मी काही तुझा कट्टर भक्त नाही..........
वेळ मिळेल तेव्हा , असेन तिथून नमस्कार करतो...
तुझ्या अस्तित्वाला मी मानतो...पण तुझ्या आहारी जाणं मला अजिबात मान्य नाही,
... कदाचित तुला सुधा मान्य नसेल.
सर्वात महत्वाचं म्हणजे मला तुझ्या कडून काहीतरी हवय म्हणून मी तुला नमस्कार करतोय अश्यातला भाग नाही.
एवढच की जेवढं मिळवलय आतापर्यंत ते तुझ्या आशीर्वादनेच आहे म्हणून तुझ्या चरणी लीन होण्यासाठी ............तुझी बाह्यरूपे अनेक आहेत पण अन्तरात्मा मात्र एकच....गूढ तरी पण सदैव अवती भवती असल्याची जाणीव करून देणारा......