Author Topic: आजचा विद्यार्थी...आरक्षण...आणि आत्महत्या.......  (Read 1713 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
परवा झालेल्या सांगली जिल्हा पोलीस भरतीत केवळ चार गुण कमी पडले म्हणुन इंचलकरंजी येथील एका OPEN CAST च्या मुलाने विश्रामबाग रेल्वे स्टेशन वर धावत्या रेल्वेपुढे उडी घेऊन आत्महत्या केली. या मुलाला वडिल नव्हते आणि घरी आई एकटीच नि तो एकटाच मुलगा त्या आईला.....

आज दहावी पर्यंतच्या शिक्षणाचा सरकारने पार खेळ खंडाबो करून टाकलाय...BEST OF FIVE, खेळाचे अतिरिक्त गुण, GRADING पद्धत, सर्व विषयांना तोंडी परीक्षा..., बंद झालेली गुणवत्ता यादी आणि कळस म्हणजे आठवीपर्यंत लाल शेराच नाही......यामुळे विद्यार्थीला यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द,चिकाटी आणि मेहनत लागते हे माहीतच नाही....स्पर्धा आणि संघर्ष या दोन शब्दांचा त्याला गंधही नाही......त्यामुळे जीवन जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या जीव घेण्या संघर्षाला तो कसा काय समोर जाणार........??

मित्रानो, संविधान लिहिले त्यावेळी आरक्षण हि काळाची गरज होती....आता ती राजकारणी लोकांची आहे...१%, २% करता करता ते ८० % टक्क्यापर्यंत पोहचले आहे...भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ५०% हून अधिक असलेल्या OPEN मुलांसाठी आज काहीही OPEN नाही....पण म्हंणून आत्महत्या हा त्यावरच उपाय नाही....

अपयश फक्त एवढंच सिद्ध करत कि यशासाठी झालेला प्रयत्न प्रामाणिक नव्हता...जिंकण्यासाठी आत्महत्या नाही तर पुन्हा जिद्दीने प्रयत्न करावा लागतो...आत्महत्या करून आपण आपले प्रश्न सोडवितो पण आपल्या पालकांची जिवंतपनीच हत्या करतो....मनगटात दम असेल तर जगही जिंकता येत...आयुष्य हे खूप सुंदर आहे...आपल्या प्रयत्नांनी ते अजून सुंदर बनवायचे असते...

पेपर वाटणारा मुलगा भारताचे Missile man होऊ शकतात, पेट्रोल पंपावर काम करणारा माणूस भारताचा सर्वात श्रीमंत नागरिक बनू शकतो, कर्करोगावर मत करून Lance Armstrong तब्बल सात वेळा टूर दि फ्रांस जिंकू शकतो आणि आपल्यातलाच एक मुलगा क्रिकेटचा देव बनू शकतो ...मग आपण का नाही...कारण या पाठीमागे त्यांची अनेक वर्षांची तपश्चर्या व कठोर मेहनत आहे हे आपण विसरून जातो...संयम,प्रयत्न,ध्यास व चिकाटी यामुळेच माणूस असामान्य बनतो...त्यासाठी कोणताही short cut नाही...

यशाकडे जाणारा मार्ग खडतर असला म्हणून तो बदलायचा नसतो. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रावासात जर एखादा मोठा दगड वाटे आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं कारण त्याशिवाय कचरा जळून जात नाही.

अमित सतीश उंडे........ 

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):