1)मुंगी असते मुंगी ....मुंगी केवढीशी ,मुंगीच डोक केवढस,त्याच्यातला तिचा मेंदू केवढासा,तरी पण त्या मुंगीला बरोबर कळत...कुठल्या गावातल्या,कुठल्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर,किती नंबरचा साखरेचा डब्बा आहे.सांगाव लागत नाही तिला ........मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते ...मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोघलांना त्रस्त करून सोडलं ते याच बळावर फक्त " ध्येय ".
2)शिवरायांच्या काळात त्यांचा वचन नामा काय होता

?
भारनियमन बंद करतो .......बेरोजगारी हतवतो....रस्ते नित करतो कि गटारे साफ करतो काय?

स्वराजाचा वचननामा काय

त्यांचा वचननामा एकच
तर सर्वस पोटांस लावणे आहे बस्स!!!!!!!
3)शिवाजी हे नाव कधी उलट वाचा
शि वा जी
याच उलट
जी वा शि
जो माणूस हयात भर जीवाशी खेळ करत आला त्याच नाव शिवाजी
4)आपली सर्व धडपड आपली पोर जगवण्यासाठी
अरे जीथ पोर जगण्यासाठी तयार केली जातात ना तिथे पोर खूप लवकर मरतात
आणि जीथे पोर मरण्यासाठी तयार केली जातात ना तीथ पोर मेली तरी
पुरून उरतात
हा शिव चरित्राचा सर्वात मोठा
सिद्धांत आहे
5)आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीवकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांच शिक्षण जरूर घ्या. पोटपाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यातच थांबू नका. साहित्य ,चित्र,संगीत ,नाट्य,शिल्प,खेळ,ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटपाण्याचा उद्योग तुम्हाला जागविल,पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईन. :- पु ल देशपांडे
6)निष्ठा म्हणजे काय ?
शिवाजिंनी स्वराज्य उभ केल ते ह्याच्याच बळावर ,मानस शिवाजिंकड़े का आली

विश्वास दिला शिवाजिंनी.म्या शिवाजिंना छत्रपति व्हायचे होते म्हणुन ते छत्रपति नाहि झाले ,तमाम मराठ्यंच ,सकल मराठ्यांच राज्य उभ व्हाव हे त्यांच्या काळजात होत.
अरे हीरोजी हिन्दलकर नावाचा आपला बांधकाम प्रमुख होता ,रायगडसारखी जवाबदारी महाराजानी त्याना दिली,अणि शिवाजी स्वारीवर गेले. हीरोजीने किल्ला निम्म्यापर्यंत बांधला आणि पैसा संपला ,या हिरोजिनी अपूर्व काम केल आपला राहता वाडा आपली जमीन विकली ,अणि पैसे जमा केले ,बायकोसह रायगडावर आला झोपडी बांधून रह्यायाला लागला , अणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली .शिवाजिना ही बाब कलाली .
राज्यभिषेखाच्या वेळी शिवाजिंना वाटले ह्या हिरोजिंचा सत्कार करावा ,त्यानी विचारले बोला हीरोजी तुम्हा काय हवे . राजधानिचा गड तुम्ही बांधून काढला .
तेव्हा हा हीरोजी म्हणला .......महाराज उभ स्वराज्य तुम्ही आमच्यासाठी उभारल अजुन आम्हास काय हवे .
तेव्हा हा जाणता राजा कडाडला , नाही हीरोजी तुम्ही काही तरी मगितलेच पाहिजे. तेव्हा हीरोजी नम्र पणे बोलले
महाराज आम्ही इथे एक जग्दिश्वराचे मंदिर उभारले आहे ,त्याच्या एक पायरीवर आमचे नाव कोरयाची अनुमति दया .
महाराजांना काहीच कलेना .......अरे हे कसले मागणे ५ वेतन आयोग नाही मागितला , पगारवाढ़ नाही मागितली,देशमुखी पाटिलकी वतन हे कहिच नाही मगितल ........मागुन मगितल तर काय तर एक पायरीवर नाव कोरयाची अनुमति .महाराजांनी विचारले हीरोजी असे का


?
तेव्हा हा हीरोजी म्हणला .......महाराज ज्या ज्या वेळी रायगडावर असाल त्या त्या वेळी आपण जग्दिश्वराच्या दर्शनाला जाल आणि ज्या ज्या वेळी दर्शनाला जाल तेव्हा तुमची पावल त्या पायरीवर पडतील ..............आणि महाराज अणि त्यातल्याच एक पायरीवर माझ नाव कोरल असेल तर तुमच्या पायाची पायधुल माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेख करत राहतील.महाराज
एवढे भाग्य फक्त पदरात टाका.
अरे तो हीरोजी हिन्दलकर होता म्हणुन स्वराज्य उभ राहिल आज प्रतेक मराठी मानसानी त्याच निष्टेने उभे राहिल पाहिजे तेव्हा पुन्हा आम्ही स्वराज्य उभ करू .
7)गायीच्या हाचडाला चिकटलेला गोचीड हा दुध नाही पीत ...! तर तो रक्तच पितो
कारण ते त्याचे कर्म आहे ना:- पु ल देशपांडे
8)जगाच्या लोक्संखेत मराठी लोक कमी का आहेत ?
उ :- निसर्गाचा नियम आहे कि जर वाघांची संख्या
वाढली तर बाकीचे जीव धोक्यात येतील
9)बुद्धिबळातील प्यादी कॅरम बोर्ड वरच्या सोंगत्यांशी युद्ध खेळण्यासाठी बनलेली नसतात
त्यांना बुद्धीनेच खेळावं लागत
10)लोकांनी तुमचा आदर्श घेऊन स्वताला त्याप्रमाणे घडवला तर तुम्ही जिंकलात नाहीतर मग नुसतेच पुतळे उन्हात उभे कबुतरांच्या शी साठी