Author Topic: माझ्या आईचा आमच्यावरचा जीव नक्कीच वाचा मित्रानो  (Read 1653 times)

Offline अमोल कदम .

  • Newbie
  • *
  • Posts: 3
 :( माझी आई कशी होती ते
१९ जून २०११ संकष्टी होती या दिवशी माझी आजी हि गेली २ दिवस हि झोपूनच होती,काही हि खात नव्हती का पीत नव्हती,खूप वाईट वाटत होत तिला त्या अवस्तेत बघून न कळत डोळ्यातून पाणी सुद्धा येत होत,मम्मी तर नुसती रडतच होती माझी आणि रडणारच शेवटी काय केल तरी आई होती तिची
२ दिवस आई ची हालचाल फार कमी तोंडातून एक शब्द निघत नव्हता,तरी सुद्धा आई आहे बोलेल आता बोलेल पण नाही बोलली ती फक्त मन हलवत हो कि नाही उत्तर देत होती मी विचारल आई ला कि आई आग उठ न ग अस काय झोपून राहिलीस अग बोल न आमच्याशी पण नाही अजिबात हालचाल नाही मग मी म्हटल कि मग जाऊ का मी कामाला तेव्हा तिने मान हलून सांगितल कि नाही अस आणि ती तिची हालचाल पाहून मन अगदी भरून आलं
नंतर आई ने जेव्हा जीव सोडला त्या वेळी तर विश्वासच बसत नाह्वता कि आई आता नाही आपल्यात
मग तेव्हा तर अश्रू माझे नकळत केव्हा डोळ्यातून बाहेर आलेत ते कळलच नाही मला
आई ला जेव्हा स्मशानभूमीत ठेवल गेल तेव्हा तर अस वाटत होत कि आता आई उठेल आणि म्हणेल मला कि अमोल अरे मला उठवत नाही आहे रे माल उठाव मला हे कुठे आणल आहेस मला घरी नाही का नेणार तू पण नाही उठलीस तू आई सोडून गेलीस आम्हाला
तुला शेवटच पाणी पाजताना अगदी रडू येत होत त्य पाण्या मध्ये अश्रू पडला सुद्धा असेल आई
तुझ्या वर जेव्हा लाकड ठेवली जात होती तेव्हा तुला त्रास झाला असेल ना ग खूप वेदना झाल्या असतील ना ग तुला माझ मन मानायला तयारच नव्हत कि हे काय होतंय तुझ्या सोबत तू आता आम्हाला सोडून कायमची जाणार आहेस
मोहन मामा जेव्हा तुला अग्नी देत तेव्हा मात्र पूर्ण खचून गेलो होतो मी सावरायला कुणीच नाही कि समजावयला सुद्धा कुणी नाही गप्प उभा राहत तुला त्या अग्नीत जळत असताना पाहत राहिलो
खूप त्रास दिलास आई आम्हाला तू आमच्यात निघून जाऊन का गेलीस ग सोडून आम्हा सर्वाना
तुझी सवय झाली होती ग आम्हाला जरा कामा वरून उशीर झाला कि कशी पटकन तू पोर अजून आलीत का नाही हे पाहण्या साठी दरवाज्यात उभी राहायचीस आणि जर आम्ही दिस्लोट कि एक सोम्य अश्या आवाजात म्हण्य्चीस कि आलीत पोर माझी आता कोण म्हणार ग अस,कोमलला जरा ओरडलो कि दम द्याचीस कि कशाला ओरडतोय तिला लहान आहे ती अजून तो दम आता आम्हाला कोण देणार अस नातवाना टाकून जात का ग कुणी
तुझ्या त्या वॉकर कडे पाहिलं ना कि खूप आठवण येते तुझी कि आता आई चालेल पण नाही चालत ग आता तो त्याला चालवणारी व्यक्ती नाहीं आहे ना
तू म्हणत होतीस ना ग कि एका तरी नातवाच लग्न पाह्यच आहे अस आग भाई लग्न करतोय पुढच्या वर्षी ते लग्न पाहायला तरी राहायचं होतस तू फसउन गेलीस आम्हाला
खुप आठवण येते आई तुझी तुला आज जाऊन १ महिना झाला हळू हळू वर्ष सुद्धा होईल पण तुझी आठवण हि न विसरण्या सारखी आहे तू मला नेहमी म्हणायचीस ना कि अमोल अरे घरातून बाहेर निघताना देवाच्या पाया पडत जा,अग आता मी अंघोळ करून आलो कि लगेच देवाच्या पाया पडतो नंतर तुझ्या फोटोच्या पाया पडून आपल्या तयारीला लागतो तो क्षण पाह्यला तरी परत ये
मी जेव्हा तुझ्या फोटोच्या पाया पडतो तेव्हा आई पाहतेस ना ग मला म्हणत अशील ना ग हसत कि मुलगा सुधरला माझा अस पण नाही ग सुधरलो नाही ती सुध्ररोलास मला
तू म्हण्याचीस कि मला बहुतेक ह्या वेळी गणपती पाहायला नाही मिलणार आपला पण मी म्हणायचो कि अग नाही भेटेल तुला पण तुझच खर झाल पण देवाला सुद्धा त sanksti पर्यंत थांबून ठेवलास गणपती बाप्पा ने ऐकल ग तुझ
त्याला माहित होत कि तू गणपती नाही पाहू शकणार म्हणून तुला त्याने संकष्टीलाच आमच्या पासून दूर नेल ना ग
आई आज हा एक एक शब्द लिहित असताना माझ्या डोळ्यातून नुसता अश्रू पडत होता ग मन अगदी भरून आल ग माझ हे जे काही आहे हे तुझच आहे आणि आम्ही सुद्धा सर्वे तुझेच असू नेहमी
देवाला फक्त एवढंच सांगेन मी कि मला जर पुढच्या जन्मात मानवाचा जन्म देणार अशील तर पुन्हा ह्याच कुटुंबात दे आणि माझी आई जर कुणी असेल तर ती फक्त तर ह्या माझ्या दोन्ही आजीच असुदेत

तुझा लाडका नातू
अमोल