Author Topic: चिंकीच्या भविष्याचा प्रश्न  (Read 874 times)

Offline किशोर देशमुख

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • Blog...
             
            नुकताच माझा मित्र प्रवीण च्या बहिणीचा (चिंकीचा) दहावीचा result लागला. पास झाली त्यामुळे सगळे घरातील सदस्य आनंदित होते. आता प्रश्न होता तो म्हणजे चिंकीच्या भविष्याचा म्हणजे तिला बारावीत science द्यावे कि मराठी मेडीअम. सगळी घरातील मंडळी जमली. प्रत्तेक जन आपापले विचार व्यक्त करीत होते.

काकू : चिंकीला science जमणे थोड कठीणच आहे

आई :  जरी अभ्यासात जास्त हुशार नसली तरी ती तशी हुशार आहे म्हटल.

वडील : तस तीला science द्यायला काही हरकत नाही.

काका : करील ती अभ्यास. नाही प्रवीण.

प्रवीण : कशाच science ,  दहावीच तर कशीबशी पास झाली ती.

आई : नाही नाही आपण तिला science च देऊ.

प्रवीण : तुला काय माहित कशी आहे ती.

वडील : मी म्हणतो कि एकदा देऊन पाहायला काय हरकत आहे.

प्रवीण : अहो बाबा थांबा. कळेल आता तुम्हाला. तिला मी फक्त एक प्रश्न विचारतो, मग तुम्ही ठरवा काय द्यायचं ते ?

आता चिंकीच भविष्य फक्त एका प्रश्नावर अवलंबून होत.

प्रवीण ने प्रश्न विचारायला सुरुवात केली

प्रवीण : सांग बर चिंकी टंग(tongue ) म्हणजे काय?

              आता चिंकी विचार करू लागली कारण तीच भविष्य त्या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होत. सगळ्यांना चिंता होती ती म्हणजे चिंकीच्या उत्तराची. तिच्या चेहऱ्यावरून तिला ते उत्तर येत नसाव अस वाटत होत. बराच विचार केल्यानंतर चिंकीने उत्तर दिले.

चिंकी : टंग म्हणजे पोट.

सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवला. आणि तिचे वडील म्हणाले ”आता तर मला अस वाटत आहे कि या चिंकीला पुढे शिकवायचं कि नाही?”
नंतर चिंकीला मराठी मेडीअम देण्यात आले.
………………………………………….

 ;)BLOG: www.zakkasidea.wordpress.comMarathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
very funny :D...........but actually Marathi madhun shiknare sudha khup puthe jatata................ashi khup udharane aahet pakt manat jidd asavi lagte......kavitari bannyachi.............. :)