Author Topic: गारवा  (Read 1443 times)

Offline amit.dodake

  • Jr. Member
  • **
  • Posts: 60
गारवा
« on: December 10, 2011, 07:58:43 PM »
गा र वा. . .

               आज सकाळपासून उन्ह पडल होतं, घरातून बाहेर पडावसं  वाटत नव्हतं तरी ऑफीस होतं  आणि न राहवून घरातून अमित घरातून बाहेर पडला.. त्याचा मूड तसा खूपच खराब होता.. "काय! उन हे! रोजचा वैताग आलाय.." असा काहीसं पुटपुटतचं तो घराबाहेर पडला.. आज खरच उन्हाचा तगादा खूप वाढला होता.. तो बस पकडायला थांबला..आणि त्यात..बस पण वेळेवर नव्हती..१५-२० मिनिटे वाट पाहिल्यावर त्याला..बस मिळाली..त्यात पण खूप गर्दी होती.. आजचा दिवस कसा जाईल या विवंचनेत अमित विचार करत होता...त्यात तो उभा राहून..बसमधून बाहेर पाहत होता.. खर म्हणजे..तो त्या बस स्टोप ची वाट पाहत होता..जिथे अर्चना..नेहमी चढायची.. पण..हल्ली बरेच दिवस ती दिसली नव्हती...त्यामुळे अमित सुद्धा तिच्याच विचारात अडकला होता....आज तरी ती भेटेल आपल्याला या वेड्या आशेत तोः..बाहेर पाहत बसायचा..कुठे असेल ती? काय करत असेल? ती हल्ली येत नाही बस मध्ये? लग्न बिग्न झाल असेल का तिचं? पण तिने पूर्वकल्पना दिली नव्हती अशी काही? का अजून काही फॅमिली प्रोबलेमस असतील? मुळात..असंख्य प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजवलं होतं...
 तिकडे अर्चना सुधा हॉटेल वर जायला निघाली..मुळात अर्चना किचन डीपार्टमेंट मध्ये कामाला होती.. बरेच दिवस तिची आणि त्याची भेट होत नसे..अधून मधून भेट व्हायची ती पण बस मध्येच ..पण आता खूपच दिवस झाले होते..अमित ला भेटून.
                   
                    आज अर्चना चिडचिड करतच निघाली होती..घरातली सगळी कामं आवरून आज तिला निघायला उशीर झाला होता.
थोड्याच वेळात बस आली.. गर्दी होती..पण अर्चनाला आधीच उशीर झाल्या मुळे तिने त्या बस मध्ये चढायचा निर्णय घेतला....त्या बस मधेच बरीच गर्दी होती.. तशी ती लेडीस सीट जवळ धक्काबुक्की करत उभी राहते न राहते तोवर....गर्दीतून तिला हाक ऐकू येते.. "आरचीस....!".. तिला हाक कुठून आली ते कळल नाही..या नावाने हाक़ मारणारा फक्त एक अमितचं होता...तिची ती नजर..ती गर्दीतून वळून पाहते आणि तिला अमित दिसतो.. दोघांच्या चेहऱ्यावर एकदम हसू उमटत.. इतक्या दिवसांनी दिसल्यावर..अमितची सगळी चिडचिड थांबते..आणि कधी एकदा तिच्याशी बोलतो असं त्याला झालं. त्याने हातवारे करतच विचारलं..कुठे आहेस तू? आज बर्याच दिवसांनी? अर्चना ने..थांब  म्हणत इशारा केला..तेवढ्यात..अमित स्वतःच गर्दीतून वाट काढत तिचा जवळ उभा राहिला.. आणि पहिलाच प्रश्न विचारला.. "आग आर्चीस.. आहेस कुठे तू? किती दिवस झाले आपली गाठभेठ नाही झाली.. माझ तर मनच लागत नव्हतं..." अर्चना ने त्याला मधेच तोडत बोलली .."अरे! हो हो..थांब जरा..किती प्रश्न विचारशील एकदम ! ?" यावर अमित थोडा हसला.. "अरे माझी शिफ्ट बदलली होती म्हणून मी लवकर निघून जायची.. आज शिफ्ट बदलली आहे..म्हणून आज मी भेटले तुला.." अर्चना ने एकाच श्वासात उत्तर दिलं.. "आज मला खूप बरं वाटलं!! " अमित म्हणाला, त्यावर मिश्कील हसत  अर्चना ने सुद्धा कबुली दिली. खूप दिवसांनी भेटल्यावर तिची सगळी  चिडचिड गायब झाली, दोघांची हितगुज सुरु झाली! आणि पुन्हा दोघांनी आपल्या मनातल्या भावना तश्याच राहू दिल्या !
             
               
उन्हं वाढतचं होतं! त्यात अर्चनाचा बस स्टोप आला! ती अमित ला निरोप देऊन निघाली..पण अमित ला तिला सोडावास वाटतं नव्हतं आज..का जाणे काय झालं होतं दोघांना पण..दोघांना ही काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं ... अर्चना पुढे उतरली..आणि अमित पण तिच्या मागून उतरला! दोघे बस स्टोप च्या सावलीत उभे राहिले!! गप्पांचा ओघ लागला होता.. हळू हळू सावली वाढली, काळोखी ढग गरजू लागले, वारा कसा सैरभैर वाहू लागला.. आज वातावरण आल्हाददायक झालं होतं ... दोघांच ही मन नव्हत कुठे जावं... बदललेला मौसम पाहून दोघे आनंदी होते! आणि पाहता पाहता  जोराचा पाउस पडू लागला! पावसाच्या मंद धारा अंगावर बरसू लागल्या..आणि अर्चना ने खट्याळ नजरेने हसायला सुरवात केली..एखाद्या लहान मुलीनी पावसात खेळावे ..तशी काहीशी परिस्थिती  झाली होती..आज पावसात तिच्यासोबत चिंब भिजून नाचावं असं काहीस वाटत होतं त्याला..

                 
अमित ने आज ऑफीसच्या बॉसचा पण फोन कट केला! आज मानाने निर्धार केला होता.. कि आपल्या मनातल्या भावना आज मांडून टाकायच्या.. अर्चना च्या डोळ्यात त्याला.. प्रेम दिसत होतं! क्षणभर दोघांची नजरानजर झाली, अर्चना ने..काही क्षणात पुन्हा नजर..चोरायचा प्रयत्न केला.. अमित ने तिची हनुवटी ला धरून पुन्हा नजरेनेच नजरेत गुंतायला सांगितलं...पाउस पडत होतां..थंड हवा चालत होती..आणि त्यात ते दोघे चिंब भिजलेले, एक मेकांच्या डोळ्यात पाहत गुंत्लेलेया त्या दोघातले अंतर कमी होऊ लागले होते! अमित ने तिचा हात घट्ट धरला ! आणि म्हणाला.."अगं अर्चू, यडूचं आहेस हा तू, तुला कसं गं कळत नाही". अर्चू बेभान होऊन ऐकत होती.. वारा आणि थंडी वाढतच होती.. "मला कळतंय रे अमित.. पण तू कधी समजणार माझ्या भावना.." अर्चना म्हणाली.. "मी ओळखलंय...आता..थोडा उशीर झाला..पण फायनली !! ...." अमित भावनिक होऊन म्हणाला... "अर्चू..!" अमितच्या बोलण्यावर..अर्चूने भुवया उंच करत ..नुसती मान हलवत म्हणाली.. "काय"? .. अमित - "माझं तुझ्यावर खरच खूप प्रेम आहे!" यावर अर्चना क्षणभर हसली..तीच्या डोळ्यातून आनंद दिसत होता....खूप खुश झाली होती ती.., आज तिला सगळं काही आनंदी वाटायला लागलं होतं, डोलणारी झाडे, आकाशातले काळे ढग.. गर्दी...रस्ते....पडणारा पाउस! सारं काही आनंदी... ! मन आज सुखावून गेलं होतं... एक सुंदर स्वप्न खर झाल्यासारखं वाटत होतं!
 अर्चना म्हणाली .."अमित.. खरच रे, i really like u, आणि माझे तुझ्यावर पण खूप प्रेम आहे!" असे बोलून  अर्चना ने त्याचा हात अजून घट्ट धरला".... काही क्षण ती  त्याच्याकडे पाहत राहिली....आणि नंतर त्याच्या जवळ आली, तिच्या गालाचे स्पर्श त्याच्या गालाला होत होते... कानाजवळ येऊन ती हळूच म्हणाली...आय लव यु अमित..तिच्या त्या बोलण्याच्या स्पर्शाने..अंगावर काटा आला. अमित ने आपल्या आवाजात गाणं गुणगुनलं

 "
आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा प्रिये ...तुझा जसा ...गोडवा नवा नवा.. गारवा!! "     आणि त्याने तिला घट्ट मिठीत विसावा दिला...
 
आज आत रुतलेल्या भावनांना बाहेर प्रवेश करायचा मार्ग मोकळा झाला होता..कोणावरही जर प्रेम कराल..तर.... पूर्ण सोज्वळ अन्तःकरणाने जीव लावून प्रेम करा..अथवा करूच नका.. :-*
 

 
 -फुलपाखरू
(www.facebook.com/amit.dodake)
« Last Edit: June 02, 2013, 02:59:36 PM by amit.dodake »

Marathi Kavita : मराठी कविता