Author Topic: शब्द..  (Read 1019 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
शब्द..
« on: June 24, 2012, 11:58:24 PM »
माझ्यातला रसिक ओळखून आणि मला बोलतं करताना पाहून फोन वर माझा बॉस म्हणालेला एकदा..
 रोहित.. तुझ्या आणि माझ्यामध्ये जर काही असतील तर ते शब्द आहेत.. !!
 वाह.. कधीच विसरू शकणार नाही  मी हे शब्द..
 शब्द.. एक निराळंच भन्नाट माध्यम..
 जे फक्त content  पोचवतं.. दिसणं नाही..
 आणि मला ते बऱ्यापैकी आवडतही..
 माझी एक मैत्रीण .. chat वरची..
 केवळ बोलण्यानी एकमेकांना बांधून ठेवलेलं.. दिसण्यानी नाही..!!
 पण.. याचे थोडे तोटेही असतात..
 जे लोक केवळ शब्दांनी बांधले गेले ते त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं की सत्यात प्रकटणं कुणा एकाला जड जावं.. आणि जातंच!!
 मला माझ्या बॉस बाबतीत गेलं आणि मैत्रिणीला माझ्या बाबतीत..
 हे accept  करणंही खूप अवघड गेलं..
 हे जड जातंच.. ह्या दोन जगातला difference  वाटतो तितका सोपा नाही..
 आणि माझ्या यादीत एक नवा नियम पडून गेला..
 अश्या शब्दांच्या दुनियेत एक तर  जास्त विहार करू नयेच.. खऱ्या जगाचा आधार असल्याशिवाय..
 आणि जर केलाच तर त्या व्यक्तीची खऱ्या जगातील अपेक्षाच करू नये... अजिबात करू नये..
 
 - रोहित

Marathi Kavita : मराठी कविता


kiran ghorpade

  • Guest
Re: शब्द..
« Reply #1 on: June 25, 2012, 03:18:23 AM »
chaan ahe. shabd evadech ahet mahan, kadhi foolansaman kadhi
dhanushyatla baan.