Author Topic: प्रश्न - भाग - २  (Read 1378 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
प्रश्न - भाग - २
« on: September 14, 2011, 12:12:49 PM »
http://marathikavita.co.in/index.php/topic,6117.0.html   प्रश्न भाग - 1


9.   काही जण रात्री बाईकचा हेडलाईट बंद का ठेवतात? विशेषता बुलेट चालवणारे कधीच हेड लाईट का लावत नाहीत? बुलेटच्या आवाजानी रस्त्यातले खड्डे आपोआप बाजूला होतील अस त्यांना वाटत का? का हेडलाईट बंद ठेवल्यानी पेट्रोल वाचेल अस त्यांना वाटत?

10.   गुन्हेगाराला पकडल्यावर त्यांचे चेहरे झाकण्याची फ्याशन कधी पासून सुरु झाली?  तोंड झाकलेले गुन्हेगार नक्की तेच आहेत हे जेलरला कस कळत?


11.   सिरियल्स बनवणार्यांनी पोलिसात एसीपी हे खोट खोट पद निर्माण केल आहे का खरच  एसीपी असतात? त्यांना युनिफोर्म नसतो का?

12.   नावातच अधुरी एक कहाणी, असंभव असलेल्या सिरिअल्स आपण का बघतो?
13.   मद्रासी लोकांना फक्त भातच खायचा असतो तरी पैसा कमवावासा   का वटतो?
14.   बंगाली लोकांनी सगळ्या मिठाया दुध फाडूनच  का बनवल्या? त्यांना दुध बघितल्यावर ते प्यायच्या ऐवजी  फाडावस  का वाटत?
15.   इतर राज्यातली  अतिरिक्त वीज सरकार घेते ती कशी? ट्रक मधून आणतात का पाईप लाईन मधून? विजेचा साठा कसा करतात? ती लाडू ठेवल्या सारखी डब्यात ठेवतात का? त्या डब्याला शॉक लागत नाही का? का ते डबे लाकडाचे असतात?शेवटचा भाग -३ उद्या पोस्ट  करीन. 
 केदार
.... :D

http://marathikavita.co.in/index.php/topic,6133.0.html  प्रप्रश्न भाग 3

« Last Edit: September 29, 2011, 01:38:06 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता