Author Topic: संस्कार म्हणजे काय ?  (Read 2073 times)

Offline amitunde

 • Newbie
 • *
 • Posts: 33
संस्कार म्हणजे काय ?
« on: December 25, 2011, 06:26:12 PM »
संस्कार म्हणजे काय ?

प्रत्येक कार्यच चांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे, उदा. केळी खाऊन आपण साले टाकतो ही कृती आहे. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणे ही विकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकणे ही संस्कृती.

भूक लागली की खाणे ही प्रकृती. दुसऱ्याच्या अन्नाचा वाटाही आपण खाणे ही विकृती व अतिथींना आणि घरातील सर्वांचे म्हणजेच नोकरांचे, गुराढोरांचे जेवण झाले कि नाही हे पाहून मग देवाला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून खाणे ही संस्कृती.
मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारयुक्त असली पाहिजे.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करावयाचे म्हणजे त्याला 'आई-वडिलांना रोज नमस्कार कर', 'दुसऱ्याची निंदा करू नको' इत्यादी शिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे - तर तत्त्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने.

आठ वर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करावयाची आज्ञा दिलीत, तर ४ दिवस करील. पाचव्या दिवशी सांगेल ''मी नाही करणार.'' त्याला नमस्कार करण्याच्या फायद्यांबद्दल तत्त्वज्ञान सांगितले, तरी उपयोग होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, तर एकच उपाय आहे. आजपासून तुम्ही घरातील सर्व वडील मंडळींना रोज फक्त एकदाच नमस्कार करा. मुलाला एकदापण नमस्कार करावयास सांगू नका. चार दिवसांच्या आत मुलगा तुमच्या पाठीमागे येऊन घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करू लागेल. त्याला लाज वाटेल, की माझे आई-बाबा रोज आजी-आजोबांना नमस्कार करतात. मी मात्र बेशरमासारखा उभा आहे.

संस्कार करणे म्हणजे तोंड बंद कृती चालू !

संकलक......अमित सतीश उंडे........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: संस्कार म्हणजे काय ?
« Reply #1 on: December 25, 2011, 06:31:27 PM »
संस्कार करणे म्हणजे तोंड बंद कृती चालू ! ... patale ekdam

sawantdnyanesh

 • Guest
जेव्हा जेव्हा तुला ONLINE बघतो !
« Reply #2 on: December 25, 2011, 08:00:43 PM »
जेव्हा जेव्हा तुला ONLINE बघतो !
जेव्हा जेव्हा तुला ONLINE बघतो !
तुजा STATUS IDLE असतो !!
तुजा STATUS IDLE असतो !!
तरी पण मी तुला DISTURB करत नाही !
आणि मी पण DISTURB होत नाही !!
कारण ही एकच अशी जागा आहे की तू मला आणि मी तुला IDLE असतो !!
जेव्हा जेव्हा तुला ONLINE बघतो !

ज्ञानेश सावंत (Dnyanesh Sawant)