Author Topic: पेरणीचे पहिले तास  (Read 640 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
पेरणीचे पहिले तास
« on: June 27, 2015, 11:42:36 AM »
पाऊस यायला सुरवात झाली धरणीचे पोट भरून पाणी ओढ्या पाटातून वाहायला लागले. रात्रभर लिंबा म्हाताऱ्याला झोप लागत नव्हती.कारण आता पेरणीचे दिवस आले होते एक एक मिनीट महत्वाचा होता.
पूर्वेकडे तांबट फुटत होतं, तसा लिंबा म्हातारा बाजेवरुन उठला व खोकलत खोकलत खिडकी जवळ जाऊन चिलम अन् बटवा काढला. चिलमीत तंबाकू भरला वर कापूस लावला व आगकाडी लाऊन चिलीम पेटवली. जसाजसा चिलमीचा सूरका आत ओढत होता तसा चीलमीतून आगगाडी सारखा धुर निघत होता. चार पाच सुरके ओढल्यावर त्या चिलमीतला जळालेला तंबाकू काढून हातावर मळून दात घासत घासत माळ्यावर गेला माळ्यावर पडून असलेली टीफन खांद्यावर घेऊन खाली आला घरातील टिफनीचे फन काढून तिला बसवले.
वखरांची व टिफनीची ताड़जोड़ करे पर्यंत इकडे म्हातारीने त्याला चहा आणला म्हातारा चहा पीत पीत म्हातारीला म्हणाला, झाली का ग तयारी लोकांचे आवतं निघाले बघ शेतात, अन् त्या रोजदारीनलाही कळवले ना आज आपली पेरणी हाय ते.  त्यावर म्हातारी बोलली, होय मी संमदी तैयारी केली बगा दोन पोते खत टाकले गाडीत तीस किलो सोयाबीन बी दोन किलो ज्वारी बी आठ किलो तूर बी तैयार आहे. सर्व गाडीत ठेवले.
लिंबा म्हाताराही हे ऐकून घाई गड़बड़ीत टिफन,वखर, चाडं , मोघे सारे सामान बैल गाडीत टाकले. दिवसभर बैलांना जुंपुन ठेवायचे असल्याने त्यांना सकाळीच त्यांना पोटभर खुराक चारला व पाणी पाजले होते.म्हातारीने आज काळ्या आईला नैवेद्य देण्यासाठी आज पुरण पोळी केली होती. सर्व सामानाची बांधाबुन्ध झाल्यानंतर ते बैल गाडीतून शेतांमध्ये जाण्यासाठी निघतात.
सकाळचे सात वाजले होते सर्वच गावकरी पेरणीसाठी सकाळीच शेताच्या दिशेने निघाली होती. लिंबा म्हाताराही जोमाने आपल्या बैल जोडीला हाकीत होता.वीस पंचवीस मिनिटानंतर  ते शेतात पोचतात शेतात दोघेही उतरतात व पुढची तैयारी करतात. म्हातारा टिफन जुंपण्याची घाई करतो. म्हातारी ताट करते त्यात हळद कुंकू टाकते. सोबत आणलेला नैवेद्य काढते जेथून पेरणीची सुरवात करायची तिथे ओल्या मातीचे तीन चार गोळे करून त्याला उभे करून त्यावर हळद कुंकू व अगरबत्ती लावते. इकडे म्हाताऱ्याची टिफन जुंपुन बैल खांदी घालून तैयार असते. नंतर म्हातारी बैलाला व म्हाताऱ्याला ही हळद कुंकू लावते. सोबत आलेली रोजदार व म्हातारी पोटाला वटीं बांधून त्यात खत बी टाकतात. पहिले तास काढण्या अगोदर दोघेही काळ्या आईला वाकुन नमस्कार करतात व बोलतात ये काळे आई यंदा तुझ्या खुशीत हिरव्या सोन्याची खान येऊदे आमच्या कष्टाच सोनं होऊ दे, असे बोलून म्हातारा बैलाला प्रेमाने आवाज देतो बैल पुढे सरकतात.हळूहळू पेरणीची सुरवात होते . . . . . . . . . . . ✒

संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता