Author Topic: आजच्या तरुणांच्या समस्या.......  (Read 4654 times)

Offline amitunde

 • Newbie
 • *
 • Posts: 33
‘मरून जावंसं वाटतंय’ ......कधी असा विचार आलाय का आपल्या मनात........???

मित्रानो, तारुण्याच्या जगात वावरताना आपण खूप मोठी ध्येय बघता असतो...ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो...पण याच वयात आपण अपयशाला घाबरत असतो...यौवनाच्या उबंराठ्यावर प्रेमाची अपेक्षा बाळगत असतो...पालकांशी आपले मतभेद होतात....आणि उत्साहानं जगणार्या तरुण मुलांची पावलं चुकीच्या दिशेने जातात.....

कुणाला काहीच सांगता येत नाही, उत्तर सापडत नाही, कुठलीच दिशा मिळत नाही जगण्याला म्हणून सोन्यासारख्या आयुष्याकडे पाठ फिरवणारे काही तरुण दोस्त आपण आपल्या अवतीभोवती पाहतो....पण असं होऊ नये म्हणूनच मी आज तुमच्याशी काही समस्यावर बोलतोय...

१. प्रेम.........

प्रेमभंग झालाय म्हणून जगावंसंच वाटत नाही. मरून जावंसं वाटतंय अस बर्याच जणांना वाटत......आपण नक्की प्रेमात पडलो होतो की, केवळ शारीरिक आकर्षण आहे हेच अनेकांना कळत नाही आणि प्रेमभंगाचं दुख पचवता येत नाही......ती किंवा तो होच म्हणत नाही हे सहन होत नाही..... बेचैनी वाढते. अभ्यास गडगडतो. त्यात घरचे सगळे सतत बोलतात म्हणून मग बेचैनी वाढते आणि वाटतं जावं मरून, नकोच ती कटकट.

२. करिअर.....

घरचे म्हणतात बघ सचिन तेंडूलकर बघ... हो ना जरा त्याच्यासारखा. ...कोण म्हणतो हो इंजिनिअर....... कधी वाटतं व्हावं डॉक्टर. .....कधी तर आपण जे करतोय तेच वाटतं बोगस.... कधी आपण नक्की काय आणि का करतोय हेच कळत नाही. आणि एवढं करून केलंच सगळं, झालोच पासबिस तर नोकरी मिळत नाही. .....मग करायचं काय.?
टेन्शन येतं. ते वाढतं. बरोबरीचे सगळे पुढे निघून जातात. पॅकेजच्या चर्चा करतात आणि आपण मात्र कुठेच चिकटत नाही. चिकटलं तर टिकत नाही. याचं टेन्शन येतं. त्यात जर लग्न जमत नसेल तर झालंच. वाटतं जावं मरून.!

३. आई-बाबा......

‘माझे आईबाबा फार बोअर मारतात, त्यांची आमच्या काळी असं होतं ही टेप ऐकण्यापेक्षा जावं मरून असं वाटतं.!’
हे खरंय की आई-बाबा काही मुलांचे शत्रू नसतात. ते तर बिचारे आपल्या लेकराबाळांसाठीच राबत असतात. मग तरी मुलांना असं का वाटावं.?
कारण एकच, सतत लेक्चर. सतत उपदेश. आणि सतत कमी लेखणं. मुलांना जिव्हारी लागेल. ते झडझडून कामाला लागतील या अपेक्षेने आईवडील करतात अपमान. पण अनेकदा काही मुलांवर परिणाम वेगळाच होतो. मुलं घुमी होतात आणि तुटतात पालकांपासून. पण खरंच सांगा, एवढं अवघड का असतं आईबाबा आणि मुलांनी एकमेकांशी बोलणं. भांडणं झालं तरी चालेल पण निदान बोलायला काय हरकत आहे. मरून जावंसं वाटण्यापेक्षा भांडणं परवडलं.!

४. व्यसनाधीनता.....

अयोग्य मित्रांची संगत, नैराशेयेची भावना, अभ्यासाचा किंवा कामाचा अतिताण, घरगुती भांडण यामुळे आजची तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे.......सिगारेट ओढल्याशिवाय मन एकाग्र होत नाही किंवा दारू पिल्याशिवाय मन मोकळे होत नाही असे म्हणणारे बरेच तरुण आहेत.....तुम्हाला खरच मनापासून अस वाटत का सिगारेट किंवा दारू या सर्व प्रश्नावरचे रामबाण उपाय आहे.....??

५. जलद यश.......

T-२० च्या जमान्यात सर्वांनाच यश विनासायास हवे आहे...आपल्याला BAT हातात घेतली कि सचिन व्हायचे आहे, पुस्तक हातात घेतले कि अब्दुल कलम व्हायचे आहे, व्यवसाय सुरु केला कि अंबानी व्हायचे आहे.......पण त्यांनी यश मिळविण्यासाठी केलेला संघर्ष, मेहनत आणि तपशर्या आपण का विसरतो......अहोरात्र कष्ट करण्याची आपली तयारी आहे का .......??

निदान बोलता तरी आलं त्याविषयी विश्वासानं तरी अनेक कोडी सुटतील. जगण्यावर आलेला हा बेचैनीचा तवंग पुसला जाईल आणि स्वच्छ निरभ्र होईल जगण्याचं आकाश....
आपले विचार व्यक्त करून आपल्या भावना मांडा...........

अमित सतीश उंडे........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
‘मरून जावंसं वाटतंय’ asa mala life madhye baryachda vatala :( ...... nice article.... thanks :)

Offline shreedatta0

 • Newbie
 • *
 • Posts: 4
mal as khup vela watal pan kay karnar