मी रेल्वेत चढलो तेव्हा डब्यात फक्त एक तरुणी खिडकीशेजारी बसली होती, तिला निरोप द्यायला आलेले एक जोडपे तिला काही सूचना सांगत होते - सामअनावर लक्ष्य ठेव, बाहेर डोकाऊ नको, अनोळखी इसमाशी बोलू नको इत्यादी इत्यादी...आणि ती निमुटपणे ऐकत होती.
गाडीने स्टेशन सोद्लावर मी तिला म्हणालो, "तुम्ही कुठे जाणार आहात ?", माझा आवाज ऐकून ती जरा गोंधळली, तिला वाटला होता कदाचित ती डब्यात एकटीच आहे.... ती सहरांपुरला जाणार आहे आणि तिची काकू नायला येणार असल्याचे तिने मला सांगितले.ऑक्टोबर महिना असल्यामुळे हवेत गारवा होता आणि बाहेर हिरवळ पसरली होती, निसर्गाला उधाणच आला होता जणू....
थोड्या गप्पा झाल्या वर मी तिला ( थोडं धाडस करूनच - कारण मी अंध होतो...) म्हणालो " तुमचा चेहरा खूप सुंदर आहे.", ती कींचीत हसली ( असावी)आणि म्हणाली..किती सुन्दर शब्द आहेत " चेहरा खूप सुंदर आहे"....
आता मी पण थोडं सरावलो होतो,मीपण खिडकी बाहेर डोकाऊ लागलो- निसर्गाची शोभा पाहू लागलो..( मला असा वाटत होता कि मी अंधळा आहे हे तिला कळायला नको, म्हणून मी बाहेर बघत - बघत एक निसर्ग वरच गीत गुणगुणू लागलो..), मधूनच तिने केसात माळलेल्या मोगर्याचा सुगंध दरवळत होता..
थोड्या वेळात तिची उतरण्याचे ठिकाण आले, तिची काकू आली होती... ती निघन गेली...
थोड्या वेळात डब्यात एक इसम चढला.. तो म्हणाला, " मला माफ करा, आता उतरून गेलेल्या तुमच्या सहा प्रवासी इतका मी आकर्षक नाही ह..."\
मी त्याला विचारले कि, आता उतरून गेलेल्या तरुणीचे केस लांब होते कि आखूड?

"
तो म्हणाला.. " मी तीचे डोळेच पहिले... खूप खूप सुंदर होते ते... पण त्यांचा काही उपयोग न्हवता, बिचारी आंधळी होती...."
( हि मुळ लघु कथा प्रसिद्ध इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड यांची आहे.....( The eyes have it ...) सुमारे ३ वर्ष पूर्वी मी पेपर मध्ये वाचली होती तीचे कात्रण बरेच महिने माझ्या पाकिटात होते.... जीर्ण होऊन फाटून गेले.. पण हि गोष्ट आजतागायत माझ्या स्मृतीत आहे...)