Author Topic: प्रश्न - भाग - १  (Read 2007 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
प्रश्न - भाग - १
« on: September 13, 2011, 03:03:45 PM »
मला पडणारे काही प्रश्न लिहिले आहेत. कोणालाही दुखावण्याचा उद्देश नसून निव्वळ करमणूक हा उद्देश आहे. गमतीदार उत्तर असले तरच उत्तराची अपेक्षा आहे.

1.   रसाच्या गुर्हाळाला घुंगरू का बसवलेले असतात? घुंगरू लावल नाही तर रस निघत नाही का?
2.   बसच्या कंडक्टरला आणि पोस्टमनला मास्तर का म्हणतात?
3.   गिरणीत भैय्याच काम शिकवणारी अख्ख्या महाराष्ट्रात एकच शाळा आहे का? कारण सगळ्या  गिर्ण्यान  मधले भैय्या एकाच तालात चक्कीवर  खिळा आपटतात.
4.   हल्ली पोळी भाजी मागणारे भिकारी  कुठे गेलेयत? आपल्या लहानपणी रात्री भिक मागणारे भिकारी दिवसा काय करायचे?
5.   रोज एवढे जण सगळ्या रस्त्यांवरून गाड्या घेऊन कुठे जात असतात?
6.   मॉर्निंग वॉकला जाणारे व्यायाम का करतात? मोकळ्या हवेतच व्यायाम करायचा तर टेरेसवर जायचं सोडून एवढ्या लांब का चालत जातात?
7.   कामगार लोक, इस्त्री वाले सकाळी उठल्या पासून मोठ्या आवाजात रेडीओ का लावून ठेवतात? अंघोळ करताना तांब्यांनी अंगावर पाणी घ्यायचं सोडून अंगावर बादल्या ओतून पाणी वाया का घालवतात?
8.   लोकलचा गार्ड नेहमी पाठीच्या बाजूनीच मागे जात असतो. त्याला सरळ चालता येत असेल का? तो कधी बस किंवा ट्रेन   मध्ये बसल्यावर तोंडाच्या बाजूनी पुढे जायला लागल्यावर घाबरत असेल का?केदार....  :D

http://marathikavita.co.in/index.php/topic,6127.0.html    प्रश्न भाग - 2
http://marathikavita.co.in/index.php/topic,6133.0.html  प्रप्रश्न भाग - ३ 


« Last Edit: September 29, 2011, 01:36:33 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रश्न - भाग - १
« Reply #1 on: September 29, 2011, 01:40:33 PM »
Hi,

Links update kelya ahet