Author Topic: तो एक क्षण... नकारात्मक विचार दूर सारणारा  (Read 1811 times)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
तो एक क्षण... नकारात्मक विचार दूर सारणारा

                                                                                               - रेवती पोकळे, शनिवार पेठ

अलीकडे म्हणजे काही 3-4 वर्षापूर्वी मे-जूनमध्ये 10 वी, 12 वीच्या निकालाच्या वेळेस आत्महत्यांच्या बातम्या जास्त प्रमाणात वाचायला लागत. परंतु आता....?

निकालाच्या भीतीपोटी आत्महत्या आणि मुख्य म्हणजे ज्या वयात 'आत्महत्या म्हणजे काय?' हे माहीतही नाही, त्या वयात आत्महत्या? व्यक्तीनुसार याचे कारण वेगवेगळे असले तरी याचा गाभा हाच की, पैसा, करिअर, समाजाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याची भावना...

आत्महत्येचा विचार किंवा अशा प्रकारे नकारात्मक विचार करणारे विद्यार्थी किंवा व्यक्तीने क्षणभर थांबून या धकाधकीच्या जीवनात कधी स्वतःसाठी वेळ दिला आहे का? विचार केला आहे का? की आपण पैसा, करिअर यामागे एवढे का धावत आहोत? ज्या सुखासाठी, ज्या व्यक्तींसाठी आपण धावत आहोत, त्या व्यक्ती, ते सुखाचे क्षण आपल्यासोबत कायम असणार आहेत का? या धावण्याला आपण काही मर्यादा घालून घेतली आहे का?

अति- अति धावून सर्वच मिळवण्याच्या वृत्तीपेक्षा थोडे कमी धावून आहे त्यात समाधान का मानत नाही? या सर्वाला एक कारण असं असू शकतं ः अशी इच्छा- लगेच किंवा त्वरित सुख मिळवणे, त्याचप्रमाणे कोणाचे अनुकरण करायचे, कोणाचे नाही, याचा विचारही न करणे, चित्रपट व वास्तव जीवन यांतील फरक न ओळखणे इ. असू शकतात. या सर्वांवर उपाय काय? आज अनेक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती म्हणतात, "व्यक्तिमत्त्वविकास झाला पाहिजे, समुपदेशन घेतले पाहिजे'; पण आज बऱ्याच लोकांना समुपदेशन म्हणजे काय, हे माहिती नाही. आमचे सर डॉ. भरत देसाई नेहमी म्हणतात, ""या जगातला सर्वांत मोठा समुपदेशक श्रीकृष्ण आहे व त्याने कुरुक्षेत्रावर जे अर्जुनाला गीतेतून मार्गदर्शन केले आहे, तेच समुपदेशन आहे.''

गीतेत काय आहे?
किशनने कहा अर्जुनसे
ना प्यार दिखा दुश्‍मनसे
युद्ध कर!

हे शत्रू कोण आहेत? तर आपली भय भावना, राग, संशय, गोंधळलेली मनःस्थिती, लोभ, मत्सर इ.
एक नकारात्मक विचार पुढे जाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. या विचारांवर, वरील शत्रूंवर आपण प्रेम करतो, त्यांना कुरवाळतो. त्यांच्याशी युद्ध करून मात करण्याचा प्रयत्न केला तर हे लक्षात येईल, की ज्याप्रमाणे कृष्ण अर्जुनाच्या पाठीशी होता, त्याप्रमाणे तो आपल्याही पाठीशी आहे. नकारात्मक विचार आल्यावर तो तसाच पुढे नेण्यापेक्षा जरा एक क्षण थांबून विचार केला तर सहज समजेल, की आपण स्वतःला या विचारांत बांधतो. त्या क्षणी प्राणायाम, सकारात्मक विचार, आवडत्या देवावर श्रद्धा ठेवून जर स्मरण केले, तर नक्कीच आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकतो.

तेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणींनो, या जगात कोणतीच गोष्ट निरर्थक नाही. दगड-मातीचाही उपयोग होतो. आपण तर माणूस आहोत. देवाने सर्वांत सुंदर व उपयुक्त गोष्ट बनवली आहे ती म्हणजे माणूस. आपले जीवन असे सहजासहजी वाया घालवू नका.

नकारात्मक विचार आल्याक्षणी जर आपण स्वतःला सावरले, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. आणि या क्षणी स्वतःला सावरण्यासाठी खूपच उपयोगी पडते, ती गीता!
नकारात्मक विचार करणाऱ्यांनी एकदा गीता उघडून वाचली, तरी हा लेख लिहिण्याच्या कणभर, अल्पशा प्रयत्नांचे सार्थक झाले असे मला वाटेल.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.