Author Topic: प्रेम म्हणजे फक्त ...  (Read 1329 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रेम म्हणजे फक्त ...
« on: October 12, 2012, 11:46:58 PM »
प्रेम म्हणजे फक्त ...
सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ?


प्रेम म्हणजे फक्त ...
दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे
तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे?


प्रेम म्हणजे फक्त ...
हेच कि ज्यात गुलाबाच्या फुलाला, विशिष्ट रंगाला अती महत्व येण . साऱ्या नाजूक भावना जणू
फक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण ?


प्रेम म्हणजे फक्त ...
ज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.
प्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते
करू असे या ताकतीने भरून येणे.?


अशीच असते का प्रेम कहाणी ? कि अजून काही - हर्षद कुंभार
     


 
 


Marathi Kavita : मराठी कविता