Author Topic: त्या चिमुकलीची पाटी  (Read 884 times)

Offline mee

  • Newbie
  • *
  • Posts: 1
त्या चिमुकलीची पाटी
« on: June 19, 2012, 04:42:23 PM »
स्टेशनरीच्या दुकानात हजार हजार रुपयांच्या डायऱ्या चाळताना तो निरागस समाधानी चेहरा समोर आला.लहान मुल म्हटलं कि माझी नजर आणि मन आपसूकच तिथे वळत पण तो अनुभव खूप काही विचार  करायला लावून गेला..आयुष्यभरासाठी !!!

४-५ वर्षाची होती ती.नुकतीच शाळा सुटून छबिलदास गल्लीच्या स्टेशनरीच्या दुकानात आईच्या कडेवर बसून आली होती. आमची सुट्टी संपून पुन्हा क़तरला परत यायचे दिवस होते ते, त्यामुळे  आमची घाई घाईत खरेदी चालू होती. दुकानातला एक salesman  मला आणि माझ्या नवऱ्याला बऱ्याच डायऱ्या दाखवण्यात मग्न होतां .जास्त किमतीची डायरी कशी चांगली,त्याचा पोत,त्याच कव्हर,पान वगैरे वगैरे सर्व काही positive पण वायफळ गोष्टी आम्हाला पटवून  देत होता.बऱ्याच  डायऱ्या चाळल्यावर एका डायरीवर बोट ठेऊन  ' ही बरी आहे' असा निर्वाणीचा सल्ला मी नवर्याला दिला.
तेवढ्यातच शेजारच्या salesman चा आवाज आला
--' काय पाहिजे बाई?'
--' दादा एक पाटी देता का ?'
त्या बाईच्या कपड्यांकडे बघत त्याने स्वस्तातली हिरव्या रंगाची पाटी काढली. त्या पाटीकडे पाहूनच लक्षात आले  कि  ती  स्वस्तातली स्वस्त पाटी आहे. नकळत माझी नजर त्या छोट्या मुलीवर पडली आणि दोन क्षण मी स्वतःला हरवूनच बसले.ती पाटी पाहताच तिच्या चेहर्यावरची  चमक काही औरच होती.जणू काही त्या क्षणी तिला तिचा स्वप्नांचा स्वर्ग मिळाला.तो क्षण मी खरंच स्वतःला हरवून बसले होते.तिच्या शिवाय मला काहीच दिसत नव्हतं जणू तेव्हा.... त्या एवढ्याश्या जीवाला किती लहानश्या गोष्टीत आकंठ समाधान लाभलं होतं. त्या क्षणी ती चिमुरडी मला बराच काही देऊन गेली होती.
एकाच दुकानात आम्ही महागातली महाग डायरी शोधताना असमाधानी  होतो तर तिथेच ती चिमुरडी त्या स्वस्तातल्या स्वस्त पाटीच्या  प्रेमात पडून अखंड समाधानात न्हात होती.
प्रामाणिकपणे,स्वार्थीपणाने त्या क्षणी तिचा हेवा वाटला होतां..किती परिपूर्ण हास्य होतं तिच्या चेहर्यावर!! आणि आपल्याला हे कधीच जमणार नाही ह्याची खंत माझ्या मनात !!!
आयुष्य म्हणजे नुसता पैसा झालाय--नोकरी,घर.चैन,मौज-मजा...सगळ्यात पैश्याचा दृष्टीकोन..१००% आयुष्य नाहीच उपभोगता येत इथं...सगळं असताना जे काही नाही त्याचा हव्यास आणि त्या साठी स्पर्धेत वरचढ होण्याचा प्रयत्न ह्यात आपलं आयुष्यचं जगायचं राहून जातंय...पैसा म्हणजे सुख...हे समीकरण बदलायची गरज आहे. नाहीतर नुसतं रोबोट होऊन जगेल माणूस... जसा आत्ताही जगतोय..आयुष्याचे उमेदीचे क्षण निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्यात काय अर्थ आहे??
कितीहि पैसे मिळवले तरी  कमीच पडतात.पैसे नाहीत म्हणून आयुष्यचं थांबतं.आयुष्याची दोरी पैसा-नोकरी ह्या वरच अवलंबून आहे सध्या...
थोडा विचार करूया--आपल्या आजी आजोबा ,आई बाबा ह्यांच्याकडे किती पैसे होते??तरीही त्यांनी त्यांचं आपलं आयुष्य घडवलच ना...आयुष्याच्या १० व्या वर्षापर्यंत मला नाही कधी आठवत कि आपल्याकडे काही कमी आहे असा वाटलं असेल.....लहानपण आठवलं कि अजूनच जीवाची घालमेल होते..किती सुवर्ण काळ होतं तो..प्रत्येकाला आपलं बालपण हवं हवंस वाटत कारण तेव्हा काही tensions नसायचे...नाही म्हणायला सर्वात मोठ tension म्हणजे रोजचा गृहपाठ...मैत्रिणींसोबतचा काळ किती सुखद असायचा...आत्ताही आहेत सगळे सखे सोयरे पण कितीसा वेळ आपण घर-संसार  ह्याच्या व्यतिरिक्त गप्पा मारण्यात घालवतो?? साध्या सोप्या भाषेत GOSSIPING and that too dirty gossipping !!!
मनापासून एखाद्याला भरपूर शिव्या देता येतात पण तोंडभर कौतुक मात्र नक्कीच नाही करता येत सध्या....
मोठी माणसं लहानांना सांगतात कि तुला मोठा झालास कि समजेल पण खरा समजूतदारपणा तर लहानपणीच असतो.जसं वय वाढत जातं तसा समजूतदारपण लयाला जाऊन EGO वाढत जातो.लहानपणी कट्टी-बट्टी चा खेळ ५-५ मिनिटाला बदलायचा आणि कितीही भांडणं झाली तरी दुसऱ्या दिवशी प्रार्थनेला एकत्र उभे राहायचो.पण आत्ता नवऱ्याशी ही वाद झाला तरी आठवडा-आठवडा बोलणं नाही होत,मग चूक कोणाची ही असो...EGO  आड येतो प्रेमाच्याही....
असा का होतं ?
ह्यावर उपाय काय??
उपाय एकच...ह्या चिमुरडीच्या हास्यसारख  आपण ही हास्य शोधायचं..छोट्या छोट्या गोष्टीत...पण हे जमेल??नक्कीच नाही जमणार पण प्रयत्न करायला की हरकत आहे..आणि जमलंच तर सोन्याहून पिवळ...!!
त्या १० सेकंदात ती चिमुकली माझ्या मनात आणि आठवणीत एवढा पक्कं घर करून गेली कि ह्यापुढे तो क्षण विसरणं अवघड नव्हे तर अशक्यच...
मला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला आवर्जून मी ही गोष्ट सांगते आणि त्या गोष्टीचा आनंद समोरच्याने घेण्यापेक्षा मलाच खूप समाधान मिळतं...वाटत कि काही क्षण मी तिच्या भूमिकेत जाऊन आले आणि तो क्षण जगून आले...तेवढच काय ते समाधान !!!

मला तिचं नाव नाही माहित पण अपेक्षा हीच कि तिने सदैव तसंच राहावं..तिच्या विश्वात रममाण होऊन आकंठ समाधान उपभोगाव...मोगऱ्याच्या कळीसारख दरवळाव आणि सगळ्यांना आनंद द्यावा ....

Thank You my Dear for giving me Such a Wonderful Moment in Life...

GOD BLESS !!

Marathi Kavita : मराठी कविता

त्या चिमुकलीची पाटी
« on: June 19, 2012, 04:42:23 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):