आपण ह्या गोष्टीचा थोड्या वेगळ्या दृष्टीकोणाने विचार केला तर वेगळाच रोमांचक अनुभव येईल. 

कोणता रोमांचक अनुभव असेल यात? लहानपणी आपल्याला माहित असत का कि येणाऱ्या आयुष्यात आपण काय करणार आहोत? आपल जीवन कसं व्यतीत होणार आहे? कुठे शिक्षण घेणार, कुठे नोकरी करणार? असे अनेक प्रश्न मनात येतात! परंतु आपल जीवन पहा कसं एखाद्या सुरेल तानेसारख सुरु होतं, आणि आपण त्याच सुरेल स्वरात मग्न होऊन तेच आपले सूर समजून त्याच्या तालात चालू लागतो. आणि एवढच नाही तर आपण “रुक जाना नहीं, तू कही हार के, काटों पे चलके मिलेंगे साये बहार के” हा विचार करून आयुष्याच्या तांडया सोबत चालत रहातो.

लहानपण लाडा कोडात, त्या नंतर काही काळ शाळा, कॉलेज मध्ये आणि पुढे तारुण्य... ह्या तारुण्याची गोष्ट जेव्हां केंव्हा निघते तेव्हा आपण थोडेफार भावुक होतो, आणि काही काळा पुरते आपल्या भूतकाळातील गोष्टीमध्ये हरवुन जातो. त्यां आठवणी चांगल्या असोत वा वाईट तरी हि त्यात आपण हरवुन जातो. तस तर प्रसिध्द लेखक श्री व.पु. काळे यांनी त्यांच्या एका कथेत म्हटलंच आहे कि “आठवणी कधीच नसतात, त्यां सुखाच्या असोत कि दु:खाच्या! त्यां केवळ आठवणींच्या राज्यात अमर. जर त्या आठवणी दु:खाच्या असतील तर ते भोगायला लागलं याच दु:ख आणि जर त्या आठवणी सुखद असतील तर ते क्षण आपल्या हातातुन निसटुन गेले म्हणून दु:ख!”  म्हणूनच म्हटलं गेलय कि दु:ख हे शाश्वत आहे, जीवनाच अंतिम सत्य दु:खच आहे, आणि त्याचा आपल्याला स्वीकार करायला हवा.
   
   जेव्हां सुख-दु:खाच्या गोष्टी सुरु होतात तेंव्हा पहिलं दु:खा गोंजारल जातं, तस ते करण नैसर्गिक आहे व त्या नंतर आपण सुखाची चर्चा करतो. मला माझ सार गत आयुष्य आठवतं, कसा कसा विचार केला होता, आणि काय काय नाही केलं आपल ध्येयं गाठण्यासाठी? परंतु आज मी कुठे आहे? नोकरीस लागलो तेव्हां विचार केला होता कि काही काळ इथे काम करून दुसरी नोकरी करू, बहुतेक माझी वाट अगोदरच निश्चीत होती! मी ही  नोकरी सोडून नाही जावु शकलो. गत तीस वर्षा पासुन याच कार्यालयात आहे, माझ्या सोबत नियुक्त झालेल्या पैकी काही लोक नोकरी सोडून दुसरीकडे गेले, काही हे जगच सोडून गेले.... हा विचार करता मन उदास व्हायला लागतं.

बाराशे-चौदाशे लोकाच्या सोबत काम करताना मला सतत वाटायचं कि इतक्या साऱ्या लोकांना आपण कस लक्षात ठेवणार? आणि ह्या साऱ्यात आपला निभाव कसा लागणार? परंतु माहित नाही आपोआप साऱ्या गोष्टी होत गेल्या, ज्या लोकाशी माझी साधी तोंड ओळख सुद्धा नव्हती त्याच्या सोबत छान गट्टी जमली, बरच काही शिकायला मिळाल. कहीं सोबत नाराजी झाली, मतभेद झाले, परंतु कुणी माझ वा मी कुणाचं नुकसान नाही होवू दिलं हे माझ भाग्य होय. एक सत्य मान्य करावेच लागेल ते म्हणजे अनिश्चितत: हीच जीवनातील निश्चितत: आहे, त्यासाठी मी तर म्हणेन कि लोक जोडत रहा, एकमेकांशी प्रेमाने रहा. 

आज ह्या साऱ्या गोष्टी आठवायचं कारण म्हणजे माझे एक सहकर्मी येत्या काही दिवसांनंतर आपला सेवाकाळ पूर्ण करून निवृत्त होणार आहेत, त्यांच्या सोबत गप्पा मारताना हा सारा विचार मनात आला, जो त्याच्याही मनात सुरु असावा, परंतु ते बोलु शकले नाहीत. त्या वेळी मला पुन्हा प्रश्न पडला कि खरच आपण जे जे ठरवतो ते साध्य करतो? मला वाटत बहुतांश लोक याच उत्तर “नाही” असचं देतील. जर आपण म्हणू कि आम्ही जीवनात सारं काही मिळवलं, तर त्या जीवनाला काही अर्थ नाही रहाणार, जीवनात काही मजा नाही उरणार, मी तर अस म्हणेन कि जीवना विषयी, आपल्या स्वकीयां विषयी काही अपनत्व, ममत्व शिल्लक रहाणार नाही. कारण आपल मन ह्या संसारातून सहजा सहजी अलिप्त, विरक्त नाही होवु शकत, ना हि हे सार मायाजाळ सोडून सन्यास घेऊ शकत.   

जीवनाचं दुसर नाव संघर्ष म्हटल गेलयं, व तो संघर्ष आपण करीतच आहोत... तरी सुद्धा ह्या प्रश्नाच उत्तर नाही सापडत, बहुतेक त्याला उत्तरच नाही! आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा सामना करतो, केवळ आपल्यात असलेला आत्मविश्वास, मनाची दृढता व स्वतःवर, स्वतःच्या विचारांवर असलेला विश्वासच आपल्याला त्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देतो, ज्या वाटेचा कधी अंत नाही... “ पंथी हू मै उस पथ का, अंत नही जिसका, आँख मेरी है जिसकी दिशा, आधार मेरे मन का। “

= शिवाजी सांगळे,
मो. +९१ ९४२२७७९९४१/+९१ ९५४५९७६५८९ ई.मेल.sangle.su@gmail.com   

Marathi Kavita : मराठी कविता


Jawahar Doshi

 • Guest
Re: पथ व पथीक....
« Reply #1 on: September 23, 2015, 10:50:13 PM »
Very nice article about life...

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: पथ व पथीक....
« Reply #2 on: January 16, 2016, 09:20:43 AM »
खूप आभार, जवाहर दोशीजी...