Author Topic: एक निनावी प्रेम कथा ...  (Read 5810 times)

एक निनावी प्रेम कथा ...
« on: October 15, 2012, 05:22:16 PM »


एक निनावी प्रेम कथा ...(नाव काय देऊ ह्या प्रेमाला हे सुचत नही ..म्हणून "निनावी")
एक होता वेडा राजकुमार फक्त तिच्यासाठी आणि एक होती स्वप्नपरी त्याच्या मनातली जशी त्याला हवी तशीच गोड सोजवळ. सुरवात कशी झाली हे कदाचित दोघानाही महित नव्हतं कधी एकमेकांच्या प्रेमात अडकले ह्यावर त्यांचा स्वतचा विश्वास नव्हता. पूर्ण त्याच्या आयुष्यात फक्त दुसर्यांसाठी जगलेला तो आज स्वतसाठी जगत होता कारण ती त्याच्या आयुष्यात आली होती. एक वेगळच क्षण तो अनुभवत होता तिच्या सोबत. ती हसली कि हा हसायचा, ती नाराज झली कि हा पण नाराज असायचा तिला हसवण्याचा प्रयत्न करयचा म्हणजे तिच्या आयुष्य्तल्या सगळेच दोर त्याने स्वताशी बांधले होते. तो तसा फार वैचारिक होता आपलं घर आई, बाबा बहिण ह्याव्यतिरिक्त त्याच्या मनात काही  नव्हतं. आईला एक चांगलं आयुष्य द्याच , बाबांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त करयचा आणि सगळा आपल्या खांद्यावर घ्यायचा असा काही निश्चय करून त्याने आपल्या भविष्याची आखणी केली होती आणि ती पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयासही चालू होता. बर्या पैकी तसं झालाही होता. ती...ती फारच वेगळी होती सगळ्यान मध्ये. छान अशी एक खळी पडायची तिच्या गालावर. पहिल्यांदा तिथेच तो भुलला होता स्वताला. एका स्वचंद पक्षी सारखी होती. स्वतच्या अस्तित्वासाठी जॉब करयची घरातून प्रतिकार असतानाही. स्वतच्या पायावर उभं राहण्याची उमेद होती. खूप बडबड करयची अगदी लहान मुलांसारखी. लहानपण तिच्या बोलण्यातून वागण्यातून दिसून यायचं.
         सुरवात झाली जानेवारी  मध्ये. तो असाच मित्रांसोबत बाहेर फिरयला गेला असताना ड्रिंक केली आणि तेवढ्यात तिचा फोन आला त्याने कट करून तिला SMS केला कि "डियर माझ्या मनात तुज्यासाठी एक वेगळीच फिलिंग येत आहे माझे मित्र म्हणता कि हे प्रेम आहे. मी खरच तुझ्या प्रेमात पडलोय " आणि तिला सागितलं कि मी ड्रिंक केली आहे. दुसरा दिवस मनात एक हुरहूर होती त्याच्या काय म्हणेल ती ...कसा बोलू मी तिच्याशी ...नेहमी प्रमणे तिचा फोन आला तो तिला "Sorry " म्हणाला ती हि नजरंदाज करत म्हणली "जाऊदे रे ड्रिंक केल्यावर माणूस काही बडबडतो" आत्ता तिला कसा समजवणार कि तेव्ह्च तो खरा बोलतो. त्याला राहवलं नही त्याने तिला भेटायला बोलवलं आणि ती आलीही. एक गुलाबच फुला आतल्या खिश्यामध्ये ठेवून त्याने तिला विचारलं कि "होशील का माझी ...माझा खरच तुझ्यावर प्रेम आहे "ती काहीशी शांत झाली आणि ठाम पाने म्हणाली "अरे  मला माफ कर मी नाही हे स्वीकारू शकत. घरातून अडचणी आहेत खूप आणि मला प्रेम विवाह करायचं नाहीये " मी हि म्हंटल मग ठीक आहे जसा तुला हव तसं मी नाही पुन्हा बोलणार ह्या विषयावर पण तुला कधीही वाटला कि राम जवळ जावं तर खरच ये मी आत्ता जेवढा तुझ्यावर प्रेम करतो तेवढाच तेंव्हा हि असेन किंबहुना जास्तच. त्या दिवसाचा निरोप घेऊन महिना  दीड महिना उलटून गेला. फेब्रुवारी महिन्यची २१ तारीख संकष्टी होती . ऑफिस मधून निघाला. स्टेशन ला उतरून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली तेवढ्यात मोबाइल ची रिंग वाजली. पहिला तर तिचा msg आला होता काहीसा असा होता "  माझ्याकडून हो आहे......." त्याने  रिक्षा आहे तिथेच थांबवायला सांगितली आणि उतरलो अर्ध्यातच. आणि विचार केला मी असा की विचरला होता ज्यासाठी ती हो म्हणाली काही काळात नव्हतं नक्की कश्यासाठी. थोडासा शांत होऊन पुन्हा तिला रिप्लाय केला "अगं ..कश्याबद्दल ...काय विचारलेला तुला मी ...तू ठीक आहेस ना ...तब्यत वैगरे ठीक आहे ना..कि चुकून MSG आला हा..." तेंव्हा जे सगळ्यांना आपल्या प्रियासी कडून ऐकायचं होता ते तिने रिप्लाय केला कि "----.माझंही तुझ्यावर प्रेम आहे..I LOVE U"..काही काळ त्याला कळेनासं झालं. त्यानेही मग तसाच रिप्लाय केला "Thanks ...I LOVE YOU TOO " ..खूप खुश होता तो..आनंद चेहऱ्यावर असा होता कि आई पासून लपवता आलं नाही..आई ने बरोबर ओळखला त्याला पटकन म्हणाली " प्रेमात तर पडला नाहीस ना...प्रेमातली smile दिसतीये तुझ्या चेहऱ्यावर " मग त्याने घरातल्यांना सांगितला आणि घरातल्यांनी तिचा सून म्हणून तेंव्हाच स्वीकार केला.
     ती हो बोलल्या नंतर ते दोघे पहिल्यांदा भेटणार होते ती नाही  म्हणाली तेंव्हा शर्टच्या आत असलेला गुलाब तिथेच विलीन झालं होता ते आज पुन्हा नव्याने आलं होता..आत्ता मात्र त्याने ते फुल लपवून नाही ठेवलं हातातून घेऊन आलं होता ..तिच्या येण्याच्या आधीच तो त्या ठरलेल्या जागेवर येऊन बसला होता. ती आली ..हसली..नजर फिरवली ..तसच काहीस ह्याच हि होताच कि ,,मग देवाण घेवाण झाली. बोलायची सुरवात कशी करावी ह्याच विचार करत असताना दोघांनीही आपलं आयुष्याची पाने एकमेकांसमोर मांडण्यास सुरवात केली. तेंव्हा जी सुरवात झाली ती अजूनही तशीच आहे ...
   तिच्या सोबतच्या ह्या खी महिन्यात त्याने एक नवीन आयुष्य जगायला सुरवात केली होती ...ती रुसायची ...बोलायची तो फक्त तिला मानावायचा ...खूप वेळा असा झालं माहित nahi का ते ...असाच एक दिवशी बोलता बोलता ती बोलून गेली कि" का एवढं प्रेम करतोस माझ्यावर मी नाहीये त्या योग्य..सांग ना का?" तेंव्हा तो निरुत्तरित होता...पुन्हा ती म्हणली "अरे वेड्या का असं करतोयस मी तुला माझ्यात गुंतू नये म्हणून रोज तुझ्याशी भांडते रोज तुला काही बोलते पण तू काहीच बोलत नाहीस ..निमूट पणे का सहन करतोस बोल ना का? तेंव्हा तो म्हणाला कि "माझ्यासाठी ते एवढं important नाही जेवढी तू आहेस आणि का प्रेम करतो ह्याच उत्तर माहित नाही पण करतो खरं..पण आज तू ला हे सगळं का संगतीयेस ..काय झालं ? ती शांत झाली ..थोड्या वेळाने म्हणली कि "अरे आपलं नाही  पुढे काही होणार ...माझ्या घरातले नाही राजी होणार आपल्या प्रेमासाठी..खूप त्रास देतील तुला ..तू तुझा मार्ग बघ मला नाही आवडणार माझ्या मुळे कोणाला त्रास झालेला भले मी आयुष्यभर त्रास सहन करेन आणि वेड्या मी हि तुझ्यावर जीवापाड प्रेम करते रे पण मी घरातल्यांना नाही दुखवू शकत ...सांग तूच आत्ता मी काय करू मला नाही सहन होत ..बाबांकडे तुझा विषय जरी काढला ना तरी ते ओरडतात त्यांना नाही आवडत तू का ते माहित नाही..आणि जर मी हट्ट केला आणि जर त्यांना काही झालं तर मी स्वताला नाही माफ करू शकत..बघ तुला मी ८ दिवस देत आहे तू म्हणशील तोच शेवटचा निर्णय असणार आहे मला नाही काही मार्ग दिसत.. " त्याने हि तिची समजूत घातली आणि म्हणाला ठीक आहे मी आहे ना घेईन चांगला निर्णय पण तू शांत हो .तिच्या डोळ्यात किंचित पाणी होतं जे त्याला पाहून अडवलं होतं. मनातलं सारं काही तिने नेहमी सारखच लपवलं होतं. खर तर तो फारच दुविधा मनस्थितीत होता कळत नव्हतं काय करावं काय नाही. तिच्याशिवाय किंचित सुद्धा न राहणारा तो भलत्याच निर्णयाच्या ओघात होता.स्वताच मन मारून त्याने  तिच्यासाठी एक अवघड निर्णय घेतला होता जो कदाचित तिला हि अवघड जाणार होतं. पण कदाचित परिस्थिती तशी नव्हती म्हणून त्याने तिच्यापासून लांब राहण्यचा निर्णय घेतला कारण ती वडिलांना कधी दुखवू शकत नव्हती मग तो  तरी कसं दुखवणार त्याला माहिती होतं जर तिला कायमचं जरी बोलवलं असता स्वताकडे तरी ती वेड्यासारखी आली असती सगळी नाती तोडून पण तिच्या मनात कुठेतरी एक खंत असती एक दुख असतं आणि त्याला हि तसं नकोच होतं त्याला कोणाला दुखवून आपल्या आयुष्याची सुरवात करयची नव्हती. दिनांक २१ ऑगस्ट ..१८ महिने एकत्र राहून त्याने तिला सांगितला "नाही जमणार ना आपल्याला कोणाला दुखवायला. our family is  more Important for us ...म्हणून तू तसाच कर जे तुजे बाबा म्हणतील तसे ...आपलं काय ...वेळ थोडीच थांबतो कोणासाठी..तो जातोच ...खूप दुखेल त्रास होईल तुला मला ...एक दिवस एक वर्षा सारखा जाईल पण आपण सहन करू  ...हळू हळू सगळाच कमी होईल " मग ती शांत पाने अडकत अडकत म्हणाली मला एक प्रोमिस हवंय तुझ्याकडून देशील का? तो म्हणाला ठीक आहे बोल ..ती म्हणाली " तू राहशील ना व्यवस्थित माझ्याशिवाय ...तू तुजं आयुष्य जगशील ना ...करशील ना आपली स्वप्न पूर्ण..भले मग माझ्याजागी दुसरं कोणी असेल तरी...आणि तुला असाच करयचं आहे हेच मला प्रोमिस हवंय तुझ्याकडून शेवटच..." भारावलेल्या डोळ्यांनी तो पुटपुटला " हो गं..जान ..राहीन...इथे प्रश्न फक्त जवंत राहण्यचा आहे जगणं तर तू घेऊन चाललीयेस ...जिवंत काय आपण कसे हि राहतोच ना .आई बाबा आहेत त्याच्यासाठी जगायचंच आहे कि ...अजून माझी जबाबदारी कमी नाही झालीये ...आणि राहिला प्रश्न स्वप्नांचा त्याची मी रात्रीच होळी पेटवून दिलीये..जर पुन्हा आलीस माझ्याकडे तर पुन्हा नवीन करू या..तू तशीच ठेव मला नाही जमणार त्यांच्यासोबत राहायला..आणि thanks कदाचित कायमच पाणी दिलास .." ती हि तसच म्हणाली..ती भयाण शांतता होती दोघांमध्ये काही वेळ अश्या वेळेचा निरोप घेऊन दोघे घरी गेले खूप रडले ..हसले फक्त लोकांसमोर ...दुख नाहि  दाखवून दिलं कोणाला ..असाच मनात ठेवून
काळाच्या ओघात दोघेही असे काही दिसेनासे झाले कि नियतीलाही त्यांचा ठाव ठिकाणा नव्हता. आज हि त्या प्रेमाचं रेषा त्याच्या आणि तिच्या मनावर ओघळत्या जखमे सारख्या आहेत ज्या कधी कोणा समोर आल्या नाही. ना कधी कोणासमोर मांडल्या ...
प्रश्न आहे नियती बद्दल आणि तिच्या एका वाक्य बदल ..
नियतीला हेच हव होत का?
ती नेहमी म्हण्यची कि "जो भी होता हें अच्छे के लिये होता हैं ।"
ह्यामधून काय चांगल झाल?
त्याच खरच काही चुकल का ह्या निर्णया मध्ये ?
खूप सारी प्रश्न अधुरीच राहिली ...ह्या प्रेम कहाणी सारखी ...

   :) ---written by---> Ramchandra Patil
« Last Edit: October 15, 2012, 05:23:36 PM by rampatil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #1 on: October 16, 2012, 11:58:07 AM »
hye this is same happened with me and my bf (now he is my husband :) )..... amhi pan asech vegale zalo hoto gharchyansathi mag janiv zali ki ek mekanshivay nahi rahu shakat mag parat ektra alo ...... mazya gharun khup virodh zala ... pan ek vyayachach hya nirnayavar tham rahilo..... emotional black mailing etc. sagale zale shevati nailazane gharatale hi tayar zale .... and now we r happily married couple....... ekmekansathi jhurat rahanyapeksha doghani milun tichya gharatlyana manavayacha prayatn kara ... tuzya gharatale tar tayar ahetach na .... udya kadachit tichya gharatale hi tayar hotil pan kahihi prayatn na karata har marnyat kasala alay prem :P ... sorry to say but love ke liye sala kuch bhi karega yaar ;) ... and its very true "जो भी होता हें अच्छे के लिये होता हैं ।" ... hya sarvatun at the end amhala he kalale ki amhi dogh ekmekanvar kiti prem karato ani ekmekanshivay rahu shakat nahi  ;D  ... All the best to you too :)
« Last Edit: October 16, 2012, 11:59:08 AM by santoshi.world »

Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #2 on: October 16, 2012, 12:17:26 PM »
Dear Santoshi,
तुम्ही म्हणत आहात ते खरोखर योग्य आहे ..प्रेमासाठी काही पण..पण कुठेतरी तिच्या मनात एक खंत आहे अपेक्षांचं ओझ आहे घरातल्यांच. तिला त्यांना नाही दुखवायच असा ठाम निर्णय तिचा आहे आणि कुठे तरी परिस्थिती सोबत नाही माझ्या म्हणायला हरकत नाही..असाही तिने स्वताहून एकच उपाय सोडला मझ्याकडे. पर्याय नव्हता काही..सध्या  झुरतोय मी आणि तीही.प्रयत्न तर अजूनही चालूच आहे खूप दिवस झालेत तरी आस आहेच कि . जाणीव तर पदोपदी होतीये एक मेकांशिवाय राहू नाही शकत ह्याची ..कालचाच प्रसंग ..मी नेहमीप्रमणे तिला भेटण्यासाठी जाणार होता नकळत ट्रेनचा थोडा प्रोब्लेम होता आणि माझा मोबाईल बंद झाला होता आणि मी २० मिनिटे उशीर झालो होतो त्या २० मिनिटांमध्ये तिने ३५-४० वेळा मला फोने करण्यचा प्रयत्न केला होता जेंव्हा मी समोर उभा राहिलो तर मारण्यासाठी उठलेला हात तिने सावरून स्वताच्या डोळ्यांना माझ्यापासून दूर केल. तिच्या डोळ्यात हलकस पाणी होत जे माझ्या नजरेतून चुकल नाही. मी विचरल हे २० मिनिटामध्ये जसा वाटला तशीच राहणार का तू आयुष्यभर ....निरुत्तरित चेहर्याने तिने सोबत चालन पसंद केला . त्या  अबोला मध्ये खूप काही बोलून गेली ..अजूनही उमेद कायम आहे मला जमेल तेवढ मी प्रयत्न करेन तिच्यासाठी ...तुम्हा दोघांना भावी आयुष्य साठी खूप खूप सार्या शुभेच्छा ...:) :) :)
« Last Edit: October 16, 2012, 12:17:52 PM by rampatil »

Preetiii

 • Guest
Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #3 on: October 16, 2012, 12:22:18 PM »
सेम  माझ्याबरोबर पण झाले आहे  आम्हाला दोघांनाही घरी दुखवायचं नव्हतं. कारण  माझ्या घरी प्रेमविवाह मान्य नाही. तरीपण मी एकदा प्रयत्न करून बघितला असता पण,त्याच्या घरूनही विरोध झाला. आणि त्यात आमची जात वेगळी. आणि माझ्या आई वडिलांसाठी  मीच त्यांचा मुलगा आहे त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे...मी माझ्या घरी काही बोललेच नाही. मग आम्ही वेगळा व्हायचं ठरवला.  ते कारण सोपं नव्हतं.  आम्ही दोघापण 2 वर्ष एकत्र होतो मित्र म्हणून आणि प्रेमात २ वर्ष.पण आता सगळं बदललंय. नोव्हेंबर मध्ये त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. आज आम्ही फक्त चांगले मित्र आहोत बास. त्यापुढे काही नाही....तुझ्या घरचे जर तयार असतील तर तिची वाट बघ.. ती नक्की येईल...ALL THE BEST

Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #4 on: October 16, 2012, 12:33:51 PM »
dear preeti
वाट पाहीन म्हणणं फार सोप्प असत पण किती त्रास दायक असत हे कदाचित तुला किंवा मला हि माहित आहेच. पण तूच सांग  तू वाट पाहून तो येणारच आहे का ? प्रेम आंधळ असत अस म्हणतात ते ह्याच करणा साठी. पण ह्यातूनही जे पुढे जातात त्यांना आपण खरे प्रेमी म्हणू शकतो एक अर्थाने कि त्यानि गड जिंकला प्रेमाचा. आणि आपल्या सारख्यांना वेड म्हणून बोलावण्यापुरतीची प्रसिद्धी असते. बघ तिने एक वाक्य सांगितला आहे मला जे कदाचित तू स्वतासाठी वापरू शकतेस "जो भी होता हें अच्छे के लिये होता हैं ।"
एक फरक शोधण्याचा प्रयत्न कर "जगणं " आणि "जिवंत राहणं "

 ;)

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #5 on: October 16, 2012, 12:43:00 PM »
जो भी होता हें अच्छे के लिये होता हैं ।"
ASA MHANUN TRY KARAN SODU NAKA RE
TICHYA GHARI LUVE MARRIAGE MANYA NASEL TAR
TU TUZYA GHARI SANGUN TICHYABAROBAR ARRENGE MARRIAGE SATHI PRAYATNA KAR....
 
BEST OF LUCK.

Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #6 on: October 16, 2012, 12:46:54 PM »
its going on but shes family dnt want to accept me

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #7 on: October 16, 2012, 01:04:16 PM »
Hmmmmm
hya lokana kon samajavanar yar
mazya bahinibarobarhi asach hot aahe
doghanchya gharache Ego aani rudhi,paramparana kavatalun basalet
konich maghar ghyayala tayar nahi........
aani ya doghanchihi avasta vait zali aahe......
VAT PAHANE ATA HATAT AAHE
HOPE 4 D BEST.

Preetiii

 • Guest
Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #8 on: October 16, 2012, 01:18:13 PM »
मी त्याची वाट नाही बघत रे आता. कारण मी जगायला शिकले आहे त्याच्याशिवाय..पण फक्त आठवणींचा एक कप्पा त्यांनीच भरलेला आहे ...आणि हेही खरच आहे जे होत ते चांगल्यासाठीच होतं फरक एवढाच आहे कि ते कोणासाठी ते आपण नाही ठरवू शकत..पण हे जीवन आहे आणि ते सुंदर आहे एवढंच माहिती आहे मला आता...

Re: एक निनावी प्रेम कथा ...
« Reply #9 on: October 16, 2012, 02:13:26 PM »
thts gr8 dear..
be honest with ur life...carry on..& god bless u...