Author Topic: वारकरी पंथाची आवड  (Read 730 times)

Offline किशोर देशमुख

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
  • Blog...
वारकरी पंथाची आवड
« on: March 25, 2012, 12:37:52 AM »
               

                आमच्या घरातील सगळी मंडळी हि वारकरी पंथाची म्हणजे रोज विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला जायचे. कार्तिक महिन्यात सकाळी चार वाजता उठून काकड्याला जायचे हि आमची वडिलोपार्जित दिनचर्या त्यामुळे तुकारामांचे अभंग, एकनाथांचे अभंग, गीतेमधील पंधरावा-बारावा अध्याय, हरिपाठ, ज्ञानेश्वरीतील भरपूर ओव्या ह्या पाठ होऊन गेल्या होत्या. आता घरातील सगळे वातावरण तसे असल्यामुळे सगळ माहित असण साहजिकच.दर एकादशीला विठ्ठल मंदिरात कीर्तन व्हायचे त्यामुळे महाराजांची राहायची, जेवायची व्यवस्था आमच्याकडेच असायची. कोणतेही महाराज आले कि बाबा मला अभंग म्हणायला सांगत आणि मी मोठ्या हौशेने अभंग म्हणून दाखवायचो. पोरगा अगदी पाच वर्षाचा असूनही त्याला सगळे येते म्हणून महाराज मोठ्या आनंदाने माझी पाठ थोपटत असायचे आणि पोरगा मोठा झाल्यावर मोठा कीर्तनकार होईल असा आशीर्वाद द्यायचे.

                 जेव्हा शाळेत जायचो तेव्हा आमचे सर सगळ्यांना विचारायचे कि मोठ झाल्यावर तुला काय व्हायचे आहे. सगळे विद्यार्थी आपापले मत सांगायचे कोणाला डॉक्टर कोणाला इंजिनिअर अन कोणाला काय. माझा नंबर आला कि सर मला बसायला सांगायचे आणि म्हणायचे कि मला माहित आहे कि तू एक मोठा कीर्तनकार होणार. माझ ध्येय जणू सगळ्यांना माहीतच होत. आणि होणारही का नाही कारण लहानपणापासून पोराला आवड होती अभंगांची, वारकरी पंथाची आणि वारकरी पंथाला लाभलेल्या त्या महान संतांची. पण आयुष्यात बदल घडले ते दहावी नंतर… मोठ्या भावाच्या हट्टामुळे मला दहावीनंतर बाहेरगावी पाठवण्यात आले कारण आमच्या गावात इंग्लिश मेडीअम नव्हते. नंतर मी बारावी ची परीक्षा पास झालो आणि माझा इन्जिनिअरिन्ग ला नंबर लागला. आता माझा तो लहानपणापासूनचा वारकरी पंथाचा नित्यनेम थोडा कमी झाला होता. जरी मी आज मोठा कीर्तनकार न होता एक इंजिनिअर आहे. तरी ते विचार, चांगले संस्कार, वारकरी पंथाची आवड अजूनही कायम आहे.

ब्लॉग : www.zakkasidea.wordpress.com

« Last Edit: March 25, 2012, 12:39:01 AM by किशोर देशमुख »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: वारकरी पंथाची आवड
« Reply #1 on: March 25, 2012, 08:42:27 PM »
Lahanpaniche sanskar kadhi visarale jat nahit. Chaan lihil ahe.