Author Topic: माझे २०१० साठीचे १३ संकल्प... कारणांसहित...  (Read 5385 times)

Offline dhundravi

 • Newbie
 • *
 • Posts: 34


माझे २०१० साठीचे १३ संकल्प... कारणांसहित...

मित्र मैत्रीणींनो
माझे २०१० साठीचे १३ संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे.


संकल्प १. - सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण -
अ. - पल्लवी जोशी - आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावते. एकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग संगीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मग गायक .... मग वादक.... मग प्रेक्षक..... मग श्रोते...... मग मान्यवर..... मग ती स्वत:..... असं नुसत्या टाळ्याच टाळ्या.... ! बर नुसत्या टाळ्या नाही तर जोरदार टाळ्या. वाट्टेल ते मॅचिंग करुन, वाट्टेल त्या गाण्याला, वाट्टेल त्या शब्दांनी, तिला ओ का ठो कळत नसताना, मळमळेल इतकं कौतुक करते. अगदी कुणी ढेकर जरी दिला तरी, "काय अप्रतिम ढेकर दिलास आणि माझ्या खुप आवडीच्या  ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार.... "  काय बोलयचं ह्यावर.... ? 
ब. - अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ - "अरे... अरे... अरे... काय भन्नाट, सुसाट, अचाट गायलास... मित्रा..... कानाचे पडदे पार फाडलेस बघ... अरे काय साजुक खाऊन नाजुक गळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या.... एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघ मी.....
क. बाळासाहेब मंगेशकर - (खयाल गायकी, शोभा गुर्टु, तंबो-याचा तारा, स्वातंत्र्यपुर्व काळ, ज्ञानेश्वर महाराज, आकाशवाणी अशा विविध विषयांवर बोलल्यानंतर सुमारे पावणे दोन तासांनी...)   "...१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकर आला होता. त्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा ढ लावुन घेतला आणि..... ...........................................................
...........................................................
...........................................................
........................................................... बाकी तुम्ही छान गायलात......................
........................... असो !


संकल्प २. - बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण - ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास.....
अ. - ती तिच्या चुका मान्य करत नाही.
ब. - जीभेला हाड नसतं, हे ती सिद्ध करते.
क. - परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, " माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला आणि एकदा  जरा आरशात........       
.............................असो.... !


संकल्प ३. - खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय का ? बर मग ... खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण -
अ. - हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
ब. - ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसते. ती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते. सुट्टीचा आनंद मिळत नाही.
क. - नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःख विसरायला आलोय हे कारण त्याला पटत नाही. त्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
ड. - खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप....
.............................असो.... !


संकल्प ४. - दारु पिणार नाही.
कारण -
अ. - तोल जातो.
ब. - पैसे जातात
क. - चव जाते.
ड. - शुद्ध जाते.
ई. - दृष्टी जाते.
फ. - मजा जाते.
ग. - इज्जत जाते.संकल्प ५. - तमाशा बघणार नाही.
कारण -
अ. - रंभा घायाळकर प्रकरण..... http://dhundravi.multiply.com/calendar/item/10023
ब. - पुन्हा रंभा घायाळकर प्रकरण..... http://dhundravi.multiply.com/calendar/item/10026संकल्प ६. - कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण -
अ. - तिच्याकडुन डाव्या गालावर...
ब. - संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर....


संकल्प ७. - पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाही, असे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मला कधीच बसायला मिळाले नाहीये.)
कारण -
अ. - उरलेले सुट्टे पैसे, चपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही. 
ब. - हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाही. जिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेच. तो जिथं सोडेल तिथुन परत (बस करुनच) यावं लागतं. 
क. - पुढुन चढुन देत नाहीत, सर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाही. ड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाही, कंडक्टर ऐकत नाही.
ड. - तिकीट चुकवुन.... म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार....
.............................असो.... !


संकल्प ८. - लांबच्या प्रवासात केळी नेणार नाही.
कारण -
अ. - घाटात केळ्याचा असह्य्य वास सुटतो. मळमळतं. कधीकधी ओकारी होते..... ब-याचदा ओकारी होते.... नेहमीच ओकारी होते.
ब. - केळी चुकुन सामानाखाली गेल्यास पिशवीतच शिकरण होतं.
क. - केळीमुळे पोट गच्च होतं.
ड. - केळीचे करपट ढेकर खुप....
.............................असो.... !


संकल्प ९. - घड्याळ न बघता, पिशवी न घेता, सुट्टॆ पैसे न घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण -
अ. - गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
ब. - १ वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !!  )
क. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
ड. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.


संकल्प १०. - योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण -
अ. - योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतो. काल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीत पकडल्यानंतर पाठीचा मणका माकडहाडात अड्कुनच बसला हो.... बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा...... असो...
ब. - व्यायाम केला की खुप थकायला होतं.... गळुन जायला होतं.... चक्कर येते..... आजारी पडायला होतं........ तब्येत बिघडते.
क. - इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी.....
.............................असो.... !


संकल्प ११. - हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण -
अ. - डीप्रेशन येतं.... 
ब. - बीपी वाढतं....
क. - डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
ड. - जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
ई. - कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा स्वतःचेच)
फ. - भयानक स्वप्न पडतात. भास होतात...
ग. - पुन्हा कधीतरी ते दिसेल, ऐकु येईल असं वाटत राहतं...

 
संकल्प १२. - वाहतुकीचे नियम मोडणार नाही.
कारण -
अ. - मागच्या आठवड्यात मी मोटार-सायकल रेस मधे पहिला आलो. मग त्याच चौकात मला बक्षिस म्हणुन १०० रुपयांची पावती देण्यात आली. आता मी ठरवलय सगळे पुढे गेले तरी चालतील पण सिग्नल तोडायचा नाही.
ब. - झेब्रा क्रॉसिंगवर उभं राहिलो तर, "वेळ जात नाही म्हणुन आम्ही हे पट्टे मारलेले नाहियेत" अशी बहुमुल्य माहिती एका मामानी मला १०० रुपयात दिली.
क. - परवा मी १०५ रुपयाचा उसाचा रस प्यायला. आता पी वन...पी टु... बघायचं ठरवलय.
ड. - घाई गडबडीत जोरात जात असताना रस्त्यावर मध्येच उभ्या असलेल्या मामाला....
.............................असो.... !
 

संकल्प १३. - ऑफिसमध्ये साहित्यलेखन करणार नाही. विशेषतः विनोदी लेखन....
कारण -
अ. - त्या प्रसुति वेदना होत असतानाच्या कळा ऑफिसात देता येत नाहित.
ब. - वेगवेगळ्या पात्रांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्याकडे तटस्थपणे पाहताना... हसताना विचित्र आवाज येतो. बाकीचे लोक 'काय यडं आहे' अशा नजरेने बघतात.
क. - काही लिहुन झालं की समोरच्याला वाचुन दाखवावसं वाटतं. एकदा समोर क्लायंट होता आणि एकदा बॉस..... (प्रतिसाद म्हणुन मेमो मिळाला....!)
ड. - मायबोलीवरच्या मित्र-मैत्रीणींचे झकास प्रतिसाद वाचले की तिथेच बॉसच्या तोंडावर राजीनामा मारावासा वाटतो....

तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठिशी असतील तरच हे संकल्प पुर्ण होतील...

तुमचाच...
धुंद रवी.


Offline Swan

 • Newbie
 • *
 • Posts: 48

लई भारी मित्रा..जोरदार आहे सुरुवात ...

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
:D :D :D mast ahe lekh :D

he vakya khup avadala ........... thanks for this .......... aayushyat kadhi tari upyogi padel mala hi ;) ...........
माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला ........

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,511
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
:D :D :D mast ahe lekh :D

he vakya khup avadala ........... thanks for this .......... aayushyat kadhi tari upyogi padel mala hi ;) ...........
माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलय. जर हे दोष नसते तर कुणीतरी बरा नसता का मिळाला ........

 :D   :D :D  :D  :D

@Ravi : Mast ahe yaaar. 

Offline gaurig

 • Full Member
 • ***
 • Posts: 983
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
ekdam zakkas.........
Navin varshyachya hardik shubheccha ani tumache sarva sankalp purna hovota hich ishwarcharani parthana  :) ;)
Keep it up

Offline saayali_sachin

 • Newbie
 • *
 • Posts: 9
« Last Edit: January 13, 2010, 11:09:51 AM by talktoanil »

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,511
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Same topic was published by Shardul and it has been deleted.

Offline vikramsmita

 • Newbie
 • *
 • Posts: 2
jara ushirach vachle he.....
pan phar bhannat ahe....

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
लेख फार छान आहे ....

संकल्प ९. - घड्याळ न बघता, पिशवी न घेता, सुट्टॆ पैसे न घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तर पुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण -
अ. - गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
ब. - १ वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणे. आगीचा बंब पोहचता पोहचता १ वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलं आणि म्हणाले आता ४ वाजता या.... १ वाजता बंद म्हणजे बंद !!  )******
क. - पिशवी विसरली तर ते देत नाहीत. अंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतात. पिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचा आहे, पिशव्या विकण्याचा नाही, असा आपमान करतात.
ड. - सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.

हा किस्सा जास्त आवडला

Offline NilamT

 • Jr. Member
 • **
 • Posts: 69

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):