श्रीन्चं आगमन व्हायला आता काहीच दिवस उरलेत. आठ दिवसात आषाढ़ संपून श्रावण सुरु होइल अन आमच्या दादरची गल्लिनगल्ली फुलांनी, माणसानी भरून जाइल. सगळ्यांचे डोळे बाप्पाच्या आगमनाकडे लागलेत. लहानांपासून थोरान्पर्यंत सगळयानाच बाप्पाने वेड लावलय. त्यातलीच एक आमची टीना, वय वर्षे ५.
लहानपणा पासूनच ती गणपतीची जबरदस्त fan आहे. गणपती या विषयावर ती दिवसभर चित्र काढू शकते. (लहान असताना मी कधीच व्यक्तिचित्रांच्या वाटेला गेले नाही.....कारण नाक तोंड डोळे काढणे ही अपने बस की बात नहीं थी) हल्लीची मुलं उपजतच हुशार आणि चिकित्सक असतात, आपल्याला अजुनही न पडलेले प्रश्न त्यांना लहानपणीच पडतात याचा प्रत्यय मला हल्लीच आला.
टीनाने काढलेल्या असंख्य गणपतीच्या चित्रान्पैकी ते एक चित्र होतं. पण यात गणपती बरोबर एक मुलगीही होती. न राहवून आईने तिला विचारलं आज गणपतीच्या बाजूला तुझही चित्र काढलं का?
त्यावर बाईसाहेब उत्तरल्या "हा गणपती आणि ही गणपतीची मुलगी" ......उत्तर ऐकून आम्ही थक्कच झालो. गणपतीला कधी मुलागिही असू शकते याचा विचार आमच्या गेल्या सात पीढयानमध्ये कोणी केला नसेल

काय भन्नाट डोकी असतात आजकालच्या मुलांची! बहिण तर बहिण भाऊतर त्याहून एक पाऊल पुढे म्हणे शंकर बाप्पाचं सरनेम काय? प्रश्न अगदी साधे पण भल्याभल्याना निरुत्तर करणारे.
आता कालचच उदाहरण घ्या ना आजी आणि नातवाचा संवाद पुढील प्रमाणे:
आजी: अरे तुला फ्रायडेला सुट्टी आहे
अथर्व: कसली?
आजी: रमजान ईद ची
अथर्व: रमजान ईद काय असतं?
आजी: तो मुसलमानांचा सण असतो आपली दिवाळी कशी तशी त्यांची ईद
अथर्व: मग ते फटाके लावतात का तेव्हा? त्यांचे फटाके पण मुसलमान असतात का?
यांची डोकी कुठे चालतील याचा नेम नाही. आईने लहानपणी सांगितलेल्या चिऊकाऊ, देवांच्या गोष्टी कुठलाही अलीकडचा अन पलीकडचा विचार न करता आम्ही ऐकल्या होत्या. याच गोष्टी जेव्हा आजच्या मुलांना सांगायचं झालं तर ती चक्क आपल्यालाच वेड्यात काढतात म्हणे भोपळयात म्हातारी बसेलच कशी? animals ना कधी बोलता येतं का?
असे हे आजचे अभिमन्युचे वंशज गर्भाताच शहाणपण शिकून आलेले.
शीतलhttp://designersheetal.blogspot.com