मला पडणारे काही प्रश्न लिहिले आहेत. कोणालाही दुखावण्याचा उद्देश नसून निव्वळ करमणूक हा उद्देश आहे. गमतीदार उत्तर असले तरच उत्तराची अपेक्षा आहे.
http://marathikavita.co.in/index.php/topic,6117.0.html प्रश्न भाग - 1
http://marathikavita.co.in/index.php/topic,6127.0.html प्रश्न भाग - 2
आणि आज शेवटचा अन तिसरा भाग
16. कडक लक्ष्मी स्वतःला मारून का घेते? ती बाई असून पुर्षांच्याच अंगात का येते? का पुर्शांना मुद्दाम अद्दल घडवण्या साठी कडक लक्ष्मी त्यांच्या अंगात शिरून त्याला मारवून घेते? हे मारून घेताना त्याना ढोलकीवर बुगुबुगु वाजवायला का लागत? त्यांच्या बायकोच्या कडेवर एक अन पोटात एक असावच लागत का? का ह्या वाजवणार्यांची पोर कधीच मोठी होत नाहीत आणि पोटातून बाहेरच येत नाहीत?
17. बायका टूव्हीलर चालवताना दोन्ही पाय खाली का सोडतात?
18. रस्त्यातून चालताना आया मुलांना रस्त्याच्या बाजूला धरूनच का चालवतात?
19. लेडीज टेलर कपडे का भिगड्वतात? सगळ्याच बायका टेलर कपडे वेळेवर देत नाही, भिगड्वतो म्हणून कम्प्लेंट करतात, तरी सगळ्यांच्या अंगावर शिवलेले कपडे कसे असतात? आणि टेलरची दुकानही भरलेली कशी असतात?
20. पोस्टाच्या एजंट बायकाच का असतात? त्या क्लाय्नटच रिकरिंगच पुस्तक स्वतः कडेच का ठेवतात? आणि आपण हि त्यांच्यावर विश्वास कसा ठेवतो?
21. सलून मध्ये मुलांचे केस कापायला आईच का घेऊन जाते? लहान मुलींचे केस पण पुर्षांच्या न्हाव्या कडून का कापून घेतात? बायकांचे केस कापणारीला न्हावीण का म्हणत नाहीत? त्या न्हाव्यांच्या युनिंच्या सभासद का नसतात? त्यांचे रेट एवढे जास्त का असतात? एक रुपया वाचवण्या करता भाजी घेताना कटकट करणारया बायका पार्लर वालीला मात्र चेहरा भीगडवण्या करता इतके पैसे का देतात? होजिअरी पुरुष विक्रेत्या कडून घेतात मग केस कापायला पुरुष न्हावी का चालत नाही? ते स्वस्त पडणार नाही का?केदार....
