Author Topic: सागरा प्राण तळमळला  (Read 2973 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
सागरा प्राण तळमळला
« on: December 09, 2009, 09:37:35 PM »
सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला

"सागरास" ह्या गीताचा जन्म आजपासून १०० वर्षांपुर्वी ब्रायटन च्या समुद्र किना-यावर झाला. १० डिसेंबर १९१० ह्या दिवशी मातृभूमी च्या दूर असलेला तिचा सुपुत्र आईच्या विरहाने व्याकुळ झाला आणि ज्या सागराने त्याला आईपासून दूर केले त्या सागराला उद्देशून असलेली हे गीत जन्माला आले.

सावरकरांकडे एक कवी म्हणून बघताना त्यांच्या जीवनाकडे ही तितकेच सखोलपणे पाहणे गरजेचे आहे कारण मुळातच ते काव्य आणि त्यांचे जीवन हे एक अभेद्य सत्य आहे. विसाव्या शतकातील क्रंतीकारकांचे प्रेरणास्थान, स्वातंत्र यज्ञात स्वेच्छेने स्वाहुती देणारे वि. दा. सावरकर त्यांच्या भावना काव्यरुपात व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या कणाकणात उमलणारे मातृभूमीचे प्रेम सर्वांसच भावनाव्याकुल करतेच!

राष्ट्राच्या विकासाशीवाय, जनजागृती शीवाय, स्वातंत्र्याशीवाय दुसरे ध्येय कधीही नसल्याने त्यअंच्या काव्यावर त्यांच्या ध्येयाचा ध्यास स्पष्ट्च जाणवतो, काव्य नव्हे तर केवळ आतील भावना व्यक्त करण्यासाठी चे साधन असावे असे सावरकरांचे काव्य आहे. कणखरता, झुंजार व्यक्तीमत्व, संकंटांना मात देण्याची प्रवृत्ती, वीर रोद्रादी रस असलेलं सावरकरांचं काव्य जेव्हा हळव्या कोमल भावनांचाही आधार घेतं त्यावेळी ते निश्चितच वाचकाच्या मनाचा तळ गाठल्याविना राहत नाही

सागरास ह्या कवीतेत देखिल कवी सागराला मातृभूमीकडे परत नेण्याची गळ घालतात.

खळखळणारा सागर त्यांच्या असहायतेवर हसतोय आणि म्हणून ते सागराला सांगत आहेत, विनवणी करत आहेत, शपथ घालत आहे...

"सागरा, तुझ्यावर वि्श्वास ठेवून माझ्या आईने मला तुझ्या स्वाधीन केले त्यावेळी तू तिला दिलेले वचन तू का विसरत आहेस? माझा विरह माझ्या आईला सहन होत नाही आणि मी देखिल त्या चरणांचे दर्शन घेण्यास आतुर आहे, कारण सागरा, त्या चरणांचे दर्शन घेताना मी तुलाही पाहीले आहे, मग तू माझा विरह का समजून घेत नाहीस?

अरे सागरा, माझ्या किर्तीने माझ्या आईचा माथा उंचावेल म्हणूनच मी तुझ्यासवे इथवर आलेलो आहे मात्र माझ्या आईच्या
मुक्ततेसाठी जर माझी विद्या उपयोगाची नाही तर ती व्यर्थ आहे, आणि असे असताना मला इथे असण्याचे कारणच नाही, तेव्हा त्या मातृभूमीया छत्रछायेखाली हे सागरा तू मला घेऊन चल. कारण पिंज-यात अडकलेल्या पोपटाला जसे स्वातंत्र्य किंवा जाळ्यात अडकलेल्या हरिणीची जशी तडफ़ड होत असते तशी माझी गत माझ्या आईच्या विरहाने झालेली आहे
तेव्हा हे सागरा, आता प्राण कंठाशी येत आहे, तळमळत आहेत, मला मातृभूमी ला घेऊन चल असे कवी सागराला विनवीत आहेत

सावरकरांची भाषा काही वेळेस संस्कॄतसमासप्रचुर जरी झालेली दिसते तरीही त्यातील भावनेचा प्रभाव कुठेही कमी झालयाचे जाणवत नाही, कौटुंबिक माया आणि मातॄभुमीच्या स्नेहाने तळमळत असलेले मन कितीही उचंबळून येत असले तरी त्यातील कर्तव्याची जाणीन सदा जागृत असल्याचे या कवितेमधील दुस-या कडव्यात स्पष्ट्च आढळून येते.

सागर इतके विनवून देखिल ऐकत नाही तेव्हा त्याला भावनिक विनवणी करत, सरितेची शपथ घालून कवी पुन्हा एकदा मातॄभूमी कडे नेण्यास गळ घालतात. या आंग्लभूमीमधे कितीही मोठाले प्रासाद असू देत किंवा मनोरंजकतेचे ढीग असू देत किंवा काहीही असू देत, इथल्या समृ्ध्दीपेक्षा माझ्या अईच्या जवळचा वनवास मला जस्त सुखद आहे, तेव्हा तुला सर्वात जवळ असणारी जी(जशी) सरिता (नदी) आहे आणि तुला तिचा विरह असह्य आहे हे जाणून त्या नदीची मी तुला शपथ घालतो सागरा, मला मातृभूमी कडे परत घेऊन जा

अशी विनवणी करून देखिल सागर खळखळत हसतो आहे पाहिल्यावर कवी त्याला म्हणतात

सागरा, तुझ्या स्वमित्वासाठी मिरवणा-या या आंग्लभूमीसठी तू माझ्या आईला अबला समजून विश्वासघात करतोस?मला तिच्यापासून दूर ठेवतोस?माझी मातृभूमी अबल नाही तर सबल आहे
ही आंग्लभूमी माझ्या मा्तृभूमीपौढे कशी भयभीत होते हे मी तुला सांगणार नाही तर एके काळी तुला पीऊन घेणारे
अगस्त मुनीच तुला आता आईची गाथा कथन करतील, तेव्हा सागरा त्यांच्या भितीपोटी तरी तू मला माझ्या मा्तृभूमीला परत ने,

माझे प्राण आईसाठी तळमळत आहेत

अशी व्याकुल कवीता, असे व्याकुल गीत ज्यामधे ओतप्रोत स्नेह भरलेले आहे ते अजरामर असणारच. आज ह्या गीताच्या
१००व्या जन्मशताब्दीनिमित्त या गीताला, या कवीला आणि जिच्या स्नेहासाठी, जिच्या सहवासाठी, जिच्या विकासासाठी सावरकरांचे प्राण असे तळमळले होते त्या माझ्या मातृभूमीला ही सहस्त्र कोटी प्रणाम

सुरुचि नाईक

He me Orkut forum madhun post kela ahe.


Marathi Kavita : मराठी कविता


Offline suruchi

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: सागरा प्राण तळमळला
« Reply #1 on: December 09, 2009, 11:11:48 PM »
शार्दुल, माझा लेख माझ्या नावासकट इथे दिलात त्या बद्दल धन्यवाद, तुमचा प्रामाणिक पणा आवडला...

सुरुचि

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
Re: सागरा प्राण तळमळला
« Reply #2 on: December 10, 2009, 12:29:30 AM »
hi
khare tar orkut var adhi vachla ani mana pasun avdhla.  so i shared it here.
actually office madhye orkut block ahe.so kavita ikde ch vachto me.

tumchya ajun kavita/lekh astil tar post kara jene karun tya vachun anad milavta yeil.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):