Author Topic: ०१-फेब्रुवारी-दिनविशेष  (Read 36 times)

Online Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 8,900
०१-फेब्रुवारी-दिनविशेष
« on: February 01, 2023, 09:14:56 PM »
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०२.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०१-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                  -----------------------

-: दिनविशेष :-
०१ फेब्रुवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००४
मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
२००३
चॅलेंजर हे अंतराळयान आपल्या अंतराळमोहिमेवरुन पृथ्वीवर परतत असताना त्याचा स्फोट होऊन सर्व सात अंतराळवीर मृत्युमुखी पडले. यामध्ये जन्माने भारतीय असलेल्या कल्पना चावला या अमेरिकन अंतराळयात्रीचा समावेश होता.
१९९२
भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.
१९८१
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
१९७९
१५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
१९६६
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
१९६४
प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५६
सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४६
नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
१९४१
डॉ. के. बी. लेले यांनी ‘गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
१८९३
थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१८८४
‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८३५
मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
१६८९
गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७१
अजय जडेजा – क्रिकेटपटू
१९६०
जॅकी श्रॉफ – अभिनेता
१९३१
बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष
(मृत्यू: २३ एप्रिल २००७)
१९२९
जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक
(मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
१९२७
मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(मृत्यू: २६ जानेवारी २०१५ - सांगली)
१९१७
ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक
(मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
१९१२
राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार
(मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
१९०१
क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता
(मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)
१८८४
‘विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार
(मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
१८६४
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ
(मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१२
अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक
(जन्म: ? ? ????)
२००३
कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर
(जन्म: १ जुलै १९६१)
१९९५
मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार
(मृत्यू: १० एप्रिल १९०७)
१९७६
वेर्नर हायसेनबर्ग – ‘क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: ५ डिसेंबर १९०१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार. 
=========================================

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):