Author Topic: मोहिनी  (Read 2231 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
मोहिनी
« on: January 24, 2009, 01:16:32 AM »

परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. मानवाने अनेक गोष्टींची निर्मिती केली.प्रत्येक गोष्टीचा जन्म ठराविक वेळी झाला व ती वेळ बहुतांश लोकांना माहित असते. तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण दररोजच्या आयुष्यात नियमीत वापरतो परंतु त्या गोष्टींच्या उगमाचा आपल्याला जराही थांगपत्त नसतो. उदाहरणार्थ फक्त एकच पण मजेदार 'नाम' आणि ते म्हणजे "शिवी".दचकू नाका हो! खरंतेच लिहितोय. तुम्हीही कधी ना कधी आपला राग व्यक्त करताना या "मोहिनीचा" आधार घेतलाच असणार. "मोहिनी" यासाठी म्हणतोय की कितीही मनावर ताबा ठेवला तरी कधी ना कधी तिचे नामःस्मरण केल्याशिवाय चैनच पडत नाही. शिवीचा भक्तगण नाही, असा मनुष्य लाखातच काय पण करोडोतसुद्धा क्वचितच आढळतो.
अशा व्यक्तिंन्ना माझा कोटी-कोटी प्रणाम कारण मी त्यांच्यातला नाही.शिवीचा जन्म कधी झाला, कोणामुळे झाला, कुठे झाला याचा काडीमात्र पुरावा नाही. तरीही आजच्या युगात जेवढ्या झपाट्याने शिक्षणाचा प्रसार होत नाहीये, तेवढा प्रसार "ही"चा होतोय."मनुष्य" हे एक कोडेच आहे, कारण शिवी हे माध्यम एकच परंतु त्याचा प्रचार, प्रचारक विविध मार्गांन्ने करतात. कोणी आप्तेष्टांचा उद्धार करुन प्रचार करतो तर कोणी स्वतंत्र "ईस्टाईलमध्ये" करतो.

या आधुनीक युगात संस्कारांचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे, परंतु शिव्यांचा अभाव मुळीच जाणवणार नाही. शास्त्रज्ञ जेवढा वेळ एखाद्या वस्तुच्या संशोधनास लावतात, तेवढ्याच वेळात आजचे युवक (+ युवती) २०-२५ शिव्यांचे संशोधन करून भावी आयुष्यात सर्रास वापरून मोकळे पण होतात. घरी जर आई-वडिलच शिव्या देत असतील, तर तीच प्रथा पुढे त्यांची मुलेपण चालवितात. वडिलोपार्जित संपत्ती नाही मिळाली तरी वडिलोपार्जित "शिव्या" मुले आरामात, काहीही कष्ट न करता आत्मसात करतात.

प्रत्येक मनुष्य या जगात येतो आणि जातो आणि मागे उरतात त्या फक्त त्याच्या . . . . . . . . आठवणी .... आठवणी नाही हो, फक्त शिव्या.

तात्पर्य: अन्न, वारा आणि निवारा यांप्रमाणे "शिवी" ही माणसाची आज एक मूलभूत गरज बनली आहे.````````` ` सुरज ` ```````````````

Marathi Kavita : मराठी कविता


Offline magdum.ajay33

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: मोहिनी
« Reply #1 on: March 16, 2013, 05:13:23 PM »
REALITY: शास्त्रज्ञ जेवढा वेळ
एखाद्या वस्तुच्या संशोधनास लावतात,
तेवढ्याच वेळात आजचे युवक (+ युवती) २०-२५
शिव्यांचे संशोधन करून भावी आयुष्यात सर्रास
वापरून मोकळे पण होतात. घरी जर आई-वडिलच
शिव्या देत असतील, तर तीच प्रथा पुढे
त्यांची मुलेपण चालवितात. वडिलोपार्जित
संपत्ती नाही मिळाली तरी वडिलोपार्जित
"शिव्या" मुले आरामात, काहीही कष्ट न
करता आत्मसात करतात.