Author Topic: वेड सेल्फीच भाग - १  (Read 619 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,238
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
वेड सेल्फीच भाग - १
« on: July 02, 2015, 10:56:15 PM »
वेड सेल्फीच - १
    
काय अजब गोष्ट आहे ना ही सेल्फी? स्वतःचा वा आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचा स्वतःच फोटो काढायचा कुठेही, कसाही आणि कधीही, कसलीही तमा न बाळगता अगदि सहजपणे, किती सोप्प झालय आज हे सारं! ही सारी किमया साध्य झाली आहे ती केवळ नविन आलेल्या स्मार्ट मोबाईल फोनमुळे.
    
एक काळ असा होता जेव्हा फोटो काढणं म्हणजे एक छानसा सोहळा असायचा, आजच्या सारखं प्रत्येक गोष्टी साठी फोटो लागत नसतं, ना तेवढी गरज भासत असे, कधीकाळी फोटो काढायचा असला तर नविन कपडे घालणं आलं, गेला बाजार छान स्वच्छ धुवुन ईस्त्री केलेले कपडे घालुन व्यवस्थित पावडर वगैरे  लावून, भांग पाडून, फोटो साठी तयार व्हायचं, तर कधी कधी रूबाबदार दिसण्यासाठी छाती पेक्षा मोठा टाय अडकवुन झकास पोज देत उभ राहुन फोटो काढण्याचा कार्यक्रम चाले. त्यातही चुकुन एखादी चुक झाली तर पुन्हा पहीले पाढे पंचाववन्न.

काय थाट असायचा तेंव्हा फोटोग्राफरचा? आल्या आल्या तो आपली बँग उघडुन सारी आयुधं म्हणजे कँमेरा, बँटरी प्रसंगा नुसार उपयोगी पडणारी लेंन्स वगैरे बाहेर काढुन त्यांची जुळवा जुळव करणार, दरम्यान त्याच्या साठी कोल्ड ड्रींक, सरबत वा चहा पैकि काहीतरी येत असे, दुसऱ्या बाजुला उत्सव मुर्ती वा मुर्त्या त्याची चातका प्रमाणे वाट बघत घाम पुशित बसलेल्या असत. यथा अवकाश फोटोग्राफरचं चहापान आटोपलं कि घरातल्या तमाम दर्शकांचा विशेष सुचना देण्याचा कार्यक्रम सुरू होई, "अरे बबन त्या शर्टाची काँलर जरा वर उचल... कुत्र्याच्या काना सारखी झालीए बघ" हे ऐकुन बबन हैरान होतो, काँलरकडे हात नेईस्तोवर आणखी एकजण  म्हणतो "कुणीतरी त्याच्या कपाळीचा घाम पुसा रे" तेंव्हा घाम पुसता पुसता बबनचा भांग विस्कटतो, मग तो निट करण्या साठी आणखी काही सुचना, अशा सर्व सुचना, शर्ट, टाय इत्यादि गोष्टी आप आपल्या योग्य ठीकाणी स्थिरस्थावर झाल्यावर एकदाचा फ्लँशच्या दिव्याचा लखलखाट होई व फोटो निघाला हे समस्त उपस्थित श्रोत्यांना उमजत असे, जी गत बबनची तशीच अवस्था थोडया फार फरकाने बऱ्याच मंडळीच्या बाबत होत असे.
    
महिला मंडळीचा फोटो काढण्याचा कार्यक्रम या पेक्षा थोडा वेगळा असे, तो कार्यक्रम खास करून मुलगी वयात आल्यावरच खऱ्या अर्थाने सुरू होई, वरपक्षाला दाखवण्यासाठी मुलींचे काही खास फोटो काढले जात, त्यावेळी अगदि मुलीच्या रंगाला मँच होणारी साडी, ब्लाउज काही विशेष दागिने शोधेस्तोवर एखाद दोन दिवस सुध्दा उलटुन जात, साडी दागिने मिळालेच तर बऱ्या पैकि मेकअप करून देणारी त्या मुलीच्या एखादया सिनियर अर्थात लग्न झालेल्या अनुभवी मैत्रीणीचा शोध सुरू होई, कशीबशी एखादि भेटलीच तर... ती असल्याच कार्यक्रमात त्या वेळी स्वतःची झालेली गम्मत खरं तर फजिती, आठवत आठवत हे काम किती जबाबदारीचे व महत्वाचे आहे हे पटवुन देता देता हया मुलीचा मेकअप पार पाडीत असे, व त्या नंतर फोटोग्राफर सारी सुत्रे आपल्या हाती घेत असे पाच सहा कोनातून, आई वडील वा घरातील मंडळीसह फोटो काढण्याचा एक प्रयोग होई, त्या दरम्यान एकमेकांस सुचना देण्याचा कार्यक्रम अविरत सुरू असे, सरते शेवटी आठ दहा फोटो काढुन झाल्यावर तो आपलं साहित्य आवरायला घेत असताना, कापऱ्या आवाजात मुलीची आज्जी म्हणते "अरे चांगले स्वच्छ धुवुन दे रे बाबा आमच्या मंगीचे फोटो, नाहीतर आई सारखी सावळीच दिसेल ती" हे सांगता सांगता आपली सुन कशी सावळी आहे याची उजळणी आजी करून घेत असे.
नंतरच्या काळात मात्र थोडा फरक पडू लागला, लोक शिकू लागले, म्हणता म्हणता तंत्रज्ञान सुध्दा प्रगत होवु लागलं, विदेशी कल्पना रूळू लागल्या, कळत नकळत त्यांच अनुकरण होवु लागलं, एक नवा वर्ग तयार झाला. पुर्वी केवळ श्रीमंताचा असलेला हा शौक आता नव श्रीमंताना सुध्दा परवडू लागला, गल्लो गल्ली फोटो स्टुडीयो आले मग मात्र सर्व सामान्य माणुस पण हया कलेच्या प्रेमात पडला. अगोदरच चित्रपट सृष्टीचे वेड! मग काय वेग वेगळया नट नटयांच्या ईश्टाइल मधी फोटो निघु लागले, पुर्वी अगदिच काहीबाही घटना झाल्यावर भिंतीवर फोटो लागत, परंतु आता केवळ फलाण्या हिरो/हिरोईन वरच्या प्रेमा पोटी त्यांच्या सारख्या पोशाखात व श्टाईल मध्ये काढलेले फोटो सर्रास भिंतीवर दिसु लागले, आणि त्यात सुध्दा एक वेगळीच गंम्मत होती त्या वेळी.
    


= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com
« Last Edit: July 02, 2015, 10:57:21 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता

वेड सेल्फीच भाग - १
« on: July 02, 2015, 10:56:15 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):