Author Topic: कौल महाराष्ट्रातील निवडणुकांचा.......  (Read 1111 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेच्या वाघांनी भगवा फडकवला. बाळासाहेबांची सद्दी आणि पर्यायाने शिवसेनेला नेस्तनाबूत करायला चाललेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. या यशाने शिवसेनेला पुन्हा सोन्याचे दिवस येणार आहेत. राष्ट्रवादीची मुंबईतील आणि कॉंग्रेसची ठाण्यातील अवस्था अत्यंत बिकट आहे. लाचारी लोकांना नाकारत मुंबईत तसेच ठाण्यात सत्ता हि मराठ्यांचीच असणार हे जनतेने पुन्हा एकदा ठणकावून सांगितलय. खासदार आनंद परांजपेच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरही ठाण्याने शिवसेनेची साथ सोडली नाही. ठाणे हा शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांचा बालेकिल्ला आहे आणि आनंद दिघे यांच्या शिलेदारांनी तो शाबूत ठेवलाय. कोकणातही विशेषत रत्नागिरीत पक्षाने सत्ता राखली आहे. तसेच उल्हासनगर,अकोल्यात आणि जळगावात पक्षाला सत्ता मिळणार आहे.

केवळ दुसऱ्याच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या मनसेने नाशिक महानगरपालिकेत थेट सत्तेलाच गवसणी घातली आहे. राज ठाकरे यांच्या करीश्म्यापुढे बाकीच्या पक्षांची अवस्था दयनीय आहे. पुणेकरानीही राज यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला आहे. मुंबईतही अतिशय चमकदार कामगिरी करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. "दादरची चेत्यभूमी होऊ देणार नाही" या त्यांच्या आश्वासनाला तर १०० % प्रतिसाद मिळाला आहे. आजचे निकाल २०१४ विधानसभेपूर्वी मनसेची ताकद स्पष्ट करतात.

भाजपने मुंबईत चांगली कामगिरी करत सत्ता राखण्यात अत्यंत मोलाची मदत केली आहे. नागपूरमध्ये पक्षाने बालेकिल्ला शाबूत राखला असला तरी बाकी ठिकाणी विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीतल कामगिरी समाधानकारक नाही. जळगाव तसेच अकोल्यात जिल्ह्यात सत्ता मिळणार असली तरी पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील अवस्था चिंताजनक आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अजित दादांनी एकहाती सत्ता आणली.पण प्रतिष्टेच्या केलेल्या मुंबईत मात्र घोर निराशा हाती आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाने अतिशय चांगली कामगिरी करत बऱ्याच ठिकाणी सत्ता कायम राखत आपल महत्त्व अधोरेखित केले आहे. कोकणात सिंधुदुर्ग जि.प. अपयश आल असल तरी पंचायत समित्या कॉंग्रेसकडून हिसकावून घेतल्या आहेत. रत्नागिरीतील पक्षाची कामगिरी समाधानकारक आहे.

काहीही झाले तरी मुंबई महानगरपालीकेवरून भगवा हटवायचाच असा चंग बांधलेल्या काँगेसला मुंबईकरांनी वाटाणाच्या अक्षदा लावल्यात. पुण्यात तसेचअमरावती आणि सोलापुरात समाधानकारक कामगिरी केली असली तरी बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची पीछेहाट झाली आहे. रत्नागिरीत तर अस्तिव शोधावे लागणार आहे. राणेंनी सिंधुदुर्ग जि.प. राखली असली तरी बऱ्याच पंचायत समित्या ताब्यातून गेल्या आहेत. कॉंग्रेसवर आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांच्या हाताला या निवडणुकीत फारसे काही हाताला लागले नाही. बंडखोरांनी मात्र प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली आहे.


....अमित उंडे 
« Last Edit: February 17, 2012, 09:33:41 PM by MK ADMIN »