माई बोलायच्या थांबल्या ,सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला .माईंनी डोक्यावरून पदर घेतला . त्यांनी सभोवार नजर फिरवली . आपल्या भाषणाचा लोकांवर काय परिणाम झालाय ह्याचा त्या अंदाज घेत होत्या .आपल्या नववारी साडीचा पदर समोर पसरत त्या ठाम आणि धीरगंभीर स्वरात म्हणाल्या "हि शेकडो मुलांची आई ,तुमची माई तुमच्या समोर पदर पसरून मागण मागते माझ्या पिल्लांच्या दुधासाठी ,त्यांच्या कापडासाठी ,त्यांच्या पोटासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे .मला ठावूक आहे या माईची ओटी खणा नारळांनी नाही भरलीत तरी माझ्या पिल्लांसाठी नोटांनी भरून जरूर घरी पाठवाल. मी शारदेच्या मंदिरात आली आहे मला तुम्ही निराश नाही करणार खर ना? सभागृहात थोडी चुळबुळ झाली.माईंच्य शेजारी एक पंचविशीचा तरुण उभा होता .त्याला काय बोलावे ते सुचतही नव्हते .माईंनी ज्या प्रकारे त्याची ओळख करून दिली त्यामुळे त्याचा आत्मसन्मानाला ठेच पोचली तर नसेलना ?त्याची ओळख करून देतांना माई म्हणाल्या माझ्याच सारख्या एका भिकारी बाईच्या कुशीत एक मुल मला दिसलं ते रडत होत बहुदा त्याला भूक लागली असावी मी जवळ जाऊन पाहिलं तर आईन अगोदरच प्राण सोडला होता .मी त्याला उचललं कापसाच्य बोळ्यान दुध पाजल,न्हावू माखू घातल शिकवलं तेच हे मुल .ये बाल गणेश ,माझा पोरगा एल एल बी हाय बर .बिचारा गणेश खाली मन घालून उभा होता .खरच तो गणेश उभा होता कि त्याच स्वप्नाच कलेवर. माई त्याची ओळख करून देताना माझी काही मुल एल एल बी शिकल्यात ती तुमच्याच मदतीवरती इतक म्हणाल्या असत्या तर नसत का चालाल ?
थोड्या वेळात सभागृहातील प्रतिष्ठीत व्यक्ती उठल्या त्यांनी आपल्या पाकिटातून पाचशेच्या नोटा काढून माईच्य पदरात टाकल्या ,पाहता पाहता सभागृहातील बरेच जन माईच्य आव्हानाला प्रतिसाद देत पुढे आले माईचा पदर नोटांनी भरून गेला होता .माई कुणाच्य डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद देत होत्या तर कुणी माईचे हात धरून आम्ही आहोत ना अशी ग्वाही देत होते .कोण कुठल्या माई ?वक्त्या म्हणून येतात काय आणि आपल्या विचारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत श्रोत्यांना जखडून ठेवतात काय ?सारच विपरीत अतर्क्य .चार इयत्ता शिकलेल्या माईंनी अनुभवाच भांडवल उलगडतज्ञानोबा तुकोबाच्या ओव्या बहिणाई यांच्या काव्याचा आधार घेत जीवनच सर सांगितल .माई ला समजलेली जगण्याची पंचसुत्रे अलग आहेत .जगवण्यासाठी जगण्याचा ; जगण्यासाठी झुंजण्याच आणि झुजांयासाठी ताकत हवी रे बाबा अस माई म्हणते .माईची हकालपट्टी झाली तेव्हा माई गरोदर होती .नवऱ्याने लात मारली तेव्हा आपल्या न जन्मलेल्या बलाच काय होईल हा विचार त्याच्या मनाला शिवला नाहीं. नवऱ्याला का शिवला नाही? याचे तिला आश्चर्य वाटते .तीन दिवस ती गोठ्य बसून होती ,तेथेच तिला बाळझाले तरीही नवऱ्याला दया नाही आली. आज मात्र तिने नावलौकिक मिळवल्यावर तिच्या सासरची माणस तिला गावी नेवून सत्कार करतात .ती सत्कार स्वीकारते मात्र तिला ठावूक आहे हा सत्कार तिच्यासाठी नसून तिच्याकडे असण्याऱ्या नावलौकिक व धनासाठी आहे .आज तिचा नवरा ऐशी वर्षाचा आहे .माईनी त्यांना स्वीकारलं पण बाळ म्हणून .आज माईच्या आश्रमात माईची मुल त्यांची काळजी घेतात .परिस्थिती किती बदलली एक वेळ तिला स्वतःच्या अन्नासाठी भटकाव लागत होत आज ती तिच्या असंख्य बाळांच्या अन्नासाठी भासान देत फिरते .तिला मुलांना जगवण्याच सूत्र कळल,सुरवातीस तिने भिक मागून मुल वाढवली .आजही ती मागतेच आहे,फरक हाच कि आता लोकच तिला भाषण साठी बोलवून न्हेतात .भाषण करो तो दम मिलेगा रे बाबा अस म्हणायला ती लाजत नाही .
चवथी शिकलेल्या माईनी बहिणाई ,तुकडोजी ,तुकाराम ह्यांच्या काव्यांचा उपयोग शिदोरी सारखा करतात . त्या स्वतःच्या ढंगात साज चढवत बहिणाई पेश करतांना म्हणतात माजी बहीण तर अडाणीच होती मी तर चौथी पास जम भारी काम है रे बाबा ,समाज मला काय देईल विचर करत त्या बसत नाहीत .देगा उसका भला नी देगा उसका भला .मागणे पार साब्कुच मिले रोनेपर मिले लात.अस म्हणताना माई तत्वचिंतक वाट्याला लागतात .जीवन जगण किती कठीण आहे ? पण मैला मारायला फुरात नाही तिच्या आश्रमातली मुल ती घराबाहेर निघतांना दिवा लावतात .माई त्यांना विचारते उज्जेडी दिवा कशला रे पोरानो मुल म्हतात तू परत यावी म्हणून तूच मेलीस तर आम्हाला कोण बघेल ? तो मंदपणे जळणारा दिवा दिवा नसतोच मुली ती असते माईच्या आत्म्यची ज्योत ,त्या ज्योतीच्या प्रकाशात माईचा चिमण्यांना सुरक्षित वाटत .
माईच्या कार्यासाठी तिला समाजाने आर्थिक पाठबळ दिल ,दोनशे बहात्तर सन्मान समाजाने दिले पण शहाण्या शाशनाला जाग काही आली नाही . म .रा. म्हणजे मेलेलं राज्य ,ज्याला कश्ची जाण न्हाई अस राज्य . माई म्हणते मी पेशान भिकारीण पण भिकच मागायची असल तर जनता जनार्दनाकड मागन.ज्या मेहनतीने आणि आंतरिक तळमळीने तिने अनाथांना शिक्षण देवून त्यांच्या आयुष्यात सुगंध निर्माण केला .त्यांच्या वाटचालीसाठी दिवा उजळ्वला त्यास तोड नाही .खंत एकाच वाटते समजा जवळून मादीचे आवाहन करताना मैने मुलासारख वाढवलेल्या मुलांना समोर पेश करू नये .कोठे तरी उघड्यावर जल्म मिळ्ण्याच नशीब त्यांची वाट्याला आल मात्र ह्या मुलांना एल .एल .बी .किव्वा डॉक्टर केल्यावर त्याची गुरुदक्षिणा म्हणून माईनी त्याचा तेजोभंग करू नये .हाच तो मुलगा जो मला भिकारी बाईच्या कुशीत निपचित पडलेला मिळालास म्हणून माईंनी त्याला त्याच्या मागील इतिहासाची आठवण करून देवून त्याच माणूसपण हिरावून घेवू नये .प्रारब्ध म्हणून त्याने भिकारी म्हणून जन्म घेतलाही असेल पण तुमचा परीस स्पर्श लाभल्यावर सोनसळा लाभलेल्या मुलाला हा कधी काळी लोखंडाचा तुकडाच होता हे सांगायची खरच गरज आहे का ?
तुमच्या प्रत्येक भाषणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत तुमच्या भाषण बाबत सभागृहात उमटणा-या प्रतिक्रियेने मोहरून उठणारा तो तरुण देवाला नेहमी एकच प्रार्थना करीत असेल देवा माईच भाषण संपूच देऊ नको .जन्मदेत्या आईन एकट मागे सोडून इहलोक गाठल्यावर ज्या ममतेन माईन वाढवल तिने मी कोटे जल्मलो हि ओळख करून देणे खरच गरजेच आहे का ? हा माझा मुलगा एल.एल.बी .आहे एवढी ओळख पुरेशी नाही का ?माईच त्याग ,तीच कर्तृत्व,तीच वक्तृत्व तिच्या पिल्लासाठी मदत मिळवायला पुरेसी नाही का ?म्हणूनच माईच्या भाषणच शेवटचा टप्पा येतो तेव्हा तो तरुण जाग्यावरच थरारात असेल .मैने एल .एल.बी.चे शिक्षण त्याला देण्यासाठी परिश्रम केलेच असतील पण आजही तो सनद मिळवून स्वाभिमानाने जगण्यास स्वतंत्र नाहीच का ?माई त्याला वाढवलं त्याचा वापर करून किती वर्ष व्याज गोळा करणार ?माई मला माफ कर पण तुझ्या पिल्लाच्या चेहऱ्यावरील भावना मी वाचल्या .वाटल शेकडोंच्या आईला मुलांची वेदना कळलीच पाहिजे .त्यांना अनाथ म्हणून जल्म मिळाला पण तू जर आई होवून त्याचं संगोपन करतेस तर त्यांची भावना जाणून घे चार चौघात हा मुलगा इथ इथ मिळाला असा उल्लेख करू नको.तुला जगतांना चटके बसलेच आहेत पण तू तुझ्या मायेची उब त्यांना दे.हे तू करशील तर मुल नक्कीच म्हणतील आई थोर तुझे उपकार ..............
- मंगेश कोचरेकर