१ मे २०११ - सेवा निवृत्ती
खूप वर्ष वाहणाऱ्या धबधब्याचे अचानक पाणी पडणे बंद झाल्यावर कसे एकदम आयुष्य थांबल्यागत वाटते ना. खडकाला त्या प्रहावाची झालेली सवय , आसपासच्या वेलींना, झाडांना आणि धबधब्याच्या डोहात राहणाऱ्या जलचर प्राण्यांवर किती परिणाम होतो हे सांगणे कठीण आहे. हे सगळे सांगण्याचा संदर्भ असा की सेवा निवृत्त झालेल्या व्यक्तीचे आयुष्य काहीसे असेच होते. रोज सकाळी उठून चाललेली धावपळ, ऑफिसला वेळेवर पोचायची पळापळ अचानक मधेच सगळे थांबणार असते.
तुम्हाला वाटत असेल हा लेख लिहिण्यामागचा उद्देश काय तर माझे बाबा येत्या १ मे २०११ ला सेवा निवृत्त होत आहेत, आणि योगायोग पहा १ मे कामगार दिनादिवाशीच सेवा निवृत्ती. हा महिना मी त्यांना थोडे अपसेट पहिले आहे.
अपसेट तर होणारच ना इतकी वर्ष त्यांनी नोकरी केली आणि अचानक एके दिवसी सगळे बंद. खूप वेळ चाललेला गोंगाट एकदम बंद झाल्यावर कान कसे सुन्न होतात ना तसेच काहीतरी आयुष्य होत असेल. त्यांना कदाचित चिंता असेल की पुढे काय करायचे फक्त शांत बसून आयुष्य काढणारे माझे बाबा नाहीत. त्यांना हीपण काळजी असेल की घराचे कसे होणार सगळे नीट सांभाळतील ना आपली मुले. काहीना या गोष्टीचे इतके गांभीर्य वाटत नसेल पण जवळून पाहिल्यावर थोडे जाणवते की निवृत्त होवून घरी असलेल्यांची अवस्ता काय असते ती. मी काही दिवसात बाबांना इतरांशी या बद्दल बोलताना पहिले आहे त्यांना खरच १ मे नंतरचे आयुष्य कसे असेल या बद्दल त्यांना चिंता आहे , या नवीन बदलात आपण कधी आणि कसे ढळू याचे याचा ते विचार करत होते . एक दिवसाची सुट्टी आपल्याला हवी-हवीशी वाटते पण कायमची सुट्टी हे ऐकूनच कसेतरी होते ना. १९७७ पासून माझे बाबा सर्विस करत होते, इतके दिवस मी त्यांना पाहत आहे मला आणि घरातल्यांना त्यांना रोज ऑफिसला जाताना बघायची सवय झाली आहे. त्यामुळे १ मे पासून आम्हाला थोडे गणित चुकल्या सारखे वाटणार आहे. मला अशा आहे माझे बाबा हा नवीन बदल लवकरच स्वीकारतील. त्यांना या सगळ्याची सवय होयला थोडा वेळ जाईल. सध्यातरी इतकेच जमले मला सांगायला, यापेक्षा जास्त बोलायला तेवढी समाज नाही किव्वा कदाचित मी लहान आहे तेव्हडे बोलण्यासाठी.