Author Topic: आपण सगळेच अर्धवट गांधीच  (Read 1930 times)

Offline संदेश प्रताप

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
    • Mazya kavita
आपण सगळेच अर्धवट गांधीच
« on: October 02, 2011, 11:57:42 AM »


आज आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंती. गांधीजी म्हणजे डोळ्यासमोर येतो तो गांधीवाद, अहिंसा, गांधीगिरी.
गांधी विचारसरणीवर अनेक दुमते आहेत. एक वर्ग असाही आहे जो गांधी ह्या व्यक्तीचा विरोध करणारा आहे. पण मला त्या वरती काही लिहायच नाही आहे. कारण तेवढी माझी कुवत नाही

मी एक सामान्य माणूस म्हणून विचार करतोय की मी एखाद्या विचाराचे समर्थन करतोय म्हणजे नक्की काय??? मी नुसता तोंडाने बोलतोय, की आचरण करतोय??? "आय हेट गांधी" म्हणणं खूप्प सोप्प आहे , पण गांधी म्हणजे काय रसायन होतं हे किती लोकानि वाचलय?? किव्वा सावरकर जहालमतवादी होते, पण त्याना जी क्रांती अभिप्रेत होती त्याबद्दल किती जनाना माहीत आहे???

दोन्ही विचार खरं सांगायाच तर आउट डेटेड झालेत. एक साध उदाहरण , तुम्ही संध्याकाळच्या वेळी रस्त्यातून जात आहात, आणि तुम्ही पहिलात की ४/५ तगडे गुंड एका मुलीची भर रस्त्यात छेड काढतायात तर तुम्ही नेमका कोणता विचार त्या परिस्थितीत वापराल?? गांधीगिरी??? हात जोडुन त्या गुंडाणा   सांगाल , मित्रानो तुम्ही जे करताय ते चुकीच आहे, पाप आहे, तुम्हाला नरकाच्या दिशेने नेणारं आहे. आणि ते गुंड तुमच म्हणणं शांत पणे ऐकून घेतील???? की मूवी मधल्या हीरो सारखं त्याना मार द्यायला हात सरसवाल????म्हणजे आपली असली नसलेली हाडे एक होतील.  थोडक्यात काय दोन्ही विचार प्रॅक्टिकली फेलच.

सारासार विचार हा असेल की जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देणे किव्वा जवळच्या वस्तीतील लोकांची मदत घेणें. पण आपण किमान हे तरी करू का??? नाही आपल्याला तेवढा वेळ आहे कुठे??? आणि पोलिसांच्या लफड्यात कोण पडेल??? रात्री पार्टीला जायचय, फुकटाचा टाइम वेस्ट!!!

म्हणून मी म्हणालो, आपण सगळे अर्धवट गांधी,

अर्धवट गांधी का?? तर पूर्ण सावरकर कधीच होऊ शकणार नाही पण मवाळ विचारांचे , स्वार्थी , तोंडाने वायफळ क्रांतीच्या , अन्यायाच्या भाषा करणारे अर्धवट गांधी होऊ शकतो.

पूर्ण गांधी व्हायची आपली लायकी नाही आणि कुवत सुधा........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,673
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आपण सगळेच अर्धवट गांधीच
« Reply #1 on: October 10, 2011, 03:35:28 PM »
अर्धवट गांधी का?? तर पूर्ण सावरकर कधीच होऊ शकणार नाही पण मवाळ विचारांचे , स्वार्थी , तोंडाने वायफळ क्रांतीच्या , अन्यायाच्या भाषा करणारे अर्धवट गांधी होऊ शकतो.

पूर्ण गांधी व्हायची आपली लायकी नाही आणि कुवत सुधा........


khar aahe........

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):