दुपारची वेळ होती, मी नेहमीप्रमाणे डोंबिवली स्टेशन च्या जवळील रस्त्यावरून चाललो होतो तितक्यात माझ्या कानावर ढोलकिचे बेताल नाद ऐकू आले. मी तिकडे नजर फिरवली आणि ते दृश्य बघून दंग राहिलो. किलस आली त्याच्यावर ज्याला आपण ईश्वर म्हणतो. आठ ते दहा वर्षाची चिमुकली होती ती एकटीच होती ती, तिचे ते चिमुकले हात ती ढोलकी वाजवण्यास असमर्थ होते तरी देखील ती वाजवत होती. फक्त पोटाच्या भुकेसाठी ती धडपडत होती मध्येच तिचे हात थांबायचे आणि मग ती एका छोट्याशा रिंग मधून संपूर्ण शरीर काढून दाखवायची. कोणता खेळ होता तो? नशीबचा की डोंबार्याचा? कळलेच नाही. माझ्या सारखे कित्येक जन येत आणि जात होते पा कोणालाच तिच्या नशिबवर दया येत नव्हती. एकही हात मदती साठी खिशात सरसावत नव्हता. एकटीच संघर्ष करीत होती फाटक्या नशिबाशी.
अन्न दाता म्हणवणार्या "त्याला" अक्षरशः लाजवत होती, एकलीच होती ती!
संतोष भोसले.