Author Topic: अमृताहुनी गोड  (Read 1214 times)

Offline किशोर देशमुख

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • Blog...
अमृताहुनी गोड
« on: March 09, 2012, 10:19:11 PM »
                  आमच्या गावात दर एकादशीला विठ्ठल मंदिरात कीर्तन होत. अशाच एका एकादशीला मी कीर्तनाला गेलो. कीर्तन म्हटल म्हणजे ज्यांना भजन कीर्तन यामध्ये आवड आहे ते सारे येऊन बसत बाया माणस त्यांची लेकर, म्हातारी मंडळी सारी आली. महाराजांचे आगमन झाले, आता प्रश्न पडला तो म्हणजे महाराज म्हणजे कोण? महाराज म्हणजे जे कीर्तन सांगतात, एखादी ओळ किंव्वा अभंग घेऊन त्याचा उदाहरणासहित अर्थ सांगतात. त्यांना आपण म्हणतो ह. भ. प. म्हणजे हरी भक्त पारायण. जाऊद्या तर असो …….
                    सारी मंडळी जमली, आणि मंडळी मध्ये होते दोन दारुडे पिऊन आलेले, त्यांची हि तीव्र इच्छा कि आपणही कीर्तन ऐकायचे आणि पुंण्याच काम करायचं. झाल तर मग कीर्तन सुरु झाल. महाराजांनी एका ओळीचा अर्थ सांगायला सुरुवात केली.

महाराज म्हणतात तर मंडळी सांगा कपात काय असतो?

मंडळी म्हणते चहा.

लगेच दारूड्यांपैकी एक उत्तरला महाराज कपात चहा असेल तर चहा नाही तर कप रिकामाच. मग काय असेल कपात?

महाराज दचकले महाराज म्हणाले जाऊद्या मंडळी. चहा कसा असतो?

मंडळी सांगते गोड.

लगेच दारूड्यांपैकी दुसरा उत्तरतो कि चहात जास्त साखर टाकली कि गोड नाहीतर फिक्काच लगेच सगळी मंडळी हसायला लागते.

महाराज म्हणतात चहाला जाऊद्या तर मला हे सांगा कि मधापेक्षा गोड काय?

लगेच दारूड्यांपैकी एक उत्तरतो म्हणतो “गुळ”

महाराज म्हणतात “गुळ?”

लगेच त्या दारूड्यांना कीर्तनातून बाहेर जायला सांगण्यात येत.
मग कुठे महाराज त्या ओळीचा अर्थ सांगण्यास मोकळे होतात
तर महाराज सांगतात कि मध पेक्षा गोड आहे अमृत. आणि अमृताहुन गोड काही असेल? नाही कारण अमृत पिल्याने माणूस अमर होऊन जातो तर त्यापेक्षा गोड काय असणार? तर त्याहीपेक्षा गोड काही आहे ते म्हणजे परमेश्वराचे नाम.  परमेश्वराचे नाम घेतल्याने व्यक्ती सर्व काही विसरून जातो. परमेश्वराचे नाम एवढे गोड आहे कि त्यापेक्षा गोड काहीच नाही.  मग महाराज ती ओळ सांगतात


“अमृताहुनी गोड नाम तुझे देवा”
………………………

Marathi Kavita : मराठी कविता