नेता झाल कि इथे देवाच रूप प्राप्त होत... भारत या देशाच नाव, पण सत्य पाहता भारतात कोणाचाच आणि काहीच भरत नाही. प्रत्येकाच्या पोटाचा आकार हा दुसर्याहून मोठा. खरच एकदा का निवडणूक जिंकली मग ती कोणती का असेना तो जिंकणारा उमेदवार देव बनतो देव... त्याला कोणतीच बंधन नाहीत, तो काही करू शकतो त्याला सर्वच अधिकार आहेत. त्याने काय... काय... खून केला...? अहो मग काय झाल? त्याला अधिकार आहे, त्याने काय भ्रष्टाचार केला? अहो तो तर त्याचा जन्मसिद्ध अधिकार किबहुना याच गोष्टीसाठी तर निवडणूक जिंकायची होती ना. माझ चढतो सर्वांना.
लहानपणी वाचलेलं गर्वाच घर खाली, अति तेथे माती, उथळ पाण्याला खळखळाट फार... कुठे गेले ह्या अंदाज बांधणाऱ्या म्हणी? मंत्र्यांना गर्व नाही त्यांच्या मंत्रीपदाचा? त्यांच्या खुर्चीचा? तरी त्याचं घर भरलेलं, खाली फक्त तुम्हच आणि आम्हाच... प्रत्येकाने अति केल, प्रत्येक गोष्टीमध्ये अति केल.. पण गेल कोण त्यांच्यातल मातीत? आणि जाईल तरी का कोणी मातीत? खळखळाट तर यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा.... पैसा, वचन, भाषण सर्वांचाच फक्त खळखळाट, मात्र पाणी याचं उथळ कुठे? सहार वाळवंटात देखील राणीची बाग फुलवतील इतक गहिर पाणी यांच्याकडे...!
लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार म्हणजे लोकशाही, अशी मी तरी शाळेत असताना व्याख्या वाचलेली. पण खरच अस आहे का? लोक उमेदवार निवडून देतात पण त्याच्यापुडे काय? सगळे उमेदवार एकाच माळेतले मनी आज एकाची बाजू पडते म्हणून दुसरा बोट दाखवणार परवा बोट दाखवणारा निवडून आला कि तेच बोट तोंडात घेऊन आम्हाला काही काळात नाही, काहीच दिसत नाही आणि ऐकूही येत नाही अशी कुकुल्या बाळाची सोंग घेणार.
सगळेच उमेदवार काय लायकीचे आहेत हे सर्वांनाच माहित आहे, प्रत्येकाला नोट छापणाऱ्या मशीन चा भाग बनायचा आहे, मग त्याच्यासाठी थोडे invetsment आधी केलेलं बर, मग काय निवडणुकीच्या आदल्या रात्री वाटा पैसे... सामान्य माणूस मात्र खाल्लेल्या मिठाला जगणारा, पैसे दिलेत बाबा त्याने त्यालाच मत देऊ. अरे पण पुढच्या पाच वर्षात त्याने दिलेल्या रकमेच्या हजारपट पैसे तोच तुमच्याच खिशात हाथ घालून काढतो आणि तुम्ही फक्त बघता नामर्दासारखे. माझ्यामते जे लोक मतदानाच्या दिवशी सुट्टीचा आनद लुटतात ते खरच हुशार, असं ना तस जो पण निवडून येणार तो तर लुबाड्खोरी करणारच मग कशाला उगाच एक सुट्टी वाया घालवा. काहीही झाल तरी मेहनत करतो आम्ही आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे सरकारचा GOVERNMENT SCAM FUND साठी ३०% tax आम्हीच भरतो नाही का? अश्या परस्थितीत मतदानाच्या मशीनमध्ये एक बटन असं हि असाव, ज्यातून निवडणूक लडवणार्या एकही उमेदवाराला मत न देता. पोलीस किंवा अन्य कोणत्या तरी खात्याने त्या विभागाची जबाबदारी घ्यावी. माझा विश्वास आहे ५०% अधिक मत याच बटनाखाली येतील.
बर राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा नाहीच आहेत आपल्या राष्ट्रपती. पुतळा असतो राष्ट्रपती आपला फक्त स्वाक्षरी करण्यासाठी आणि विशिष्ट पुरस्कार करण्यासाठी नेमलेला आणि पंतप्रधान हा मोहरा ज्याचा फक्त खांदाच उपयोगाचा आहे बाकी गोळी चालवण्याच काम तर फिरंगी स्त्री अविरतपणे करतेच आहे.
काय होणार, कस होणार, केव्हा कोणार काहीच माहित नाही. पण जो गरीबाच्या घरी जन्म घेतो त्याने जरूर गेल्या जन्मी कोणते तरी मोठे पाप केल असणार. पूर्वी एखाद्याला कोणता भयंकर रोग झाला, अकाली निधन झाल अशा वेळी त्याच्यावर गेल्या जन्माच्या पापांचा मोबदला हाच निष्कर्ष निघे, पण आता ती स्थिती बदलू लागली आहे. लोक इथे बरा न होणारा रोग झाल्यावरही तोंड वाकड करून का होईना जिवंत राहतात. मग ते बोललेलं कोणाला कळू अथवा नाही कळू.
दुसर्याच वाईट मी कधीच चिंतल नाही, चिंतणार पण नाही. पण सर्वांना विवेक बुद्धी, हृदयात दया आणि सुख दान कराव हि त्या ईश्वरा जवळ प्रार्थना जो हा अत्यंत निर्घुण काळ आपल्यावर लादून आपली कठोर परीक्षा घेत आहे. पण सर्वच क्षणिक आहे... सर्वच नश्वर आहे... त्यामुळे हा काळ पण जाईल... हि वेळ पण टळेल... या गोष्टीवर माझा विश्वास आहे...
...संकेत शिंदे...