Author Topic: व्यसनाधीनता व उपचार........  (Read 1636 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
व्यसनाधीनता व उपचार........
« on: February 26, 2012, 07:56:09 PM »
व्यसनाधीनता व उपचार........

अनिकेत, २७ वर्षाचा इंजिनिअर...तीन वर्षापूर्वी एका चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला होता. छोटस स्वतःच घर घेतलं, लग्नही झाल. पण अचानक आर्थिक मंदीमुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. अनिकेतला हा धक्का सहन झाला नाही व तो व्यसनाच्या आहारी गेला. कुटुंबीयांनी खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पालक वैतागून गावाकडे निघून आले नि बायकोही माहेरी निघून गेली.

निखील, वय वर्ष २०.एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी. बारावीत चांगले गुण मिळवून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घरापासून दूर राहिला होता. चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच तो पहिल्या वर्षी नापास झाला. घरी पालकांना कसे तोंड दाखवू या विचाराने त्याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले.

वरील सर्व घटना व्यसनामुळे किती भयंकर परिस्थिती ओढवू शकते हे स्पष्ट करतात. व्यसन वाईट असते, त्यामुळे माणसाचा तोल जातो, स्वतासः सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो, आयुष्याची राखरांगोळी होते हे माहित असूनही त्यापासून कोणी सुटका का करून घेऊ शकत नाही ? काहीजण निराशेच्या भावनेतून, अपयशाला घाबरून, ताणतणाव दूर करण्यासाठी तर कोणी Relax होण्यासाठी म्हणून हा मार्ग निवडतात. तरुण पिढी आपण किती बिनधास्त व आधुनिक आहोत, प्रतीष्टेचे लक्षण म्हणून याला सुरुवात करतात व कधी आयुष्य बरबाद होते हे त्यांनाच समजत नाही. व्यसनांमुळे संकटे किंवा दुख कमी होत नसून ते अधिकच किचकट होत जाते, याचा कोणी विचारच करत नाही.

मध्यंतरी, बऱ्याच शहरामध्ये रेव्ह पार्टीचे पेव फुटले होते. चांगल्या सुशिक्षित घरातील मुले-मुलीही तेथे नशीली पदार्थांचे  सेवन व विक्षिप्तपणे नाचत होते. डान्सबार मध्ये  तरी संपूर्ण तरुण पिढीच बरबाद होते कि काय अशी परिस्थिती आली होती. तरुण पिढीमध्ये तर हे प्रमाण खूपच चिंताजनक आहे. आजकाल कॉलेजमध्ये किंवा ऑफिस शेजारी कॅन्टीनपेक्षा पानाची टपरी जोरात चालू असते. सुट्टीच्या दिवशी तरी दारूच्या दुकानासमोर प्रचंड मोठी रांगच असते. रात्रभर अमली पदार्थांचे सेवन करीत अश्लील कार्यक्रम बघणे हे तर होस्टेलमध्ये सर्रास सुरु असते.

हे प्रगतीचे कि अधोगतीचे लक्षण आहे ....???  यावर काही उपाय करता येईल काय ....???

सर्वप्रथम पालकांनी संवेदनशील होण्याची गरज आहे. आपला मुलगा बाहेर काय करतो, त्याचे मित्र कसे आहेत, सार्वजनिक ठिकाणी त्याची वर्तणूक कशी असते याची माहिती त्याच्या नकळत ठेवावी. जर चुकून व्यसनाच्या आहारी गेला असेल तर स्वतावरचा ताबा ढळू न देता त्याच्यावर संताप न करिता त्याचे समुपदेशन करावे. व्यसनमुक्ती केंद्रात न्यावे. पुन्हा चांगल्या मार्गावर येण्यासाठी त्याला धैर्य व प्रोत्साहन द्या.

मित्रानो, हे वयच असत ज्यात नकळत आपली पाऊले चुकीच्या दिशेने पडतात. काही बाह्य आकर्षणाच्या आपण आहारी जातो. पण आपणही थोडस मनावर नियंत्रण मिळवायला शिका. अशा संगतीपासून जाणीवपूर्वक स्वताला लांब ठेवा व सर्वात महत्वाचे असे काही वाटत असेल तर चांगल्या मित्रांशी किंवा पालकांशी शेअर करा. आपले जीवन शेवटी आपल्यालाच फुलवायचे आहे.


अमित सतीश उंडे, सांगली......                                                                         

Marathi Kavita : मराठी कविता