Author Topic: नमस्कार  (Read 2092 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 270
  • Gender: Female
  • I am Simple
नमस्कार
« on: October 01, 2011, 10:09:37 PM »
मित्रांनो आज नमस्कार करणे या विषयावर बोलावेसे वाटते.....नमस्कार म्हणजे नमन करण्याची पद्धत, त्याचा आकार, विधी होय. हिंदू धर्मामध्ये वाकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्याने आपली मोठ्या व्यक्ती, परमेश्वर यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. पण केवळ एकाच गोष्टीवर समाधान मानेल तो हिंदू धर्म कसला....वाकून नमस्कार केल्याने [ पूर्वी तो नित्य नियमाने केला जात असे, हल्ली प्रमाणे Indian Values दाखवण्...यासाठी एका हाताने केवळ सर्वान समोर केला जात नसे] डोक्यात पुरेशा प्रमाणात रक्त येते. माणूस एरवी बसून, उभा राहून अथवा झोपून त्याचे क्रियाकलाप करत असल्याने मेंदूला रक्त पुरवठा पुरेसा होत नाही अथवा सिस्टीमवर ताण येतो...नमस्कार केल्याने मेंदू विकार होण्याची शक्यता कमी होते. मेंदू विकार म्हणजे अगदी वेड लागणे असे म्हणायचे नसून मेंदूच्या त्रासाचे अनेकविध प्रकार आहेत अगदी साध्या डोकेदुखी सहित. त्यावर उपयोग होतो. कृतज्ञतेच्या भावनेचा केवळ सामाजिक स्तरावर फायदा होत नसून शरीरांतर्गत हार्मोन्स मधेही अनेक सकारात्मक बदल होतात. तसेच मेंदूतील अल्फा वेव्हजचे प्रमाणही वाढते. तसेच ज्याला नमस्कार केला जातो ती व्यक्ती आणि नमस्कार करणारी व्यक्ती यामध्ये उत्तम प्रकारचे भावबंध बांधले जातात. नमस्कार करणार्या व्यक्तीचा अहंकार हळू हळू कमी होतो. जिला नमस्कार केला जातो त्या व्यक्तीचे उत्तरदायित्व अर्थातच वाढून ती अधिक योग्य प्रकारे वागण्याचा प्रयत्न करते. आणि मन:शक्ती केंद्र, लोणावळे यांनी केलेल्या संशोधना नुसार वाकून नमस्कार करणारी व्यक्ती, आणि तो घेणारी व्यक्ती यामध्ये होणारा काटकोन त्रिकोण हाही काही बदल घडवून आणत असतो. मेंदूवर हात ठेवल्याने अधिकारी व्यक्तीच्या शक्तिमान लहरी नमस्कार करणार्याच्या मेंदूद्वारे शरीरात पोहोचून त्याचा स्वभाव, भाग्य, भोवतालचे वातावरण यात निश्चित बदल घडवून आणतात.

]हिंदू धर्मात हस्तांदोलन करत नसून हृदयाशी हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत आहे. ऋषीन्ना हे नक्की माहित होते की अनोळखी व्यक्तीनपासून तिची पूर्ण आणि खरी ओळख पटेपर्यंत लांब रहाणेच चांगले असते. त्यात स्वच्छता, सामाजिक सभ्यता आणि योग्य अंतर राखणे हे आणि असे अनेक हेतू होते. दोन्ही हात जोडून नमस्कार करण्यात मी दोन्ही हातांनी अर्थात दोन्ही मेंदूंनी म्हणजे मेदुन्च्या दोन्ही अर्धगोलांनी [उजव्या मेंदूचा शरीराच्या डाव्या भागावर आणि डाव्या भागाचा शरीराच्या उजव्या भागावर कंट्रोल अर्थात नियंत्रण असते.] आणि आपला "हृदयापासून" धाकाने नव्हे तर प्रेमाने आदर करतो असा छान आणि परिपूर्ण अर्थ त्यात अभिप्रेत असे. म्हणजेच मनाने आणि बुद्धीने मी तुमचा खरा मित्र, हितचिंतक आणि विश्वास पात्र आहे असे त्यांना म्हणायचे असे. [हल्ली हिंदू धर्मावर टीका करणार्यांना कोपरा पासून हात जोडायची वेळ आली आहे तो भाग निराळा.


अत्यंत जवळच्या, जिव्हाळ्याच्या आणि खरया अर्थाने आपल्या वाटणार्या व्यक्तींना आलिंगन [मिठी मारणे] दिले जात असे. नवीन ओळख असलेल्या व्यक्तींना आलिंगन दिले तर त्या मध्ये त्या व्यक्ती वरचे प्रेम आणि विश्वास व्यक्त करण्याची ती परमावधी मानली जात असे. अर्थातच त्याही व्यक्ती कडून तशाच वर्तनाची अपेक्षा असे. दसर्याला सिमोल्लान्घानानंतर, होळीत, दिवाळीत हिंदूंमध्ये वा खूप मोठ्या कालावधी नन्तर भेट झाल्यावर हिंदूच काय सार्या जगातच प्रेमभराने आलिंगन दिले जाते. इतिहासातील एका अशा आलिन्गनाचा उल्लेख करायचा झाल्यास शिवराय अफझल खान भेट हे ते आलिंगन होय. पण अफझलने विश्वास तोडला. असो
« Last Edit: October 01, 2011, 10:13:32 PM by madhura »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 270
  • Gender: Female
  • I am Simple
Re: नमस्कार
« Reply #1 on: October 01, 2011, 10:12:33 PM »
मोठ्या व्यक्ती लहान मुले अथवा बालकांचे अवघ्राण करत असत. अर्थात मेंदूचा वास घेणे. ही प्रथा अजूनही परदेशात चालू आहे. आपण विसरलो आहोत. यातून बालका वरचे आत्यंतिक प्रेम तर व्यक्त होतेच तसेच बालकाच्या शरीराच्या वासावरून [ आपल्या पैकी अनेकांना नक्की माहित असेल की ताप आल्यावर अंगाला कसा एक विचित्र प्रकारचा वास येतो.] त्याचे आरोग्य आणि घरातील आर्थिक, आरोग्यविषयक माहिती ही समजत असावी. तसेच अशा बालकाच्या भोवतीच्या वाईट शक्ती [Bad Evils ] बाबतही माहिती जाणकारांना नक्की कळत असणार. यावर संशोधन होणे आवश्यक आहे.

देवळाच्या बाहेरून जाताना म्हणूनच एका हाताने नमस्कार करणे निषिद्ध समजले जाते. कारण त्यात दोन्ही मेंदुन्चा सहभाग नसतो. देवळात संपूर्ण शरणागत होऊन साष्टांग म्हणजे शरीराच्या आठही अंगांनी ती टेकवून हे देवा मी तुझ्यापुढे अगदी कवडीमोल आहे आणि तुला संपूर्णपणे शरण आहे, माझे जे काही बरे वाईट करणार असशील ते माझ्याच हिताचे आहे आणि ते तू नि:शंकपणे कर या भावनेने नमस्कार करावयाचा असतो.

सलाम करण्याची पद्धत साधारणपणे मध्यपूर्वेतून आली आहे. त्यात सैनिकी वरिष्ठांना मान देण्याचा आणि एखादे मोठे कार्य पार पादालेल्याचा आदर व्यक्त करण्याचा हेतूच अधिक प्रमाणात आहे.


हस्तांदोलन करताना एकमेकांची शक्ती जोखली जाते. त्यातही हात हातात घेऊन मोकळेपणाने आंदोलित करणार्यांची मनमोकळेपणाची भावना लक्षात येते, तर दुसरा हात हलवेल त्या प्रमाणे हलवला जाऊ देनारयाची दुबळेपणाची भावनाही दिसते. त्यामुळे हस्तांडोलानात मान देण्यापेक्षा समोरच्याला बरोबरीचे मानाने किंवा त्यावर कुघोडी करण्याची, आपण स्मार्ट असल्याचे दाखवण्याची भावनाच अधिक आहे.


असो. मित्रांनो आपल्याला दोन्ही हात जोडून हृदयपूर्वक नमस्कार करून आपली रजा घेतो.
नमस्कार....पुन्हा भेटू.
Dr हेमंत उर्फ कलादास..
« Last Edit: October 01, 2011, 10:14:24 PM by madhura »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):