सुविचार................
........Unknown
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१) सदगुणांसाठी दुसयाकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
२) भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.
३) परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
४) माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे तर गुणांनी पाप्त होते.
५) स्वावलंबी शिक्षण हेच खया विद्यार्थ्याचे ब्रीद.
६) चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.
७) काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?
८) अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
९) यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.
१०) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
११) सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.
१२) अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
१३) झाडासारखे जगा... खूप उंच व्हा... पण जीवन देणाया मातीला विसरू नका.
१४) स्वर्गापेक्षाही चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करा. कारण चागंली पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होईल.
१५) इच्छा दांडगी असली की मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते.
१६) अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.
१७) कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
१८) अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.
१९) तलवार ही शुरांची नव्हे; भीतीची निशाणी आहे.
२०) जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.
२१) आज्ञेला सामर्थ्य यायला आधी सेवा करावी लागते .
२२) माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो . अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो .
२३) जीभ जिंकणारा जग जिंकतो.
२४) झाले गेले विसरुनि जावे... पुढे पुढे चालावे... जीवना गाणे गातच राहावे.
२५) गुलाब पाणी देणाया हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.
२६) जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
२७) विचार कराण्यासाढी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
२८) कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।।
२९) चारीत्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंतःकरणात चंद्राची शीतलता असायला हवी.
३०) प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
३१) शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
३२) शक्योतोवर कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
३३) पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
३४) अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.
३५) देश तुमच्यासाठी काय करील हे विचारण्यापेक्षा देशासाठी तुम्ही काय कराल ते सांगा.
३६) अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
३७) समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.
३८) फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.
३९) पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
४०) दुसयाला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
४१) श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात.
४२) महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते.
४३) क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
४४) आळसाचा पवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
४५) पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.
४६) जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
४७) अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.
४८) जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील.
४९) मैत्रीच्या रोपट्ययाला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
५०) दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो.
५१) विचार परीपक्व झाले की शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात.
५२) नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड.
५३) राजाला फक्त राज्य मानते, तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.
५४) निंदकाचे घर असावे शेजारी.
५५) लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे.
५६) कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही; मात्र मोर मेला तर आपण हळहळतो. कारण सौंदर्य नष्ट होते.
५७) बुध्दी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक.
५८) त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.
५९) आपण पक्षापमाणे आकाशात उडायला शिकलो, माशापमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
६०) मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
६१) प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान.
६२) कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे खरे भाषण !
६३) खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि देशाचे हीत ज्यात असेल तेच करावे.
६४) जो आत्मप्रोंढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील त्याला प्रतिष्ठा पाप्त होईल.
६५) खरी प्रीती ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते.
६६) कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.
६७) मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
६८) कीर्ती ही सावलीपमाणे सदगुणांबरोबर वावरत असते.
६९) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
७०) हात उगारण्यासाठी नसतात; उभारण्यासाठी असतात.
७१) तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते.
७२) माणसाचे चरित्र्य आरशात दिसत नसते.
७३) वैयक्तिक तृष्णेला अंत नसतो.
७४) जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.
७५) सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
७६) गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.
७७) गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.
७८) ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.
७९) लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
८०) दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.
८१) सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.
८२) प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते.
८३) नियम अगदी थोडा असावा पण तो प्राणापलिकडे जपावा.
८४) शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
८५) सदगुणांवर हल्ला केला तरी त्याला इजा होत नाहीत.
८६) मानापमानाच्या पलिकडे जगणं शिका.
८७) माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.
८८) जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
८९) सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड.
९०) माणंसाकरिता धर्म आहे, धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या.
९१) जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.
९२) माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.
९३) कडू घोट पेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो.
९४) प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
९५) केल्याविण सांगो नये आपला पराक्रम ।।
९६) विचार बदला; आयुष्य बदलेल.
९७) ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
९८) एकच नियम पाळा - कोणताही नियम तोडू नका.
९९) ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक !
१००) सत (चागंले) कडे नेते ते सत्य.