Author Topic: विकृत मनोवृत्ती : चूक कोणाची.......???  (Read 1333 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
आजच्या पिढीची मानसिकता.........       

काही दिवसापुर्वीची एक घटना सर्वांनाच माहित असेल. पत्रिकेतील ग्रह चांगले नसल्याने पुढील आयुष्यात खूप संकटे येतील असे ज्योतिषाने सांगितल्यावर त्या व्यक्तीने त्याच रात्री बायको-मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या करून सर्वनाश करून घेतला. 

अजूनही एक अशीच घटना आहे. एका घरी आजी व मुलगा दोघेच राहत होते. रात्री १ वाजेपर्यंत मुलगा प्रोढाचे पुस्तक वाचत बसला होता. रात्री १ वाजला तरी बाळ अजून  कसा झोपला नाही हे बघण्यासाठी आजी उठली व तिने असले पुस्तक हातात बघितल्यावर ते वाचण्यास प्रतिबंध केला. याचा त्या मुलाला राग आला व त्याने आपल्या आजीचाच खून केला.

अंगावर शहारा आणणाऱ्या या घटनांचे प्रमाण वाढले आहे. जरा काही मनाविरुद्ध घडले कि इतके टोकाचे निर्णय घेण्याची मनोवृत्ती कशी तयार झाली ? कशाचा हा परिणाम आहे ? आपण कुठे चुकतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

आजचे युग हे वेगवान व धावपळीचे आहे. सर्व भौतिक सुखसोयी पायाशी लोळण घेत आहेत. गाडी, पैसा आहे, वेगवान रस्ते, प्रगत तंत्रज्ञान आहे, चकाकणारे मॉल्स आहेत, सगळीकडे शीला आणि मुन्नी पण आहेत, इंटरनेटचे मायाजाल आहे. पटकन कुणाशीही संवाद साधता येतो. आवडत गाण किंवा गेम बटन दाबताच व्याकूळ न होता मिळतंय. सर्व जगच जणू आपल्या मुठीत आहे. पण आपल्याकडे वेळ नाही. आपल्यात संवाद नाही. आपल्याला स्वताशीच संवाद साधायला वेळ नाही, जगाशी तर नाहीच. कोणी खात्रीपूर्वक सांगू शकेल का....माझ्याकडे ओंजळभर शांतता नि समाधान आहे ...???

पैशाने सर्व सुख विकत घेता येतात असा आपला गोड गैरसमज आहे. आज कुठेही एकत्र कुटुंबपद्धती नाही. पालक दिवसभर नौकरी करतात. मुलांची काळजी घेण्यास, त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलण्यासही त्यांच्याकडे वेळ नाही. लहान मुलांचे आयुष्य बागेत किंवा सवंगड्याबरोबर न जाता काम्पुटर गेम, टी.व्ही.,बर्गर,पिझ्झा नि एकांतात चालले आहे. लहान वयातच त्यांना प्रोढासारखे वागावे लागत आहे. पालकांनी वेळेची भरपाई म्हणून जे मागेल ते  देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना कोणी नकार दिला कि हिंसक प्रवृत्ती वाढत आहेत.

आज किती घरी मुलांना शुभंकरोती, गणपती स्त्रोत तसेच गोष्टीमधून संस्काराचे धडे दिले जातात? मोठ्या व्यक्तींचा सन्मान करायला शिकविले जाते? किती जणांच्या घरी पुस्तकांचे समृद्ध कपाट आहे? किती जण आपल्या मुलांना व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन किंवा चांगले नाटक बघायला घेऊन जातात ? घरी देवाची गाणी, अभंग किंवा उत्तम संगीत असते?  कितीजण परिवाराबरोबर सहभोजन, सहप्रवास करतात ?  दुर्दैवाने यातील बऱ्याच प्रश्नाची उत्तरे नाही अशीच आहेत. हेच सर्व अप्रत्यक्षरित्या जबादार असते अशा मनोवृत्तीला.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक दिवसही इंटरनेट उपलब्ध नसेल तर अस्वस्थ होते, जीवाची घालमेल होते. मित्रानो, संयम बाळगायला शिका. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका. मनावर नियंत्रण मिळवा. प्रत्यक्ष संवाद साधा. कुटुंबाशी समरस व्हा. मतभेद/राग टाळून नात्यातील गोडवा वाढवा. सर्वात महत्वाचे शक्य तेवढे वाचन करा, चांगल्या लोकांचे विचार ऐका व आपले जीवन आनंदी ठेवा. 

अमित उंडे, सांगली                                                                               

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
khup chan lekh aahe ............... :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):