Author Topic: निमंत्रण..  (Read 939 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
निमंत्रण..
« on: July 07, 2012, 02:47:00 AM »
    डोक्यात तिचाच विचार.. जातंच नाहीये कधीपासून.. आज जवळ जवळ एक वर्षांनी तिला पाझर फुटला होता.. तिनं स्वतःहून badminton खेळायला बोलावलं होतं.. tournament  चालू होणारेत कारण सांगून.. खरंही असेल.. आणि असावंपण.. Be Positive!!
    आजपर्यंत कित्ती वेळा तिला विचारून झालं असेल.. कधी एकदा खरी खरी भेट म्हणून.. chat वरची सगळ्यात भारी मैत्री कुणाची झाली असेल तर ती याहून मोठी असणे शक्यच नाही.. पण फक्त chat वरची.. खऱ्या जगाचा आधार नसलेली.. आणि मुळात हेच कारणही असू शकतं.. जिथे पायाच नाही तिथे कोण बांधकाम करणार.. त्यामुळेच ती तटस्थ असायची.. हो ही नाही आणि नाही ही नाही.. तिच्यात असलेलं विषय टाळायचं कौशल्यही एकमेवाद्वितीय.. बऱ्याचदा या भेटण्याच्या विषयावरून वादळेही झालेली.. कधी नव्हे ते २-२ आठवडे तर कधी कधी महिनाभर बोलणं बंद.. मग एक दोन कविता पडायच्या.. कधी एखादा ब्लॉग.. मन हलकं झालं की गाडी पुन्हा रुळावर
.. ती नेहमी त्या रुळावरच असायची.. माझी वाट बघत.. तिच्यासारखी खंबीरही तीच.. मला उगाच नाही आवडायची ती..!
    पण अचानक ह्या tournaments तिला practice ची गरज भासवत असाव्यात.. आणि जसं की तिला माहित होतंच.. badminton ही आम्हा दोघांची mutual friend! पण तरीही तिनं माझं पर्याय निवडावा हे मला देव प्रसन्न होण्याइतपतच समजणं अवघड आहे.. त्याला कारण पोकळ नाही..  एक तर आभासी दुनिया ते खरी दुनिया हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.. जेव्हा ह्या आभासी दुनियेत कुणी रमतो तेव्हा तो त्या समोरच्या व्यक्तीला त्या साच्याबाहेर पाहतच नाही आणि जेव्हा तशी काही वेळ येते तेव्हा ते सावरून नेणं प्रचंड अवघड जातं.. जात असावं.. आणि दुसरं म्हणजे माझं तिच्यावरचं कधी काळी असलेलं आणि तिला माहित असलेलं प्रेम.. तिनं कधीच मला wrong indications दिले नाहीत.. आणि त्यासाठी
मग भेटणंही नाही! आणि जसं हेही जेव्हा माझ्या गळ्याखाली उतरलं तेव्हा ते तिला समजायला अवघड गेलं नसावं.. तेव्हाच हे निमंत्रण धाडलंय..!! तिची विचार करण्याची level मला दिवसेंदिवस उमगत चाललीये.. ती level अजून खोल होत चाललीये.. खूप हुशार.. प्रचंड!!
     पण आपणही कच्चे चेले नाहीत.. जिने वर्षभर आपला अंत पाहिला तिला इतक्या सहज नाही सामील व्हायचं.. प्रश्न शेवटी आपल्या इभ्रतीचा पण आहे.. अजून एक दोनदा तिचं विचारणं तर बनता है.. हक्कच आहे.. आजपर्यंतची भरपाई आहे..!! बघू.. काय होतंय आणि कुठवर जातेय आमची badminton ची खेळी..!!

- रोहित
« Last Edit: July 07, 2012, 04:39:09 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता

निमंत्रण..
« on: July 07, 2012, 02:47:00 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):