Author Topic: पहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव  (Read 2374 times)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
पहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव

                                                                                 राजन तावडे (अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती)
जुलै-ऑगस्टमध्ये इंटरव्ह्यूचा सीझन सगळीकडे चालू असतो. कॉलेजमधून डिग्री घेऊन नवीन "उमेदवार' सगळ्या MIDC मध्ये फिरत असतात. (अर्थात सोबत सर्टिफिकेटची बॅग आणि डोक्‍यात जोडीला भरपूर स्वप्नं!) कित्येक जण गावातून स्वप्न बघत नोकरी शोधण्यासाठी शहरात येत असतात. मीसुद्धा त्यातला एक होतो. त्या वेळी मी घेतलेल्या (दिलेल्या नाही!) इंटरव्ह्यूची ही सत्यकथा आहे.
ही माझ्या करिअरच्या "लहानपणीची' गोष्ट आहे. (तसं माझं करिअर अजून मोठे नाही, पण गोष्ट पुण्यातील असल्यामुळे थोडी पुणेरी भाषा!) मी तेव्हा "ट्रेनी इंजिनिअर' होतो. नोकरी शोधण्यासाठी पुण्याला आलो होतो. सर्टिफिकेटची बॅग घेऊन पुण्यातील रस्ते फिरत होतो. सगळ्या कंपन्यांमध्ये Bio-data देत होतो. गावी असताना गावाकडचे काका म्हणत- पुण्यात बजाज, टेल्कोत जा तिथे लगेच नोकरी मिळेल. खरी परिस्थिती अशी होती, की नोकरी राहिली दूर बजाज, टेल्कोचे सिक्‍युरिटी ऑफिसर कंपनीच्या गेटसमोर उभे राहू देत नसत.
त्या वेळी स्वप्नं मात्र खूप बघत होतो. आपण रस्त्यावरून चाललो आहोत. आपल्याला "कोणाच्या' तरी गाडीचा धक्का लागेल. आपण खाली पडल्यावर "तुम्हाला लागलं तर नाही ना?' असा मंजुळ आवाज येईल. नंतर तिच्या घरी जाऊन तिच्या मॅनेजर बाबाची ओळख होईल. दुसऱ्या दिवशी नोकरी पक्की! पण यापैकी काहीही झालं नाही. संघर्ष चालू होता. गावी फादर काळजी करत होते आणि इथे गॉडफादरचा पत्ता नव्हता!
थोडक्‍यात...
जिंदगी बहोत तंग थी
हमारी हिंमत देखो उसे हम आज भी हसीन कहते है!

इंटरव्ह्यू होत होते, पण यश मिळत नव्हते. त्या वेळी मोठा प्रश्‍न पडायचा, की इंटरव्ह्यू कसा द्यावा की आपल्याला यश मिळेल? इंटरव्ह्यू घेणाऱ्याची नक्की काय अपेक्षा असते? आम्हाला इंडस्ट्री अनुभव नसताना ते ट्रेनी इंजिनिअरकडून नक्की कसला अनुभव अपेक्षित धरतात? भरपूर प्रश्‍न आणि उत्तरे मात्र सापडत नव्हती. ही उत्तरे शोधण्यासाठी एखाद्या कंपनीच्या मॅनेजर किंवा डायरेक्‍टरचा आपण इंटरव्ह्यू घेतला तर.... अशी भन्नाट कल्पना डोक्‍यात आली. वपुंचं वाक्‍य आठवलं, "तुमच्या भावना जर अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या असतील तर पुढे कुणाशीही संवाद साधताना मागे सरकू नका. काल्पनिक भीतीने कधीही दूर राहू नका.' मी मग माझ्या "Candidate` चा शोध सुरू केला. त्याच वेळी मला एका कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं.
मी नेहमीप्रमाणे तयारी करून गेलो. मी तिथे गेल्यावर मला सेक्रेटरीने सांगितले, की माझा इंटरव्ह्यू डायरेक्‍टर घेणार आहेत. तयार राहा. तुम्हाला कल्पना आली असेल डायरेक्‍टर इंटरव्ह्यू घेणार म्हटल्यावर माझी काय स्थिती झाली असेल. त्यांच्या केबिनसमोर बसलो तेव्हा केबिनसमोर पाटीवर त्यांचे नाव व डॉक्‍टरेट (USA) वाचल्यावर मनात म्हटले केबिनमध्ये ट्रेनी इंजिनिअर व USA Dr. चा सामना रंगणार बहुतेक.

डायरेक्‍टरनी सर्व क्षेत्रांतील प्रश्‍न विचारले. कॉलेज प्रोजेक्‍ट, सेमिनारवर, माझ्या अनुभवाबद्दल विचारले. काही प्रश्‍न डोक्‍यावरून जात होते, तर काही मी हिमतीने अडवत होतो व उत्तरे देत होतो. त्यातला एक प्रश्‍न होता, 'Which steel used in industries?`` असलेले स्टील सांगितले, 'Mild steel, Stainless steel & En Steel.`` त्यांचा लगेच प्रश्‍न आला, 'What is EN steel?`` आणि माझी दांडी उडाली. इंटरव्ह्यू संपला. नेहमीप्रमाणे त्यांनी कळवतो, असे सांगितले.

डायरेक्‍टर खूप चांगले व्यक्ती वाटले. त्यांनी मला भरपूर वेळा सांभाळून घेतले. मी लगेच ठरविले, की इंटरव्ह्यू घ्यायला हा चांगला "Candidate` आहे. आपल्याला त्यांच्याशी संपर्क वाढवावा लागेल; पण कसं पुढे जाणार हा मोठा प्रश्‍न होता. इतक्‍यात मला आठवले, की त्यांनी आपल्याला एक प्रश्‍न विचारला होता EN Steel बद्दल. त्याचे उत्तर आपण शोधून काढले तर आपल्याला त्यांच्याशी बोलायची संधी मिळेल. पुढचे दोन दिवस मी ब्रिटिश लायब्ररीमध्ये EN Steel चा शोध घेतला व एका संदर्भ पुस्तकात मला EN steel चा शोध लागला. मी लगेच डायरेक्‍टरना फोन केला व त्यांच्याशी बोललो. (त्याआधी त्यांच्या सेक्रेटरीबरोबर नाही आहेत, मीटिंगमध्ये आहेत, बिझी आहेत असा खो-खो खेळावा लागला. त्याला इलाज नाही.) त्यांचा माझा झालेला संवाद सांगतो.

'Good Evening sir, राजन तावडे. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला होता. तुम्ही मला एक प्रश्‍न विचारला होता, what is En steel? आज मला ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्याचे उत्तर सापडले. EN म्हणजे Emergency Number. जर्मन लोकांनी या स्टीलचा दुसऱ्या महायुद्धात शोध लावला, पण त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी EN - Emergency Number असे स्टील सीरिजला नाव दिले.'' एका फटक्‍यात मी सर्व सांगून टाकले.
'Good job,`` डायरेक्‍टरनी मला सर्टिफिकेट दिले. खूप बरे वाटले.
'तुम्ही बिझी आहात का? मला तुमच्याशी बोलायचे होते.'' माझी नम्र सुरवात.
'बोला'' डायरेक्‍टरांचा ग्रीन सिग्नल.
'सर, मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यावयाचा आहे.'' माझा डायरेक्‍ट ऍटॅक.
'इंटरव्ह्यू...'' डायरेक्‍टरांचा मोठा पॉझ.
'इंटरव्ह्यू म्हणजे मला काही प्रश्‍न विचारायचे होते माझ्या करिअरबद्दल. तुमचा सल्ला हवा आहे.'' माझे स्पष्टीकरण.
'सध्या प्रोजेक्‍टचे काम चालू आहे व मी खूप बिझी असतो,'' डायरेक्‍टरांचा गुगली.
'सर मला फक्त १० मिनिटे हवी आहेत तेपण तुमच्या सोयीनुसार,'' मी चिकट्या. (सभ्य भाषेत "जिद्दी!')
'एक मिनिट मी डायरी बघतो,'' डायरेक्‍टरचा पुन्हा ग्रीन सिग्नल.
'तुम्ही डायरी बघा नाही तर पंचांग बघा, मला तुमची १० मिनिटे पाहिजे म्हणजे पाहिजे,'' हे मी डायरेक्‍टरना नाही तर मनातल्या मनात म्हणालो.
त्यांनी काही मिनिटे मला "फोन संगीत' ऐकवले.
"तुला शनिवारी वेळ आहे का?'' या त्यांच्या नम्र प्रश्‍नाने मी उडालो. 'विद्या विनयेन शोभते' हा पहिला धडा फोनवर मिळाला.
अखेर त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला वेळ मिळाली.

मी इंटरव्ह्यूसाठी प्रश्‍नावली तयार केली. त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी सल्ले, त्यांचा ट्रेनी इंजिनिअर ते डायरेक्‍टरचा करिअर प्रवास, इंजिनिअरसाठी असलेल्या संस्था, मासिके इत्यादी विषयांवर बोलायचे ठरविले.
इंटरव्ह्यू खूप छान झाला. अर्धा तास त्यांनी वेळ दिला. ते पण खुशीने स्वतःचे अनुभव सांगत होते. ते म्हणाले, 'मी ट्रेनी इंजिनिअर असताना खूप चुका केल्या व शिकलो. आता डायरेक्‍टर झाल्यावर मला जास्त काळजी घ्यावी लागते कारण माझी चूक पकडणारा कुणी नाही. मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हा वाटायचं मी अर्धा इंजिनिअर झालो. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा कळले इंजिनिअरिंगला आता कुठे सुरवात झाली आहे.''
'इंटरव्ह्यू खरा तर उमेदवार जेव्हा केबिनमध्ये येतो तेव्हापासून सुरू होतो आणि उमेदवार केबिनमधून बाहेर गेल्यावर संपतो. आमची "तयार' नजर उमेदवाराच्या सगळं बोलणं, हालचाली, सगळं टिपत असते. तुम्ही 5 फूट असाल 5 फूट सांगा, 6 फूट असाल तर फसाल. ट्रेनी इंजिनिअरमध्ये सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. ट्रेनी इंजिनिअरला कॉलेज प्रोजेक्‍टमधील माहिती पाहिजे. तुमच्या क्षेत्रातील सिद्धान्त माहिती पाहिजेत.''
या इंटरव्ह्यूमुळे मला खूप फायदा झाला. माझ्या क्षेत्रातील चांगला संदर्भ मिळाला. माझा आत्मविश्‍वास वाढला. ज्या केबिनमध्ये मी इंटरव्ह्यू देताना दडपणाने बसत असे तिथे मी आत्मविश्‍वासाने बसू लागलो. अशा वेळी मोठ्या माणसाच्या (स्वतःच्या क्षेत्रात "बाप' असणाऱ्या!) सल्ल्यामुळे तुम्हाला नेहमी आधार मिळतो व करिअर घडवायला स्फूर्ती मिळते.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
mast ahe lekh :)

Offline swati121

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
 • Gender: Female
khupch chan.mala maze interview che divas athavale............