Author Topic: वेदना  (Read 2456 times)

Offline saru

 • Jr. Member
 • **
 • Posts: 62
वेदना
« on: June 21, 2010, 11:55:42 AM »
नवजीवन society मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो राहायचा.....५ वर्षांनी मोठा होता तो ज्या दिवसापासून राहायला आला त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......love @ first sight म्हणतात अस काही.आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यात भरेल अस होत.......नवीन वूक्तीशी बोलतानाही जुने मित्र असल्यासारखाच बोलायचं त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री करायचे.....त्यामुळेच तो माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली नाही.येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.त्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही.मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी नकळत पडलो.नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा तर तो फक्त माझ्याशीच खेळत होता मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत होती.त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत.त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता नवीन असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग मध्ये रहायची त्यामुळे ती निघून गेली.मी आमच्या विंग च्या खाली आले लिफ्ट च button प्रेस केल.हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास झाला.हृदयाचे ठोके वाढले होते हत्तातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते लिफ्ट आली दार उघडल


घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या आरश्याने दाखवून दिल.त्याने ४ थ्या माळ्याच button प्रेस केल आणि fan on केला.दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.लिफ्ट ने पहिला majala क्रॉस केला तेव्हा अचानक त्याने stopचदाबल.मला काही कळलच नाही fan च्या आवाजाशिवाय दुसरा कोणता आवाज माझ्या कानी पडत नव्हता माझ्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र स्मित हास्य करत माझ्यासमोर आला. माझ्यासमोर एका गुढग्यावर बसला आणि खिशातली cadburry काढत म्हणाला will u marry मी...?? मला तर काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट थांबलेली.पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना? परत त्याचा तोच प्रश्न will u marry me ...??? मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली cadburry घेतली तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे उमटवून गेला तो हसला आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.मी घरात आले आईने जेवायलातात वाढल पण माझी भूक तर त्याच्या propose नेच शमली होती.अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत.जे हव ते मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली.त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नाही आली.इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू शकेल याची कल्पना नव्हती.पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही.सकाळी उठले तेव्हा हम आपके है कौन मधल गान आठवलं


chocolate lime juice
ice cream toffiya
कल जैसे अब मेरे शौक है कहा
गुडिया खिलौनी मेरी साहेलिया
अब मुझे लगती ही सारी पहेलिया
ये कौनसा मोड ही उम्र का..???/
खूप उत्साहात सर्व काम आटपत होते. आईच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही तिने विचारलं काय झाल आज एवढ्या उत्साहाने काम करतेस ?मी म्हटलं काम कराव तरी बोलणार आणि काम नाही केल तरी बोलणार मग ती गप्प बसली माझ मलाच हसू आल. खरच बालपण केव्हा सरत आणि आपण तारुण्यात केव्हा पदार्पण करतो हे कळतंच नाही.कालपर्यंत आई वडिलांची सोनू आता अचानक त्याची प्रेयसी झाली होती. त्या दिवशी गरबा खेळायला जाताना खूप उत्साहहोता.तोही आला होता पण आज त्याच्याशी खेळताना खूप भीती पण वाटत होती मैत्रिणीला कळेल,त्याचे मित्र चिडवतील असे anek विचार मनात येत होते.एखाद्याशी मैत्री असली कि काही वाटत नाही पण तेच जर एखाद्याच्या प्रेमात पडलो तर इतरांसमोर त्याच्याशी बोलायला अव्घाद्ल्यासार्ख वाटत .पण त्याच खेळण इतक छान होत किमी स्वताला थांबवू नाही शकले.परत रात्री लिफ्ट मध्ये दोघेजण.मला म्हणाला खूप छान खेळतेस .गरबा मी म्हणाले माझ्यापेक्षा तुझ खेळण मला खूप आवडल.एका मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितले ती कवयित्री होती मग काय madam च सुरु झाल माझ्यावर कविता करायला.खूप छान कविता केल्या तिने.त्यानेहि मला एक चारोळी पाठविली होती ती खूप आवडली मला


तुझ्या मनातल्या रंगांना
बघून इंद्रधनुष्यही लाजेल
त्या लाजण्याची एक
अप्रतिम छटा क्षितिजावर साजेल


नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मनसोक्त गरबा खेळले खेळले कसले त्याच्या प्रेमाच्या रंगात रंग्लेच जणू .परत त्या दिवशी लिफ्ट मध्ये गेलो तेवढ्यात आवाजआला wait wait म्हणत जोशी काका धावतच आले. .त्याने लिफ्ट च्या दारात हात टाकला हुशश्श करत जोशी काका आत आले.मग कसल बोलायला मिळत कारण ते सातव्या मजल्यावर राहतात. आम्ही दोघेही मागे उभे होतो.२ रा मजला क्रॉस झाल्यावर त्याने मागून हळूच माझ्या हातात एक letter दिल मी चटकन ते घेतलं आणि clutch मध्ये ठेवलं.घरी आले आणि जेवल्यावर रात्री ते letter वाचायला घेतलं

dear सोनू

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्यापाशून काही लपवून ठेवायचं नाही त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो अगदी जीवापाड पण एक दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते माझ्यासारखाच ती इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत. मी तिला जाब विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.पण मी मात्र खूप hurt झालो.त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं पण मला तुझा स्वभाव खूप आवडला खर सांगतो आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व गोष्टी मी न्ह्याहाळायचो.तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या लक्षातयायला वेळ लागला नाही. societyt ल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायचीपत्र वाचून झाल्यावर मला त्याच्या x-girl friend विषयी मनात द्वेष निर्माण झाला पण ठरवलं त्याला या विषयी काही विचारून दुखवायचं नाही.पण त्याचा स्पष्टवक्तेपणा माझ्या मनात त्याच्याविषयी असलेल्या प्रेमात आणखी भर घालून गेला .दिवस खूप चान चालले होते .क्लासवरून येताना कधी कधी त्याला भेटायचे.मग हॉटेलात जाऊन गप्पा व्हायच्या मला बाहेर त्याच्यासोबत फिरायला खूप भीती वाटायची म्हणून नेहमी hotelling च व्हायचं . एकदा त्याच्याबरोबर bike वरून खारघरला small wondermadhe movie बघायला गेले होते .वाटत होत bike वर त्याच्या मागे घटत मिठी मारून बसाव पण माझ्या policy मध्ये ते बसत नव्हत.म्हणून मग फक्त खांद्यावरच हात ठेवला .या दोन महिन्याच्या भेटीगाठीत त्याने एकदाही मला स्पर्श केला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही त्यामुळे मी स्वताला खूप नशीबवान समजायचे .त्याच्याविषयी मनात आदर वाढत होता .तो फक्त माझाच राहावा असे वाटत होते

25 अप्रील्ला माझा birthday होता त्याने मला त्याच्याबरोबर मंदिरात चालण्याची विनंती केली मंदिरात जाऊन अभिषेक करून आम्ही service रोडने चालत येत होतो . bike servising ला असल्याने त्याने आणली नव्हती .service रोडला असलेल्या कठड्यावर बरेच couple बसतात तिथे आम्हीही बसलो त्याने pestry आणली होती चमचाने ती कापली आणि छोटासा birthday celebrate केला जो माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंदी bday होता .bajula काही कुप्ले बसले होते त्यांचे अश्लील चाळे बघून दोघानाही awkward fill होत होत.त्याने मला विचारलं तुझ वय काय ?मी काहीच बोलले नाही

 
नाही मग तोच अंदाजाने म्हणाला १८ असेल नक्कीच मी फक्त मान हलवली .मग त्याने एक वेगळीच इच्छा प्रकट केली मला म्हणाला ,मला तुला १८ वेळा kiss करायचं आहे as ur bday gift म्हणून .pahile मी shock झाले पण मग त्याच हसन पाहून वाटल मजाक करत असेल .मी नाही म्हटलं .त्याने माझा हात हातात घेतला एक छानस छोटस बाहूल माझ्या हातात ठेवत म्हणाला हे तुझ gift माझ्या प्रेमाची आठवण ,कधी माझी आठवण आली कि याच्याकडे बघत जा .मला ते gift खूप आवडल नेमक त्याच दिवशी पापना प्रोमोतीओन मिळाली त्यामुळे तेही मंदिरात जाऊन येत होते संध्याकाळची वेळ होती अचानक पपांची bike समोर येऊन थांबली आईशपथ ...!!! एवढेच उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले पपांनी नजरेनेच मला मागे बसण्याची खून keli त्याचा चेहरा तर पान्ध्राफातक पडला होता .मी गुपचूप जाऊन पपांच्या मागे बसली .त्या दिवशी पपांनी एवढ मारलं कि मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही माझ्या बर्थडे च सर्वात मोठ गिफ्ट मला मिळाल होत


रात्री रडत असताना पप्पा बेडरूममध्ये आले सोबत mummy पण होती.डोक्यावरून हात फिरवत म्हणाले सोनू मला माफ कर पण मी जे काही केल तुझ्या भल्यासाठी केल बाळा . आजकाल प्रेम म्हणजे बाजार होऊन बसलाय कोणीही उठल सुटल म्हणत माझ हिच्यावर किंवा याच्यावर प्रेम आहे पण ते प्रेम नसत असत तर फक्त आकर्षण तुम्ही मुल लहान आहात त्यामुळे तुम्हाला ते काळात नाही पण आम्ही यातून गेलो आहोत त्यामुळेच आम्हाला तुमची काळजी वाटते . मी नुसतीच हुंदके देत उशीत तोंड खुपसून ऐकत होते अचानक पप्पा रडायला लागले म्हणाले सोनू आमच दोघांचही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि म्हणून आम्हाला वाटत कि तू काही वेड वाकड पाउल टाकू नये आजपर्यंत आम्ही tujhi प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती तुझ्यावरच्या प्रेमाखातरच पप्पांना पहिल्यन्दा रडताना बघून मी उठले आणि सरळ पपांच्या कुशीत गेले आम्ही तिघेही खूप रडलो .पप्पानी डोक्यावर ओठ ठेवले आणि म्हणाले चल फ्रेश हो cake कापायचा ना ..? त्या दिवशी कळल आईवडिलांच्या रागातही प्रेमच असत .पप्पानी dress piece आणल होत मग रात्री cake कापला आणि झोपायला गेले . बाहेर गार वर सुटला होता चंद्राचा प्रकाश खोलीभर विखुरला होता . एका बाजूला तो होता आणि एका बाजूला आईवडील काही सुचत नव्हत काय कराव ते.मग ठरवलं त्याला भेटायचं नाही ते पण २ दिवसातच त्याची खूप आठवण यायला लागली इतकी कि.. मी वेडी होऊन जाईल अस वाटायचं .घरात कोणी नसताना त्याला call केला .त्याला त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हटलं कि मला विसरून जा मी माझ्या बंधनातून तुला मुक्त करते.आणि त्याच काहीही ऐकून न घेता मी phone ठेवला .त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणी कडून माझ्याशी contact करण्याचा खूप प्रयत्न केला एकदा लिफ्ट मध्ये letter देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं.एक दिवस अचानक कळलं कि to कोलकाताला गेला मला खूप वाईट वाटल आपल माणूस खूप दूर गेल्यासारखं वाटू लागल.मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते तितकाच तो माझ्या जवळ येत होता.एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बहुल्याकडे बघून काढलं .


नुकतीच बारावीची exam झाली होती मी telemarketing मध्ये जोब धरला काही दिवसांनी त्याला call केला तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते खूप वेळ बोलले त्याच्याशी त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये. त्याला sorry वगेरे म्हणाले खूप रडले त्याच्यासाठी कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते .तो कुठल्यातरी course साठी गेला होता course संपताच परत आला .अचानक येऊन त्याने मला surprise दिल.त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता .काही माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच काळात नाही पण दूर गेल्यानंतर कळत कि ते आपल्यासाठी काय आहेत ते. किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते tevhach कळत .त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले .रड रड रडले त्याची माफी मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले .त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी शांत झाले .माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली नाही.वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये. घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल.मला माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती. माझी मूल्य तत्व मीच संपवली होती,

त्यानंतर फोन वर बर्याचदा बोलायचो भेटताना खूप सावधता बल्गायचो .पण आता तो खूप बदलला होता त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती.पण मी काही बोलायचे नाही काय करणार प्र्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या . नेहमी भेटल्यावर हातात हात घेण, चालताना बोटांची गुंफण करण , ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघन हे चालू असायचं .या गोष्टीना मी कांतले होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला स्पष्ट बोलले ; किस करणे , स्पर्श करणे हेच प्रेम असत का तस असेल तर मला नाही जमणार. त्यालाही राग आला तोही निघून गेला


त्याच्या बर्थडे ला मी त्याला call लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने receive नाही केला सहा तास सतत मी call करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केल आणि म्हटलं 'twins' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला ,मी खूप विनवण्या केल्या आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वात बघते जरूर ये .मी त्याची तब्बल दीड तास वात बघितली पण तो नाही आला .तो विसरला होता मला....कायमचा .त्यानानात्र त्याला एक दोनदा call केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती हे ऐकून तर मी अवाकच झाले .त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात ढासळली .तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच call केला नाही.socity त दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली .


तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती तिला याच्याकडून गर्भधारणा झाली होती.प्रकरण घर्त्ल्याना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यंचे चांगले संबंध होते आणि समोरची मानस चांगली होती.याच्या वडिलांचा विचार करून त्यांनी ते प्रकरण संपवलं .याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती.एकदम सज्जन गृहस्थ होते . म्हणून प्रकरण निपटल .त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट झाले होते .म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोत होत.गरब्याच्या खेळाप्रमाणे माझ्या मनाशीही खेळला होता . बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा तू...खरच...... खूप छान खेळतोस .त्या दिवशी अजिबात रडले नाही करण खूप मोठ्या संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या " क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती . आता मी गरबा खेळण बंद केल आहे पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही... तर त्या मुलीची .


मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविल्च निदान झाल .खूप काही करून बघितलं पण फरक पडत नव्हता औषध ,गोळ्या, मांत्रिक, तांत्री काही फायदा नाही झाला . करण मी आतून पोखरले होते औषधांना माझ शरीरच response देत नव्हत .कावीळ पोटात झाली होती .दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती mummy -papa खूप काळजी घ्यायचे .पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.का अस केलस रे तू? का अस फास्वलास किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......एकाच इच्छा आहे शेवटची कि परत अस कुणाला फसू नकोस ..बस !!!! खूप प्रेम केल रे तुझ्यावर आणि करत राहीन मरेपर्यंत .

प्रणय तिच्या शेजारी उभा होता .त्याला वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत ती गेली .तिची आई गप्प झाली होती पप्पांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते .प्रणयच्या वडिलांनी aambulance मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..! तिच्या आईसाठी करण सोनू गेली होती खूप दूर गेली होती कायमची जिथून ती कधीच परत येणार नव्हती .आणि त्याच shock ने तिची आई गप्प झाली होती.तिच्या डाव्या हात प्रणयने दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही त्याला पाहताच तो ढासळला.

वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते
एक नाजुकशी कळ मनात उमटते
प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी
हात सोडून निसटते

__._,_.___AUTHOR UNKNOWN

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: वेदना
« Reply #1 on: June 22, 2010, 12:47:25 PM »
chhan ahe lekh .......... avdala ......... kharach prem andhale, bahire, ani muke asate  :'(

Offline Rahul Kumbhar

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
 • Gender: Male
Re: वेदना
« Reply #2 on: June 22, 2010, 04:49:36 PM »
khup chann lekh aahe... aajkal hich paristhiti diste sarvi kade .. .

Offline rakhi

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: वेदना
« Reply #3 on: June 25, 2010, 02:43:06 PM »
kupach chan ahe!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Offline विनोद

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Male
 • मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.....!
Re: वेदना
« Reply #4 on: August 13, 2010, 12:12:37 PM »
khare prem milane mushkil aahe ya jagat

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 851
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: वेदना
« Reply #5 on: August 13, 2010, 03:30:16 PM »
its a very thikful an artical 4m u saru. i read each n evry lines properly den i desided i cant do beheve ever in my life wd de girls like dat guy,also here i have got an experiance.tanx 4 dat saru.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास वजा दहा किती ? (answer in English number):