Author Topic: ती भयानक रात्र  (Read 1776 times)

Offline किशोर देशमुख

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
  • Blog...
ती भयानक रात्र
« on: March 26, 2012, 12:02:59 AM »
           माझ्या शेजारचा मित्र राहुल संध्याकाळी शेतातून कामावरून आला त्याला वाटले करमणूक म्हणून  आज नऊ ते बारा चा सिनेमा पाहायला जाऊ.  आमच्या खेड्यातील सिनेमा घर म्हणजे एकदम मस्त एअर कंडीशन. आता डोक्यावर छप्पर नसल्यामुळे एअर कंडीशनच म्हणावं लागेल. ज्यांना जमिनीवर झोपून किंवा बसून सिनेमा पहायचा असेल त्यांच्यासाठी फक्त पाच रुपये तिकीट. ज्यांना खुर्ची वर बसून पहायचा असेल त्यांच्यासाठी सात रुपये तिकीट. हा आताचा दर. कोणी सोबत नसल्यामुळे राहुल एकटाच सिनेमा पाहायला गेला. सिनेमा तसा चांगला होता. पण दिवसभर काम केल्यामुळे तो थकलेला होता. सिनेमा पाहता पाहता झोप केव्हा लागली हे त्याला कळलेच नाही. आता सिनेमा संपलेला होता आणि सगळी मंडळी घरी जात होती. राहुल शेवटी कोपऱ्यात बसल्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

           राहुल ला जाग आली तेव्हा जवळपास रात्रीचे एक वाजून गेले होते. आता तो थोडा घाबरलेला होता कारण सिनेमा संपून दीड तास झाला होता आणि तिथे कोणीच नव्हते. नुसता लक्ख काळोख असल्यामुळे त्याला काय करावे समजेना. त्याचे घरही बरेच लांब होते. त्याला घरी जायला अर्धा तास लागत होता. तो कसेबसे  धाडस करून घरी जाण्याकरिता निघाला. रात्र बरीच झाल्यामुळे वेगवेगळे आवाज त्याला ऐकायला येत होते. आता त्याला वेगवेगळे गावातील भुताचे किस्से आठवत होते त्यामुळे तो पार घाबरलेला होता. लगेच आसरा मातेच्या मंदिराजवळ कोणी असल्यासारखे वाटत होते. पण मंदिराजवळ कोणताहि भूत नसणार म्हणून तो स्वताला समजावत होता.

           पण लगेच त्याला एक हिरवी साडी घातलेली, डोक्यावर लाल मोठ कुंकू, आणि केस मोकळे सोडलेली स्त्री त्याला दिसली. आता तो फार घाबरलेला होता. तरी हा आपला भास आहे म्हणून तो स्वताला सांगत होता.

त्या स्त्रीचा आवाज त्याला ऐकू आला ती त्याला म्हणाली “या मार्गाने जाऊ नको”

तो घाबरल्यामुळे घामाने ओलाचिंब झाला, तरी हा आपला भास आहे असे म्हणून पुढे जाऊ लागला.

ती अमावषेची रात्र असल्यामुळे नुसता सगळीकडे काळोख होता.

तो जोरात पुढे पावल टाकीत जात होता. कारण त्याला फक्त लवकरात लवकर घरी जायचे होते.

पुन्हा तीच स्त्री त्याला दिसली आणि जोराने ओरडत म्हणाली कि “मी तुला सांगितले न कि या मार्गाने नको जाऊ म्हणून”

तो आता पळत सुटला आणि लगेच धाडकन पडला त्याला वाटले कि त्याचे पाय कोणी ओढत होते.

तो कसाबसा पाय झटकून पळत सुटला आणि अखेर घरी पोहोचला.

दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो तेव्हा मला हे कळले.

तो जिथे पडला होता त्या ठिकाणी मी गेलो. तेथे पाहिलं तेव्हा तिथे रेती होती.

कदाचित पळता पळता रेतीमुळे पाय घसरला असेल.

 त्याला फार ताप आल्यामुळे तो सात दिवस नुसता पलंगावर पडून होता आणि कधीच रात्रीचा सिनेमा पाहणार नाही हा निश्चय त्याने केला.


BLOG: http://www.zakkasidea.wordpress.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: ती भयानक रात्र
« Reply #1 on: March 26, 2012, 05:11:00 PM »
Nice Story.......................... :o

Offline किशोर देशमुख

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
  • Blog...
Re: ती भयानक रात्र
« Reply #2 on: March 26, 2012, 06:56:28 PM »
मी तुमचा आभारी आहे....
« Last Edit: March 26, 2012, 09:49:25 PM by किशोर देशमुख »