Author Topic: भारतीयांनो, फक्त एकदा वाचा अन प्रतिक्रिया द्या....  (Read 1392 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33

कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....??
आक्रोक्ष माझ्या जगण्याचा....कोणी जाणून घेता का....??

कुणाचा असेल हा जीवघेणा आकांत..??
चिमुकल्या स्त्री गर्भाचा कि दंगलीत होरपळलेल्या कुटुंबाचा..??
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा कि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा..??
अपयशी विद्यार्थाचा कि महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्याचा....कुणाचा...??

प्रगत रस्ते, वेगवान मोटारी, हवे तेवढे मॉल्स, सुसज्ज दवाखाने, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व सुख सोयी पायाशी लोळत असताना, भारतीयच परंतु या सर्वापासून वंचित असलेल्या ईशान्य राज्यांकडील लोकांचा आवाज आपल्याला कसा कळणार...??

मागासलेपणा, दळणवळणाची अपुरी साधने, उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी, जबरदस्तीने होणारे ख्रिस्तीकरण यात हि राज्ये भरडली जात आहेत. हा भाग उर्वरित भारतापासून कायमच वंचित राहिला आहे. हि लोक ज्या पद्धतीने जीवन जगतात, त्यांना तसेच जगू द्या हि इंग्रजांची मानसिकता स्वातंत्र्यानंतरही तशीच चालू राहिली.या भागाच्या समस्या ज्या वेगाने सुटायला हव्या होत्या ते न झाल्यामुळे आता असंतोषाचा उद्रेक होत आहे.   

चीन, बांगलादेश, पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्र पुरवठ्यामुळे नागा, मिझो, उल्फा या नक्षलवादी संघटना उच्छाद मांडत आहेत. जनतेला वेठीस धरत आहेत. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी तर अतिशय चिंताजनक आहे. एकट्या आसाममध्ये १२६ पैकी ४६ आमदार घुसखोरांचे प्रतिनिधित्व करतात, यावरून त्यांचे प्रमाण लक्षात येईल. आता तर बांगलादेशी मुख्यमंत्री होतो कि काय अशी परिस्थिती आहे. सीमेवर कुंपण घालण्याची आवश्याजाता असताना तसेच घुसखोरांचे मतदानाचे अधिकार काढून घेण्याची अपेक्षा असताना सरकारकडून मात्र घोर निराशा झाली आहे.

मणिपूर राज्यात तर संपूर्ण युवा पिढी अमली पदार्थाच्या आहार गेली आहे. बहुतांश तरुण नशेखोर असल्याने अनेकांचे संसार उद्धस्थ झाले आहेत. यामुळेच आज घटस्फोट, हिंसाचार, नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होत आहे. 

तरीही या लोकांच्या असंतोषाचे मुख्य कारण म्हणजे भारत त्यांना आपल मानायला तयार नाही. उच्च शिक्षणासाठी वेगळ्या राज्यात गेलेल्या युवकांचे अनुभव अतिशय वाईट आहेत. चेहऱ्याची ठेवण, राहणीमान यामुळे त्यांना चीनी-जपानी-नेपाळी अस हिणवल जातंय. मुलीना तर वेश्या म्हणून संबोधल जातंय. आणि या सगळ्याचा फायदा चीन उठवतंय.

चीनचे अतिक्रमण मानगुटीवर बसले असताना केंद्र सरकारची उदासीनता त्यांना हतबल करीत आहे. अरुणाचल प्रदेशचा ६०% हिस्सा चीनच्या ताब्यात असून उर्वरित ४०% भागावर देखील ते दावा सांगत आहे हीच खरी शोकांकीता आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातोय पण त्याचा दुरुपयोगच जास्त होत आहे. समाजसेवी संस्थांनी अथक प्रयत्न चालविले असले तरी त्याला खूप मर्यादा आहेत.

माणसाच्या सहनशिलतेला शेवटी मर्यादा असतेच. निवडणुकीवर बहिष्कार घालणे, सैनिकांविरुद्ध आंदोलन करणे अशा विविध मार्गांनी ते आपला आवाज पोहचविण्याचा प्रयत्न करतात. पण निद्रिस्त झोपलेल्या सरकारला आणि आपल्याला कधी जाग येणार...??

कदाचित उद्या आपल्याला हे सर्व समजेल पण त्यावेळी भारताच्या नकाशावरील उजव्या बाजूचे पंख छाटलेले असतील. Facebook, Twitter, वर्तमानपत्र, स्नेहसमेलन, ज्या व्यासपीठावरून शक्य होईल तिथून यांचे प्रश्न मांडा अन्यथा त्यांना असेच सांगावे लागेल कि,


ढाळू नकोस अश्रू, पुसणार नाही कोणी
आक्रोश तुझ्या जगण्याचा, बघणार नाही कोणी....

धरू नकोस अपेक्षा, आपल म्हणणार नाही कोणी,
जपानी-नेपाळी अस हिणवल्याशिवाय, गप्प बसणार  नाही कोणी...

आणू नकोस आसवे, भावना जाणणार नाही कोणी,
आपला परमार्थ इथे, सोडणार नाही कोणी....

जय हिंद 


अमित सतीश उंडे, सांगली
« Last Edit: February 17, 2012, 09:36:10 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):