Author Topic: मला आवडलेला निबंध-मला आवडलेला निबंध-जर पाऊस पडला नाही तर  (Read 37 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 9,440

                                 "मला आवडलेला निबंध"
                                  मला आवडलेला निबंध
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "जर पाऊस पडला नाही तर"

     पावसाळा ऋतु आणि पावसात खेळायला सर्वानाच आवडते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर पाऊसच पडला नाही तर... जर पाऊस आला नाही तर अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होतील. म्हणून आजच्या या लेखात आपण जर पाऊस पडला नाही तर या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत...

     भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील 80% शेती या नैसर्गिक पावसावर अवलंबून आहेत. पावसाळ्यात जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकरी अतिशय आनंदित होतो. लहान मुलांना तर पावसात भिजायला वेगळीच मजा येते. पाऊस आला की उष्णतेपासून सर्वांची सुटका होते व सुखद गारवा निर्माण होतो. पावसाळ्यात काही भागात जोरदार पाऊस येतो तर काही ठिकाणी दुष्काळ पडतो. परंतु बऱ्याचदा माझ्या मनात विचार आला आहे की जर पाऊसच पडला नाही तर....?

     जर पाऊस पडला नाही तर आज आपण पृथ्वीवर जी काही हिरवळ पाहत आहोत ती दिसणार नाही. शेतकऱ्याची पिके उगणार नाहीत सर्वकडे सुखलेले झाडे व जमीन राहील. शेतात पीक येणार नाही तर आपल्याला अन्न देखील मिळणार नाही. पावसामुळे आपण अन्नाची आवश्यकता पूर्ण करतो पण जर पाऊस पडला नाही तर आपल्याला खायला मिळणार नाही. भुकेणे अनेक लोकांचे प्राण जातील.

     जर पाऊस पडला नाही तर झाडे नष्ट होतील व वातावरणात कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढत जाईल, ज्यामुळे ऑक्सिजन मिळणार नाही, लोकांना श्वासाचे विकार जळतील. ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होईल. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून आपल्याला ऑक्सिजन देतात. परंतु जेव्हा पाऊस राहणार नाही तेव्हा झाडे पूर्णपणे  नष्ट होतील परिणामी आपल्याला श्वासो श्वासासाठी ऑक्सिजन मिळणार नाही. मनुष्य हवे शिवाय फक्त काही मिनीटेच जीवंत राहू शकतो. पाऊस नाही तर झाडे नाही आणि झाडे नाही तर हवाही नाही परिणामी मनुष्य जीवनच नष्ट होईल.

     जर पाऊस आला नाही तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला प्यायला पाणी मिळणार नाही. मनुष्यसोबत पृथ्वीवरील इतर जीव जंतू देखील पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडतील. पृथ्वीवर सर्व नद्या नाले सुखून जातील आणि फक्त समुद्रातील पाणी शिल्लक राहील, समुद्रातील हे खारे पाणी आरोग्याला हानिकारक असते हे पानी पिल्याने आपल्याला अनेक रोग होतील.

     आज आपण आपल्या आवश्यकतेसाठी बाजारात फळ आणि फुले खरेदी करण्यासाठी जातो. हे फळे आपण अन्न म्हणून वापरतो. परंतु जर पाऊस आला नाही तर आपल्याला फळे, फुले आणि भाजीपाला मिळणार नाही.  हळू हळू नदी व तलावातील पाणी कमी होत जाईल. आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी पाण्याचा उपयोग मोठया प्रमाणात केला जातो.  घर पक्के असो वा कच्चे प्रत्येक ठिकाणी पानी आवश्यक असते. म्हणून पाण्याची गरज भागावण्या करिता पाऊस पडणे अत्यंत आवश्यक आहे.

     जर पाऊस नसता तर आपले सृष्टी चक्र पूर्णपणे बाधित झाले असते. जिवंत राहण्यासाठी प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या ऋतूची आवश्यकता असते. आजच्या युगात मनुष्य खूप प्रदूषण करीत आहे या प्रदूषणामुळे कमी पाऊस येणे किंवा एसिड रेन अश्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून आपल्याला प्रदूषणाला कमी करीत सृष्टीचे चक्र सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. नेहमी निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवायला हवे. वायु, जल, ध्वनि आणि मृदा तिन्ही तऱ्हेचे प्रदूषण रोखायला हवे. जेणे करून अति पाऊस आणि दुष्काळ च्या समसयेपासून आपली सुटका होईल. 

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.03.2023-मंगळवार.
=========================================


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):