Author Topic: चमत्कारी सत्यसाईबाबा.  (Read 1649 times)

Offline tdahale

 • Newbie
 • *
 • Posts: 4
बिनबुडाचे पिचके गाडगे अखेर फुटले!!

बिनबुडाचे पिचके गाडगे अखेर   फुटले!! गेला..मेला ..चमत्कारी  सत्यसाईबाबा...बाबा गेल्यावरहि आपल्या   देशात चमत्कार झाले म्हणे...कुणाच्या घरातील बाबाच्या फोटो फ्रेममधून   विभूती गळाली तर कुणाच्या घरात बाबाच्या फोटो फ्रेममधून चक्क मधाचे थेंब   टपकलेत म्हणे !!! कुणाच्या घरात बाबाच्या फोटो फ्रेममधून बाबाचे कुरळे केस   गळाले असतील तर कुणाच्या घरात  चक्क बाबाची भगवी लुंगीच गळून पडली   असेल....आपला भारत आहेच ग्रेट ...इथे कधी गणपती चक्क दुध पितात तर कधी फक्त   मुलेच जन्माला येतील अशी जडीबुटी रामदेव तयार करतो...अहा इंडिया..वाह   इंडिया....!!!! तर गेला काल साईबाबा....लोक खूप रडले...लोकांना रडताना   पाहून विज्ञान हसले...तर तमाम सत्यशोधकांनी शरमेने माना खाली   घातल्या...बाबा मेला...आयुष्याभर आपल्या  जादूटोण्याच्या प्रयोगांनी   लोकांना मूर्ख बनविणारा बाबा स्वताचा मृत्यू मात्र रोखू शकला नाही...बाबाची   सारी तंत्रविद्या फेल ठरली...पण भयानक चीड या गोष्टीची आली की या बाबाच्या   मृत्यूला  राजमान्यता मिळाली....शासकीय इंतमामात बाबावर अंत्यसंस्कार   करण्याची घोषणा झाली...इतकेच काय कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये सरकारने दोन   दिवसांचा दुखवटा जाहीर केला. बरे झाले राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला   नाही...संसदेवरचा तिरंगा खाली कोणी उतरवला नाही..बाबाच्या मरणाला   राजमान्यता याचाच अर्थ जादूटोण्याला, बुआबाजिला सरकारी मान्यता असे मला   वाटते.
बाबाला तशी सरकारी मान्यता होतीच...५५ हजार कोटीच्या बाबाच्या   ट्रस्टवर अनेक बडी धेंडे आहेत. माजी सरन्यायाधीश पी. एन . भगवती, माजी   केंद्रीय दक्षता आयुक्त एस. व्ही. गिरी,  सीआयआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन   ही सारी  अर्थातच संघवादी मंडळी बाबाच्या ट्रस्टवर आहेत. आता बाबाला   चमत्कार रुपात अजरामर घोषित करून ही मंडळी बाबाने जमविलेल्या मालमत्तेचा   मलिदा पद्धतशिरपणे खातील.. एखाद्या बुळ्याबावळ्याला शेदूर फासून बाबाचा   उत्तराधिकारी जाहीर करतील. ...पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.....भारत लवकरच   महासत्ता बनणार आहे म्हणे!!!

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline futsal25

 • Newbie
 • *
 • Posts: 46
 • Gender: Male
  • माझ्या काही कविता (My few poems)
Re: चमत्कारी सत्यसाईबाबा.
« Reply #1 on: April 27, 2011, 11:15:58 AM »
मुलांवर बलात्कार करणा-या पाखंडी बाबाचा अंत झाला, हा बाबा नरकातल्या आगीत जळत असेल.

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
Re: चमत्कारी सत्यसाईबाबा.
« Reply #2 on: April 29, 2011, 02:58:31 AM »
सत्यसाईबाबा गेला, सरकारी इतमामात त्याचे अंत्यसंस्कार झाले....आपला देश महान आहे..... कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना, २६/११ मधेय शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्यांना  इतका आदर मान सन्मान नाही मिळाला तेवढा ह्या ढोंगी सत्यसाईबाबाला मिळाला.....खरच भारत कोणत्या दिशेला चालला आहे ? एकीकडे आपण महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत आणि एकीकडे हा असला प्रकार........   

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):