Author Topic: तुझ्या वाढदिवसाची भेट  (Read 1663 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
तुझ्या वाढदिवसाची भेट
१६ ऑगस्ट  २०१५
वेळ : २०:१८

       ताई पुण्याहून आली ते सगळ सामान घेऊनच…. आता पुन्हा तिची धावपळ चालूच… आम्ही सगळे तिच्या मागेच. या वेळेस ती अमेरिकेला जाणार होती. १-२ वर्षाच्या प्रयत्नाने आज तिच स्वप्न खर ठरणार होत.  प्रत्येकाने आपापली कामे बाजूला ठेवून तीच  packing यासाठी वेळ दिलेला. प्रत्येकाच्या मनात काही राहील तर नाही ना ? अस विचार येउन पुन्हा काढलेली लिस्ट दोन तीनदा चेक व्हायची . माझी MBA ची इंटर्नशिप अजूनही चालूच होती.  शनिवार असल्या कारणाने मलाहि सुट्टी नाही … तरी काही तरी कारण काढून हव तितक्या लवकर घरी आली. संध्याकाळच्या ४ च्या सुमारास  मी घरी पोचले. घरी अजूनही packing च काम सुरूच होत.  घरी पोचले तेव्हा घरी नव्हती ती….तिच्यासाठी काही वस्तू आणायच्या अजूनही बाकी होत्या… थोडक्यात काय शेवटपर्यंत shopping चालूच. flight ४:०० वाजताची होती म्हणून लगेचच आवरून रात्री ८ वाजता आम्ही जेवलो. मावशी, तिची मुलगी  , ताईचे मित्र-मैत्रिणी सगळे घरीच होते. पूर्ण तयारी होऊन आम्ही रात्री ११ वाजता निघालो. … घाटकोपर ते सांताक्रूझ जायला फक्त अर्धा तास लागला असावा.आज आम्ही सगळेच पहिल्यांदा airport ला जाणार होतो… आई पप्पा मी आणि ताई गाडीने एकत्र आलो. yellow lights, wider road, numbers of vehicles,  etc.... amazing moment with her though it was incredible ....
       विश्वजितचा त्याच दिवशी birthday…. या वर्षी त्याचा birthday airport ला celebrate झाला . i mean आपला birthday अस वेगळ्याच ठिकाणी celebrate होण किती वेगळ वाटेल… त्याचे काही मित्र पुण्याहून direct airport ला आले होते.  त्यांनी त्याच्यासाठी  पुण्याहून राजमुद्रा असलेला आणि त्यावर कॅमेरा असलेला केक आणला होता.याच कारण अस कि विश्वजितला या दोन्ही गोष्टी खूप आवडत्या. कल्पनाही करू नाही शकणार अस काहीस होत ते … मला  केक station वरून घरी न्यायलासुद्धा tension येत, त्यांनी तर तो पुण्याहून लोकल मधून आणलेला…. काही गोष्टी इतक्या speacial feel होतात कि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतात…
         घड्याळात १ वाजले तिची निघायची वेळ झाली. आम्ही सगळेच तिच्या मागे मागे होतो. आता मात्र माझ्या डोळ्यातल पाणी मी काही करून थांबवू शकली नाही. पप्पांचे डोळे आज पहिल्यांदाच भरले होते. पूर्ण ती पोहोचेपर्यंत  सगळ्यांचे डोळे तिच्याकडे आशेने पहात होते कि हा जो वेळ आहे तोही थोडा वेळ का असेना थांबवा वेगेरे…. पण……त्या दिवशी घरी पोचल्यावरही वाटत होत, ती आजही जवळच कुठे आहे आणि ती कधीही भेटू शकते….
          आता उद्या ताईचा birthday रात्री १२ वाजता तिच्यासोबत  celebrate करावा अस खुपदा वाटल, पण ते अशक्यच … म्हणून घरीच काहीतरी गोड धोड बनवून, ती घरी असताना जस celebrate करतो तसच काहीस करायचं ठरल. आज घरी आई पप्पा मी, वैभव, हितेश रात्री सगळेच जागे असतील.… अजूनही planing चालूच आहे. काहीतरी special  करायचं. हे वाचताना कदाचित तिला आमच surprise मिळालही असेल… जर ती वाचत असेल तर इतकच म्हणेन ' MISS करतेय ताई तुला  … WISH YOU MANY HAPPY RETURN OF DAY … May your all wishes come true' :) :-*
« Last Edit: August 17, 2015, 01:12:41 AM by swara »

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 146
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Re: तुझ्या वाढदिवसाची भेट
« Reply #1 on: September 21, 2015, 10:40:47 AM »
nice.... asa prem asav

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: तुझ्या वाढदिवसाची भेट
« Reply #2 on: December 02, 2015, 10:24:29 PM »
 :) thnku

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):