Author Topic: प्रेम प्रेम आणि प्रेम .....  (Read 1296 times)

Offline atulmbhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 48
प्रेम प्रेम आणि प्रेम .....
« on: September 05, 2012, 03:01:29 PM »
प्रेम प्रेम आणि प्रेम .....
       ........ अखेर प्रेम असते तरी काय ?.... जगण्याला  हिरव्याशा मखमालीत अलगद लपेटणारी भावना कि वास्तवाचे दाहक चटके पदोपदी  दाखवणारी वेदना? रखरख ओसाडशा माळावर अचानक भेटणारी, सुखावणारी हिरवळ कि जगणे इतके सोपे नसते हे सांगणारी तावून सुलाखून काढणारी झळ? कांहीही असो! प्रेम प्रेम असतं. तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश केला कि प्रेमाचं हे गाव खुणावू लागतं. साऱ्यांनाच! आणि मग तनामनात हिरवळीचे अंकुर उगवायला लागतात. भान हरपून जगणं म्हणजे काय हे यावेळी नेमकं कळायला लागतं . हुरहूर, विरह या नुकत्याच तोंड ओळख  झालेल्या शब्दांची  खरीखुरी ओळख अंतरात होऊ लागते .पाउस आवडू लागतो, तसा चिखलही. माळरान आवडायला लागतं आणि डोंगरही! इतकंच काय कधी काळी अजिबात न आवडणारी गाणीही खूप कांही अर्थ सांगू लागतात आणि आवडूही  लागतात. भासांच मृगजळ प्रत्येक क्षणी सुखावून टाकतं.विरह जितका नको तितकाच हवा हवासा वाटतो! अगदी पाडगावकरांनी सांगितल्याप्रमाणे साऱ्यांचं सेमच  असतं प्रेम.. पण...? त्या प्रेमाची वाट साऱ्यांची सेम असते का हो? नसतेच मुळी! प्रेम कुणी चोरून करतो, कुणी लपून करतो कुणी बिनधास्त करतो , कुणी जपून करतो. प्रेमाची उदात्त भावनाच तारून नेते त्यांना या साऱ्यातून.
          असं हे प्रेम.... ते पहिलं किंवा दुसरं नसतंच मुळी. आयुष्यात कधी काळी आम्हीही प्रेमिक होतो इतकंच स्वत:ला मिरवण्यासाठी किंवा फार फार तर स्वत:चं सांत्वन करण्यासाठीच हा शब्द प्रयोग असावा....
         फक्त 'आय लव्ह यु' म्हणून प्रेम होत नसतं कधी. आणि कधी ते फक्त पहिल्या नजरेत ही होत नसतं. ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. एक-मेकांना समजून उमजून घेण्याची प्रक्रिया आहे. अखंड...  प्रेम ही एक  भावना असते. खरी खुरी ,शुद्ध, नि:स्वार्थी... प्रेम  एकदाच होतं.आणि आयुष्याभर टिकतं....अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा 'तू मला हवी आहेस किंवा तू मला हवा आहेस' असं  म्हणायला ते भाग पाडतं. इतकं ते गुणवत्तेनं परिपूर्ण असतं. पण ..?   प्रेमाच्या या  वाटेवर वासनेच्या किड्याचा प्रवेश झाला तर?  तर प्रेम प्रेम राहत नाही आणि ते साऱ्यांचं सेमही राहत नाही. वादळात सापडलेल्या तारुसारखं भरकटत जातं ते. ना दिशा ना अंत, ना ध्येय ना जातिवंत... म्हणूनच प्रेमभावनेच्या या निसर्गदानास तस्सच, अभिजात ,जातिवंत, अस्सल, उदात्त ठेवायचं असेल तर तितक्याच जाणीवपूर्वक जबाबदारीने ते पेलायला हवं. तरच त्याला समाजाकडून होणारा विरोध हळू हळू मावळत जाईल आणि दरवळत राहील प्रेमाचा गंध ...अविरतपणे...
             अतुल भोसले

Marathi Kavita : मराठी कविता


SAIRAJ POWAR

  • Guest
Re: प्रेम प्रेम आणि प्रेम .....
« Reply #1 on: September 08, 2012, 06:17:06 AM »
NICE ......   VERY GOOD...