Author Topic: जाता जाता आला...  (Read 880 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,277
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
जाता जाता आला...
« on: September 09, 2015, 07:25:42 PM »
जाता जाता आला...

आज आमच्या कडे तो आला, वा-याची थंड झुळुक घेवुन आला, मला फार सुखद बरं वाटलं, ट्रेन मधे लोक दरवाजा खिडक्या लावुन घेत होते... भिजायच्या भितीने, मी म्हटल त्यांना नका रे अडवू त्याला, परततांना तरी त्याला येवु दया, नाही थांबणार तो आता जास्त काळ.

उतरल्यावर वाटत होतं, थांबेल तो जरासा, पण तोही लहान मुलासारखा आज हट्ट करून होता, कधी कधी हट्टी मुलाचा राग येतो, पण त्याचा नाही आला... कर हट्ट आणि भिजव सा-यांना, तप्त, तृषार्त धरणीला, थोडासा मिळेल दिलासा
शेतक-याला. भिजव आमच्या सो काँल्ड काँलिफाईड, वाँटरपार्कच्या पावसात भिजणा-यांना.

एक वेळ होती घरचे लोक म्हणायचे "चल घरी, भिजु नकोस, पडसं होईल..." तरी पण हट्टाने भिजायचो, आता पावसाचा राग येतो, भिजायच सोडून आडोश्याला लपतो.... म्हणतात ना माणुस बदलतो? निसर्ग तसाच रहातो निरागस....

मी वाट पाहीली थोडा वेळ, तो नाही थांबला मग मी पण निघालो त्याच्या सोबत... मनात काही काही आठवत होत...

पाऊस बघ परतीचा
आपल्या भेटीस परत आला,
गाठले बेसावध मला
तुझ्या भेटीचा योग न आला!

= शिवाजी सांगळे, बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता