Author Topic: वेड सेल्फीच - भाग - २  (Read 665 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
वेड सेल्फीच - भाग - २
« on: July 02, 2015, 11:00:02 PM »
वेड सेल्फीच - भाग - २

पुढे पुढे सर्वच बदलु लागलं, आर्थिक सुधारणां होवु लागली, सर्व सामान्यांच्या हाती रीळ वाले जावुन पोर्टेबल, डिजीटल कँमेरे दिसु लागले आणि फोटो वगैरे काढणं सोपं झालं. एरवी परीक्षा व नोकऱ्या साठी फोटो पाठवण्याची गरज भासु लागली व ती नित्याचीच बाब झाली. पण जशी मोबाईल मध्ये कँमेऱ्याची सोय झाली तसं वेडयागत फोटो काढण्याची बिमारी वाढली. प्रसंगी फोटो काढणे समर्थनिय आहे, पण हल्ली कसलाच धरबंद नाही, चार मित्र मैत्रिणी भेटल्या कि काढ फोटो, जर त्या सेल्फीत चार जण असतील तर प्रत्येकाची नजर कँमेरा सोडून भलतीकडेच दिसते, त्यात भर म्हणून कि काय व्हिक्टरीची खुण म्हणुन दोन बोटं दाखवणं, वेडेवाकडे चेहरे करून बाहेर काढलेली जीभ, कशाचाही संदर्भ कश्याशी नाही, परस्पर पुरक नाही, पहाताना कसं विचित्र दिसतं ते? चला, काही अंशी तेही ठिक आहे गम्मत म्हणुन.
पण सार्वजनिक ठीकाणी? काही वेळा धावत्या बस, ट्रेन मध्ये दारात उभं राहून फोटो साँरी सेल्फी काढण्याची कसली स्टाईल? तीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता? हया स्टाईल मुळे काही वेळा जीवावर बेतणारे अपघात सुध्दा घडले आहेत, जसं वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणं धोकादायक आहे तेवढच अशा पद्धतीने हे सेल्फी काढणं सुध्दा धोकादायक आहे.
    
जाणकार लोकांच्या मते हि एक प्रकारची विकृतीच आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा अवास्तव, असंबधित व अती वापर हा विकृतीत मोडणारा विषय होतो. सामजिक व विधायक कार्या साठी याचा संतुलीत उपयोग झाला तर चांगलच आहे.

सेल्फीच वेड केवळ तररूणांनाच आहे अस नाही, हल्ली बऱ्याच लोकांना हयाची लागण झाली आहे, अगदि चित्रपट सृष्टीतील कलाकारां पासुन ते राजकिय नेत्यां पर्यंत हि क्रेझ पसरली आहे. आता काय तर सेल्फी स्टीक बाजारात आली आहे, तेवढीच जोखिम कमी म्हणूया, परंतु ज्याच्या कुणाची ही कल्पना असेल त्याला मानावचं लागेल, म्हणतात ना जे लोकांना आवडतं ते बाजारात येतं.
एक गोष्ट खरी ती म्हणजे काळ बदलला आहे, पुर्वी अल्बम काढुन कौतुकाने फोटोंची वर्णने ऐकवली जात ती सुद्धा अगदि मनापासुन. भावनिक गुंतवणुक असतात फोटो, म्हणुन जपले जातात, त्या त्या वेळचे संदर्भ देवुन नव्या पिढीला दाखविले जातात. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कृतीची जपणुकच होते त्यामधुन हे नाकारता येणार नाही.

नव्या पिढीला सतत नाविन्याची ओढ आहे, एक फोटो नाही जमला तर तो डीलिट करून दुसरा काढा काही वाटत नाही त्याचं त्यांना, कारण तंत्रज्ञानाने पण तशी सोय त्यांना दिली आहे,  त्याचाच वापर होतोय, तो वापर चांगल्या व निखळ आनंदा साठी होत राहो हिच अपेक्षा.

= शिवाजी सांगळे, बदलापूर, जि.ठाणे +919422779941-+919545976589 email:sangle.su@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता