Author Topic: लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव  (Read 4778 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple
प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव आणि कुठेतरी संभाळून सेव ही ठेवा परत वाच्यानासाठी!
'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...
- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.
मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..Offline sanjiv_n007

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
Nakkich pratyek navryane aaplya baykola samjhun va vishvasat gehtla pahije.

Chhaann....


Offline avinash mohan

 • Newbie
 • *
 • Posts: 10
 • Gender: Male
 • एक हरवलेला क्षण.. मो.9762677341
Khup chhan lekh aahe. Pan pratekachya babtit ase ghadlech ase kahi nahi

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Hmmmmm
vichar karayala lavanara lekh aahe
far chan......

prashant mugale

 • Guest

prashant mugale

 • Guest

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
खरच लग्न करणाऱ्यांसाठी आणि झालेल्यांसाठी खूप जरुरीचे आहे हे तुमचे लेखन, सर्वांनी आपआपल्या बायकोचा  विचार करायला हवा.
« Last Edit: March 29, 2012, 12:07:23 AM by राहुल »

Pallavi Doke

 • Guest
Agdi khare ahe..  Kahi mulana hi sangaychi vel yet nahi pan kahina kharch ya goshtichi janiv karun dene avashyak ahe.. Khup chan Madhura.. Madhur ch lihites..   :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास वजा दहा किती ? (answer in English number):