Author Topic: ब्लॉग माझा३ स्पर्धेच्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन  (Read 1583 times)

Offline Vkulkarni

  • Jr. Member
  • **
  • Posts: 188
  • Gender: Male
  • Let's be friends !
    • "ऐसी अक्षरे मेळविन!"  आणि "माझी सखी"
मागच्या वेळी जेव्हा नीरजा, देवकाका,  दिपक तसेच डानरावांचे ब्लॉग ब्लॉग माझ्याच्या लिस्टमध्ये मानाने झळकले तेव्हा खुप आनंद झाला होता. कुठेतरी मनात थोडीशी का होइना पण असुया देखील वाटली होती. वाटलं, आपला पण ब्लॉग या सगळ्या दिग्गजांबरोबर झळकला तर केवढी मज्जा येइल. मग तेव्हापासुन त्यानुसार ब्लॉगचे स्वरुप बदलले. आधी कवितेला वाहीलेला माझा ब्लॉग पुर्णपणे गद्यमय केला, त्यासाठी (कवितांसाठी) खास नवा ब्लॉग चालु केला. महेंद्रदादा, भुंगा, नीरजा, आणि अशा अनेक ब्लॉगर्सचे ब्लॉग वाचत राहीलो आणि त्यावरुन आपला ब्लॉग कसा असावा याची रुपरेखा ठरवली व त्यानुसार बदल घडवून आणत गेलो. आज त्या मेहनतीचं फळ मिळालं.

माझा ब्लॉग या वर्षीच्या ’ब्लॉग माझा -३’ स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवडला गेला. स्टार माझाच्या ’ब्लॉग माझा -३’ मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळणं ही माझ्या मेहनतीला मिळालेली पावती आहे असे समजतो.

माझ्या ब्लॉगचा दुवा : http://magevalunpahtana.wordpress.com/

लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) या दिग्गज परीक्षकांनी निवडलेल्या ब्लॉग्स मधे आपला ब्लॉग येणं ही माझ्यासाठी तरी खुप आनंदाची आणि अभिमानाची बाब असून आपला ब्लॉग त्या ”तोडीचा” झालाय आता, यातुन मिळणारा आनंद काही औरच आहे.

आनंदाची बाब म्हणजे लागलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या निकालात, विजेत्यांत बहुसंख्य मायबोलीकरांचा, मीमराठीकरांचा तसेच आमच्या बझकर सुहदांचा  समावेश आहे. विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

शेवटी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे तसेच विजेत्या मायबोलीकरांचे, मीमकरांचे, बझकरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अर्थातच स्टार माझाचे शतशः आभार  .

माझा ब्लॉग  उल्लेखनीय ठरवला गेला ह्याचा मला आनंदच आहे! इतर सर्व उल्लेखनीय ठरलेल्या ब्लॉगर्सचे-ब्लॉग लेखकांचेही हार्दिक अभिनंदन. सर्व सहभागी ब्लॉग लेखकांचेही सहर्ष कौतुक आणि शुभेच्छा.

स्टार माझा ३ निकालाविषयी मुळ बातमी इथे वाचा… http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

विशाल कुलकर्णी



Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,511
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
gr8 news...sarva kavi mandlina MK var invite kara...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):